रविवार, ३० जून, २०१९

अबोला

प्रितीचा लिलाव

का रे अबोला ