तुझी तत्वे जगण्याची...
प्रसंगी मन मोडून ही
प्रिय तत्वाला जागण्याची...
11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
विचार जाब आसवांना
का आलात बाहेर..?
आग्रहाचे आमंत्रण देऊन
कोणी केला होता का आहेर ..?
Sangita Bhalsing
नातं तोडून
गमवायचं नाही...
नातं ओढून
कमवायचं नाही...
Sangita Bhalsing
बदलला काळ
बदलली वेळ..
हरवला मुलांचा
भातुकली खेळ ...
Sangita Bhalsing
गुलाबी ओठांची
मोहक हालचाल...
कधी कधी न कळे
का जातो तुझा ताल...
Sangita Bhalsing
तू आहेस म्हणून
वेदना आहेत
वेदना आहेत म्हणून
भावना आहेत
भावना आहेत म्हणून
शब्द आहेत
शब्द आहेत म्हणून
काव्य आहे
काव्य आहे म्हणून
रसिक आहेत
रसिक आहेत म्हणून
कवी आहेत
कवी आहेत म्हणून
कविता आहेत...
Sangitale Bhalsing
नका घाव घालू
डेरेदार झाडावर ...
कष्टाने बांधलेल्या
पाखरांच्या घरावर...
Sangita Bhalsing
ये अमर मरणा
वाजत गाजत...
येण्या तुजसवे
मी नाही लाजत...
Sangita Bhalsing
इवल्या फुलाची
दुर्दम्य इच्छाशक्ती...
सुगंध अर्पण्याची
अनमोल युक्ती...
Sangita Bhalsing
श्वासात असावे
भासात नसावे..
खरेच हसावे
लटकेच रुसावे...
Sangita Bhalsing
पुलकित अंग अंग
रात्र ही मंतरलेली...
चांदण्यांची चादर
आकाशी अंथरलेली...
Sangita Bhalsing
मानवा आव्हान
जगाचा रंगमंच ...
भावनांचा अविष्कार
सुख दुःखाचा संच...
Sangita Bhalsing
फोड स्वतः च
अज्ञानाचा घडा ...
गिरव स्वतः च
विज्ञानाचा धडा ....
Sangita Bhalsing
नियम आहेत जगण्याचे
नितीमत्तेने वागण्याचे....
समाजाकडे आपल्याच
नजरेने बघण्याचे...
Sangita Bhalsing
दिसला नाही अजून
या जगाचा सूत्रधार...
पाप पुण्याचा घडा
गुपित लाठीमार ...
Sangita Bhalsing
काळजाचे कप्पे
आहेत तरी किती ..
सापडेना स्थान
ओंजळ ही रिती....
Sangita Bhalsing
काळजात विभाग
आहेत तरी किती...
एकाची दुसऱ्याला
काही नाही माहिती...
Sangita Bhalsing
यश दडलेय कामात
कपाळावरच्या घामात ...
आळस नको मनात
ठेवा कष्ट ध्यानात ...
Sangita Bhalsing
विचारांच्या जाळ्यात
दाताखाली लेखणी...
शब्दफुले डोळ्यात
काया किती देखणी....
Sangita Bhalsing
एकटा चंद्र पाहिला की
मनाला जरा बरं वाटतं...
एकटेपणातही प्रकाशावे
संमयी तत्व खरं वाटतं...
Sangita Bhalsing
सखी
भरजरी पदर तुझा
खांद्यावर ओढून घे...
लांब काळी वेणी
पाठीवर सोडून दे...
मोत्याची नथ
नाकात घालून घे ...
सोन्याची पाटली
हातात घालून घे...
लाल कुंकवाचे बोट
कपाळी लावून घे...
त्याखाली हळदीचे
एक बोट लावून घे...
लाल लाल सिंदूर
भांगात भरून घे...
मोत्याची लांब बिंदी
कपाळी बांधून घे...
लक्ष्मीहार गळ्यात
अलगद घालून घे..
सोन्याचे मंगळसूत्र
जोडीने तोलून घे...
मोगऱ्याचा गजरा
वेणीवर सोडून दे...
अत्तराचे तृषार
अंगावर सांडून घे...
साजशृंगार झाल्यावर
सख्याला बोलवून घे..
हातात हात घालून
सख्याशी बोलून घे...
ओठावर गुलाबी
लाली लावून घे...
डोळ्यात काजळाची
हलकी रेषा ओढून घे...
सांजवेळी सख्याशी
दोन शब्द बोलून घे
संसाराचा कष्ट रथ
आनंदाने ओढून ने...
Sangita Bhalsing
27 मार्च 2019
कोरड्या रंगांची
गालावर लाली ...
धावतसे राधा
धुळवड आली..
पापणीशी खेळे
लाल रंग कण...
बावरले डोळे
उधळी प्रेम धन...
ओठ ही रंगले
रंगले गाल ही..
ओलेते वस्त्र ही
मंदली चाल ही...
सोडविते हात
बांगडी काचली..
कान्हाच्या प्रेमात
राधा ही नाचली..
लाजतसे राधा
सावळ्याची खोडी...
भक्ती प्रेम रंगी
गोरी राधा वेडी...
Sangita Bhalsing
21 मार्च 2019
दोन दिशेला दोन किनारे
काळीज चिरून गेले वारे...
गढूळ पाण्यात हरवलेले
अमृताचे गोड क्षण सारे ...
Sangita Bhalsing
कंठात दाटला सूर
काळजात काहूर...
नयनी लोटला पूर
जाता निघून तू दूर ...
Sangita Bhalsing
बळी जगाला पोसतो
जरी राही अर्धपोटी ..
माय मातीची सेवा
गाणं फुलतं ओठी ...
Sangita Bhalsing
बळी जगाला पोसतो
जरी राही अर्धपोटी ..
माय मातीची सेवा
गाणं फुलतं ओठी ...
Sangita Bhalsing
मानवी कृतीतून कळते
जग किती लबाड आहे...
हितसंबंधी नाते जुळते
जवळ किती घबाड आहे...
Sangita Bhalsing
कळपातल्या मेंढ्या सारखं
आंधळं जीवन नसावं...
प्रत्येक अवघड वळणावर
आपले नाव कोरलेले असावं...
Sangita Bhalsing
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...