चारोळी
सप्तपदी
सप्तपदी चालू
हात हाती घेऊन..
संसार रथ ओढू
वचने याद ठेऊन ...
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
चारोळी
सप्तपदी
सप्तपदी चालू
हात हाती घेऊन..
संसार रथ ओढू
वचने याद ठेऊन ...
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
कविता
भारत माझा देश आहे
भारत माझा देश आहे
तिरंगी झेंड्याचा
अशोक चक्राचा
स्वातंत्र्य,समता
आणि बंधुतेचा
मानवी मूल्याचा वेष आहे
भारत माझा देश आहे!!०१!!
गंगा यमुना
सरस्वतीचा
विंध्य सह्याद्री
हिमालयाचा
पहाडी छातीचा कोष आहे
भारत माझा देश आहे !!०२!!
हिंदू मुस्लिम
शीख ईसाई
विविधतेत एकता
राष्ट्रीय एकात्मता
एक मुठीचा जोश आहे
भारत माझा देश आहे!!०३!!
संस्कृतीचा पाईक
संस्काराची खाण
सीमेवर लढती
भारतीय जवान
रक्त सांडून परिपोष आहे
भारत माझा देश आहे!!०४!!
तरुण लोकसंख्येचा
ज्ञानसंग्रही ज्येष्ठांचा
सत्य अहिंसेचा अन
सुजलाम सुफलाम सृष्टीचा
विज्ञान भरारीने जगही बेहोष आहे
भारत माझा देश आहे!!०५!!
आहेत किती अन
होतील किती
हिंदुस्तान देशा
ना अंत ना मिती
प्रतिकारातही होश आहे
भारत माझा देश आहे!!०६!!
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
( जुगलबंदी - नितीन मोकल सोबत जुगलबंदी )
माझ्या रचना-
सावळा विठ्ठल
विठुच्या नामाचा
सूर ग लागला...
थकल्या देहाला
विसावा मिळाला ...
सोन्याचा कळस
दुरुन दिसला ....
सखा पांडुरंग
गालात हसला ...
विठुच्या मंदिरा
सोन्याचा कळस ...
वारीला जायला
नाही मला आळस ...
कळस पाहयाला
लाख लोक जाती ...
कपाळी लावती
पंढरीची माती...
पंढरीची माती
कपाळी गिलावा...
वारकऱ्याच्या मनी
प्रेमाचा ओलावा ...
डोईला तुळस
चालते पायी पायी
उन्हाचा चटका
मला जाणवत नाई....
पंढरीची माती
मऊ मऊ किती...
वैष्णवांचा मेळा
पायाने तुडविती ...
पंढरपुरात आला
वारकरयांचा ग लोंढा....
सावळया विठुला शोभे
मोतियाचा गोंडा ....
माऊलीच्या घोड्याला
रंगीबेरंगी झुल ...
विठुच्या नामात हाले
माझ्या कानातलं डुल ...
माऊलीच्या घोड्याला
रंगीबेरंगी मऊ झुल ...
विठुच्या नामाची
मला पडली ग भुल ...
जनाईच्या संग
विठु फुगडी खेळतो ...
पहाटेच्या पारी संग
दळण बी दळीतो ...
ओवी विठ्ठलाची
दळताना गाते...
जाते ओढ़ताना
काम हलके करते ...
विठुच्या हाताचा होई
जात्याला ग स्पर्श ...
सुपातल्या डाळीला
होई वेगळाच हर्ष ...
डाळ पाखडली
फ़ोलं उडाली उडाली....
विठ्ठलाची ओवी
काळजात ग भिडली ...
विठुच्या मंदिरी
सोन्याची पालखी
वारीला जायाला
जीवाची तलखी ...
विठुला भेटाया
पंढरीला जाऊ ..
सावळी मुरत
काळजात ठेऊ ...!!
शितल गारवा ..
टिळा चंदनाचा
उपाय विठुला
भक्ताच्या त्रासाचा...
वारीला चालले
आयाबाया संग..
हातामधी टाळ
भजनात दंग...
तुळशीची माळ
गळ्यात घातली ..
काडीवानी काया
विठु नामाने चेतली ...
सावळया विठुची
रुक्मिणी सावळी ..
अंगामधी ल्याली
जरीकाठी चोळी ...
सावळी रुक्मिन
हाती पंचारती ताट ...
आली विठ्ठलाची स्वारी
सोडा सोडा जरा वाट ...
सौ.संगिता भालसिंगप्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर
www.tufaan.in
गुळणा गुळणी...
मंदाकिनी
गागालगा गागालगा गागालगा गागालगा
वाणी अशी बहरून
यावी,रेशमी ओठातली
माया अशी उमलून यावी, काळजाच्या आतली
डोळे किती आतूर झाले भाकरीच्या चांदवा
तृष्णा अशी समजून घ्यावी मोकळ्या पोटातली
माझे तुझे वादात कोरा भावनांचा कालवा
नाती अशी तोडू नका हो पांगताना सावली
भक्ती अशी दावू नको तू कोरड्या टाळातली
सोडू नको वेडया अशी तू साधना नामातली
जाऊ नको आईस बोले पकड ही बोटातली
साडी अशी ओढू नको तू कोवळ्या हातातली
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
स्पर्धेत समाविष्ट रचना
शनिवार दि.14.12.18
क्रांतीची फुले स्पर्धा 02
उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त रचना
दिलदार मित्र
माझा दिलदार मित्र
आनंदाचा झरा आहे
असत्याचा राग भारी
स्वभावाने खरा आहे ...
गरिबाला मदतीचा
नेहमीच देतो हात
समाजाच्या भल्यासाठी
झटतोय दिन रात....
भुकेल्याला अन्न देई
भूतदया वसा घेई
दिव्यांगाची सेवा करी
कौटुंबिक कर्म करी ...
भाग्यवान आहो आम्ही
सच्चा मित्र जीवनात
सद्गुणांचा हा पुतळा
घर केले काळजात ...
सौ.संगिता भालसिंग@
अहमदनगर
( अष्टाक्षरी काव्य रचना)
गझल विचार मंच ,शेगाव
स्पर्धेत सहभागी रचना
मंदाकिनी
गागालगा गागालगा गागालगा गागालगा
वाणी अशी बहरून यावी,
रेशमी ओठातली
माया अशी उमलून यावी, काळजाच्या आतली
डोळे किती व्याकुळ झाले, भाकरीच्या चांदवा
तृष्णा अशी समजून घ्यावी, मोकळ्या पोटातली
माझे तुझे वादात कोरा , भावनांचा कालवा
नाती अशी तोडू नका हो, पांगताना सावली
भक्ती अशी दावू नको तू , कोरड्या टाळातली
सोडू नको वेडया अशी तू , साधना नामातली
जाऊ नको आईस बोले ,
पकड ही बोटातली
साडी अशी ओढू नको तू , कोवळ्या हातातली
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
स्पर्धेत समाविष्ट रचना
शनिवार दि.14.12.18
गरमी आणि थंडी
एकदा भांडू लागली
शेलकी मुक्ताफळे
उगीचच सांडू लागली
अंगावरची वस्त्र
गरमी देते फेकून
लोकरीच्या वस्त्रात
थंडी घेते झाकून
उन्हाच्या काहिलीत
पाऊस पडे घामाचा
दोन मुठी बगलेत
खजिना दडे थंडीचा
सौ.संगिता भालसिंग
बोल कविता माझ्याशी...अष्टाक्षरी कविता
उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त रचना...
बोल कविता माझ्याशी
रुसू नको तू नाहक
अनमोल भावनांची
तूच आहेस वाहक ...
किती सुंदर आहे ग
तुझ्या शब्दांचे पदर
मन कागदावरती
नाचे जरतारी मोर
केतकीच्या लेखणीचे
गर्द हिरवे पान ग
नटविते आज तुला
साहित्याची तू शान ग
तुझी मैत्रिण प्रतिभा
आहे मनात लपून
वाट पहातेय बघ
कशी बसली टपून
भेट राहो जन्मोजन्मी
तुझी माझी घट्ट जोडी
काळजाला गुंफिते मी
आहे थोडी मीच वेडी
सौ.संगिता भालसिंग@
अहमदनगर
कवी विचार मंच,व्हाट्सएप समूह..
स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त रचना
अष्टाक्षरी
विषय - विश्वशांती
समतेच्या काठीवर
मानव्याची गुढी हवी
मळलेल्या वाटेवर
बदलाची गढी नवी
जाती धर्म भेद नको
बंधुत्वाचा पूल हवा ...
सुर्याच्याही तोडीचा रे
प्रकाशाचा दिप नवा ...
भुकेल्याला द्यावे अन्न
निर्वस्त्राला द्यावे वस्त्र ...
असंतोष मिटविण्या
त्याग करा सारे शस्त्र ...
अहिंसेचा दूत बना
दया क्षमा शांती ठेवा ...
भूतदया अंतरात
निसर्गाची पूजा करा ...
पुत्र भारतीचे आम्ही
विश्वशांती हेच दान ...
वसुधैव कुटुंब हा
वसा असावा महान ...
Sangita B Bhalsing
सौ.संगिता भालसिंग@
अहमदनगर
16.11.18
सुप्रभात.....
खड्डे खणतात पाहिले
झाड लावतात दुसरे
फोटो काढतात तिसरे
फक्त प्रसिद्धीस्तव नखरे ...
सौ.संगिता भालसिंग@
अहमदनगर
खड्डे खणतात पाहिले
झाड लावतात दुसरे
फोटो काढतात तिसरे
फक्त प्रसिद्धीस्तव नखरे ...
सौ.संगिता भालसिंग@
अहमदनगर
सासू-सून
सासू म्हणते सुनेला
लवकर उठ सकाळी...
सून म्हणे बंद करा टकळी
नाहीतर पडेल खाली कवळी...
सुनेने केला हलवा
सुनेने केला शिरा,
नवरा म्हणतो बिचारा
खातो, जरा धीर धरा...
हक्क गाजवणारी
सासू सुनेची जोडी ...
माझा माझा करताना
नेहमी खोड्या काढी...
सासू सुनेचं भांडण
नेहमी एकच नंबरी
शेजाऱ्यांची लावालावी
समेटानंतर भरे शंभरी
सासू सुना असतात
एकाच माळेच्या मणी
एकावर एक वरचढ
माघार घेत नाही कुणी ....
संगिता भालसिंग
गुलाब फुलांचा राजा
फांदीवर खेळतो
पांढरा शुभ्र मोगरा
त्याच्यावर जळतो
गुलाब म्हणतो मोगऱ्याला
बघ माझा सुंदर रंग...
करू नको माझी
शांतता भंग...
मोगरा बिचारा रडला
मनातल्या मनात कुढला...
देवाकडे गेला न्याय मागायला
सुंदर रंग मागायला...
देव म्हणाले मोगऱ्याला
रडू नको कुढू नको
तुला देतो विशेष सुगंध
लोक होतील बघ धुंद....
तेंव्हापासून पांढऱ्या फुलांना
मिळाला अनमोल सुगंध...
मोगरा म्हणाला गुलाबाला
सांगतो एक गोष्ट
रंगापेक्षा गंध श्रेष्ठ...
रूपापेक्षा गुण श्रेष्ठ...
मी संगिता गुलाब
पतीदेव मोगरा...
माझ्यासाठी सारे कष्ट...
जरी मी असले खाष्ट ,तरी
माझ्यावर होत नाहीत
कधीच रुष्ट...
संसारात उभारले
आनंदाचे तख्त...
भरतकुमारांचे नाव घेते
द्या आम्हाला आशीर्वाद फक्त...
सौ.संगिता भालसिंग
उखाणा
01
काळजाचे पान करते
शब्द माझे प्राण करते
मांडते उखाणा आता
लेखणीला छान करते ...
भावनेचा दर्द भरते
या जिवाचे रान करते ...
वाचतांना सर्वांचे मी
ऐकण्याला कान करते
समज आहे थोडकीशी
लेखन थोडे सान करते ...
भरतकुमारचे नाव घेते
आदराने तुमचा मान करते...
02
अडवू नको वाहणाऱ्या या नदीला
केवढा हा भार झाला या पापणीला
गंधवाही भावनेला मोल आले कुस्करून हुंगताना पाकळीला
बंधनाचा फास शोभे या मनाला
ठेव जपून हृदयात या साखळीला
संकटांचा सामना ही खेळलेला
जिंकण्याची गाठ बांधू ओढणीला...
धावणाऱ्या पायवाटा संथ झाल्या
दे जरासा हात हाती सोबतीला...
ओळखीच्या वादलाशी भांडताना
नाही बचावले कातडीला ...
साथ जन्मी साथ होती खरी रे
भोवऱ्याशी सोडू नको तू साजणीला...
या नभाचे हुंदके ही पेलवेना
कंप आला काळजाच्या लेखणीला...
भरतकुमारचे नाव घेऊन
हात जोडून विनंती देवाला...
तूच दे खांदा सुखाने तिरडीला
या तुझ्या आधी निघाल्या पालखीला ...
Sangita Bhalsing
मूळ गीत
Song: गाडी चालली घुंगराची
Artist: प्रल्हाद शिंदे
lyricist: साहेबराव कोकाटे
composer: मधुकर पाठक
गाडी चालली घुंगराची, वाट बाई डोंगराची
वेळ कडक नि बाराची, वाट बाई डोंगराची
पहिल्यानं गाडीत बसले मी आज
कोकणात आहे माहेर माझं
आईबाप माझं दर्याचं राजं
मला सवय बंदराची, वाट बाई डोंगराची
दणक्यावर दणका बसतो ग बाई
दणक्यानं जीव हा व्याकूळ होई
तिकडच्या स्वारीला पर्वाच नाही
ह्या भयाण जंगलाची, वाट बाई डोंगराची
घरात वागे तशी दारात
रात्रीचा दिसं करी दिसाची रात
भारी उताविळ ही पुरुषाची जात
आहे लबाड मुलखाची, वाट बाई डोंगराची
समोर दिसतंय् आपुलं गाव
कसं वाटं ना तुम्हाला भ्यावं
पुरे पुरे आता भास्करराव
ओढाताणी ही पदराची, वाट बाई डोंगराची
*********************
जोडी कोंडली उंदराची,गाठ आहे पिंजऱ्याची
जाड झडप नि दाराची, गाठ आहे पिंजऱ्याची
गोठ्याच्या दारात पडलेली बाज
गोणपाट आहे घरं हे माझं
मुलंबाळं सारी सुखात साजं
मिळे चवड गाजराची,गाठ आहे पिंजऱ्याची
पाठीवर फटकन बसतो रं झाडू
मालकीन दडवून ठेवते लाडू
टकल्याच्या रागाला कसं रं काढू
या खडूस मालकाची ,गाठ आहे पिंजऱ्याची
पुशीत मिश्या बसे मांजरी
कुत्र्याची गस्त सदा भो भो करी
जावं कसं बिळात माझ्या घरी
खोड हुशार सापाची,गाठ आहे पिंजऱ्याची
उरात होतंयं धडपड फार
कसंही वाटे व्हावं पसार
तुटे तुटे ना हे भक्कम दार
भिती आहे मरणाची,गाठ आहे पिंजऱ्याची
सौ.संगिता भालसिंग
मूळ गीत
गीतकार-मधुसूदन कालेलकर
संगीत-राम कदम
स्वर- चंद्रशेखर गाडगिळ
चित्रपट-पारध
.....
अजून आठवे ती रात पावसाळी
मने धुंद वेडी भिजून चिंब झाली
जरा स्पर्श होता सुटे कंप हाती
नको बंध आता अशा धुंद राती
लाजलाजुनी का आज दूर गेली
मिटून घेतले तू पंख पापण्यांचे
तरी त्यात वेडे स्वप्न मीलनाचे
नको हा दुरावा अशा रम्य वेळी
.............विडंबन गीत......
कुकर खरवडे ती करपलेला भात
कणी तांदळाची जळून खाक झाली
उभी ओट्या पाशी झुके मान खाली
असे तांदळाचे डबे आज खाली
घासघासूनी थकून पार गेली
लोटून घेतले का दार बंगल्याचे
बिघडलेले बेत जरी जेवणाचे
नको हा रुसावा मध्य रात झाली
सौ.संगिता भालसिंग
🌻 बोलकी बाहुली 🌻
बोलकी बाहुली
नाव तिचे राणी
गाते सदा गाणी
गुणगुण ...
नाचरी बाहुली
तालसूर छान
हलविते मान
डुगडुग ...
हसरी बाहुली
खळी गालावर
हसु ओठावर
खुदुखुदु ...
उंचसे सैंडल
नाजुकशी चाल
टोपी गोल गोल
लालेलाल ...
कुरळे कुरळे
केस काळे काळे
घारे घारे डोळे
निळे निळे
सुंदरसा फ्रॉक
रंगीत झालर
उबदार स्वेटर
मऊमऊ ...
*******************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
०३ एप्रिल २०१६
Copyright
गजल
सावरूनी नाती जरा घ्या
पांगताना सावली
नाळ अशी तोडू नका हो
काळजाच्या आतली ...
जाग हवी राती जराशी
वादळाची सावली
काळ असा अवचित येतो
मांजराच्या पावली
देव कुठे भेटेल आता
वेदनेची काहिली
टाळकुट्या समजून घे रे
साधना नामातली
अपूर्ण
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
स्वातंत्र्याने केला
अर्थाचा अनर्थ ...
उंबरठा सांगतो
मर्यादेचा अर्थ...
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
स्वातंत्र्याच्या मशालीत
मर्यादेचे घाला तेल ...
ज्ञानंदाच्या प्रकाशात
बहरेल जीवन वेल ..
Sangita Bhalsing
स्वातंत्र्याच्या मशालीत
मर्यादेचे घाला तेल ...
ज्ञानंदाच्या प्रकाशात
बहरेल जीवन वेल ..
Sangita Bhalsing
स्वातंत्र्याची मशाल घेऊन
अन्यायाला फोडा वाचा ..
त्रिकाळाचा मजबूत लंगर
उंबरठ्याला तोडा नाचा ...
Sangita Bhalsing
झुकलेल्या पापणीखाली
मी एक वेदना पहिली...
नकारातही संयमाची मी
एक हलकी झलक पहिली ...
संगिता भालसिंग
भाग्य आमचे थोर असे
सावित्रीच्या ज्ञान दानाने ..
स्वातंत्र्याच्या उंबरठ्याला
वंदन करूया शुद्ध मनाने
Sangita Bhalsing
कधी मिळेल समाजात
नारीला प्रथम स्थान...
उंबरठ्यावरच सोडावे
लागू नयेत बिचारीला प्राण ...
Sangita Bhalsing
विश्वासघाताची वेदना
घेतली पदरात बांधून ...
कितीही प्रयत्नाने पुन्हा
तडा येत नाही सांधून ...
Sangita Bhalsing
नेहमी झाकून ठेवावा
मुठीत मोती वेदनेचा ...
अनमोल सव्वा लाखाचा
टोमणा नको जगाचा...
सौ.संगिता भालसिंग
जय श्री कृष्ण
दुर्जनांचा संहार करणारा तू
कुठे आहे तुझे सुदर्शन चक्र ?
अत्याचार करणारांवर कर तू
जरा तुझी न्यायी दृष्टी वक्र --
प्रा.सौ.संगिता भालसिंग
जाती धर्म भेद नको
बंधुत्वाचा पूल हवा ...
सुर्याच्याही तोडीचा रे
प्रकाशाचा दिप नवा ...
Sangita Bhalsing
व्योमगंगा
गालगागा गालगागा गालगागा गालगागा
साजना हा दूरदेशी दग्ध झालेले हिवाळे
वाट पाही आठवांनी नाहलेले पावसाळे
सांगते चंद्रास गाऱ्हाणे तुझे मी सांजवेळी
उधळलेल्या भावनांचे वाजलेले हे दिवाळे
सौ.संगिता भालसिंग
कवी विचार मंच
स्पर्धेत सहभागी रचना
अष्टाक्षरी
विषय - विश्वशांती
समतेच्या काठीवर
मानव्याची गुढी हवी
मळलेल्या वाटेवर
बदलाची गढी नवी
जाती धर्म भेद नको
बंधुत्वाचा पूल हवा ...
सुर्याच्याही तोडीचा रे
प्रकाशाचा दिप नवा ...
भुकेल्याला द्यावे अन्न
निर्वस्त्राला द्यावे वस्त्र ...
असंतोष मिटविण्या
त्याग करा सारे शस्त्र ...
अहिंसेचा दूत बना
दया क्षमा शांती ठेवा ...
भूतदया अंतरात
निसर्गाची पूजा करा ...
पुत्र भारतीचे आम्ही
विश्वशांती हेच दान ...
वसुधैव कुटुंब हा
वसा असावा महान ...
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
16.11.18
आनंदकंद
गागालगा लगागा गागालगा लगागा
घेऊन फार झाले,देऊन फार झाले
हा मोलभाव खोटा का मी उदार झाले
बोलून फार झाले, चालून फार झाले
मौनातले उसासे लपवून गार झाले
थोडे सुमार होते,थोडे विशेष होते
भेटून काल त्यांना,सोडून पार झाले
दुःखात काल होते,सौख्यात आज आहे
नात्यातले पुरावे,गाडून ठार झाले
काही असूर होते,काही निसूर होते
वैरात बांधलेले,जोडून चार झाले
आणून आव फुका,दानास हात छोटे
श्रीमंत वाटलेले,सारे सुमार झाले
त्या पाकळ्या सुगंधी,दोऱ्यात ओवलेल्या
देवास घातलेले वाळून हार झाले
Sangita Bhalsing
Ahmednagar
दाण्याचे दुःख कधीही
जात्याला कळत नाही ,
आणि सुपात जाण्याचे
दाण्याला कधी टळत नाही...
Sangita Bhalsing
🌹 मित्र 🌹
************
कठीण समय येता
मित्र तो कामास येतो ...
लढा संकटाशी देता
हात तो हातात घेतो ...
आसू ते पुसून देतो
डोळे ते भरून येता
मनालाही सांभाळतो
ह्रदय ते भरून येता
छाया तरुसम देतो
झळा उन्हाची लागता
संजीवन प्रेम देतो
जीव जायास लागता
*************
Sangita Bhalsing
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Good morning friends.....💐
11 शुभगंगा
22 मात्रा-8,8,6
अभिमानाला सोडावे तू कधीतरी
स्वाभिमानास तू मोडावे कधीतरी
गूढ रंगात अवघडलेल्या नात्यांचे
धागे धागे जोडावे तू कधीतरी
चाला बोला हसता खेळा एक व्हाया
झाल्या चूका खोडावे तू कधीतरी
माय पित्याला विसरू नकोस संसारी
चरणी स्पर्श मनोभावे कर कधीतरी
बसून एकाच पंगतीलाच एकदाचा
जाती पाती तोडावे तू कधीतरी
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
8.11.18
फटाके फोडून केले त्यांनी
पहा आनंदाने कन्यादान
घर सोडावे लागले नाही
अहा तुम्ही किती भाग्यवान
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
कवी विचार मंच
स्पर्धेत सहभागी रचना(कविता)
दिवाळी
महाराणी ती सणांची
दिवाळीचा दिन आला
आमंत्रण देते तुम्हा
चला चला फराळाला ..
शेव,लाडू,चकलीचा
घातलाय मोठा घाट
लेक जावयाची पाही
सारे कुटुंबीय वाट ...
दारी सुगंधी तोरण
बांधू झेंडू गलाबाचे
पान फुलांच्या नक्षीत
नवरंग रांगोळीचे ...
पहाटेच्या आंघोळीला
लावू चंदनी उटणे
पोळी गुळ पुरणाची
सागवानाचे लाटणे ...
सुरसुरी,भुईनळे
आतषबाजीला
हात धरून आणूया
पहाया आजीबाईला..
पणतीच्या ज्योती मध्ये
पुजा लक्ष्मीची करुया
हात जोडून मागूया
वसा प्रेमाचा धरूया
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
श्रीमंताचा दिन दिवाळी
गरिबाची दीन दिवाळी
बंगल्याची प्रकाश जाळी
झोपडीची हीन दिवाळी
सौ.संगिता भालसिंग
हे ईश्वरा ,
काया वाचा मन
गुंतविले सत्कर्मात
नाही वर्तन कधी
केले अधर्मात ...
मी सुख मागितले
तू तर दुःख दिले ....
सदा आनंदाने
मी स्वीकारले ....
पण तुझा हिशेब
बरोबर आहे का ....?
Sangita Bhalsing
बघ जरा
पाप पुण्याचा
माझा घड़ा ...
बदलला तर नाही ना .....?
***************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
6/11/15
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...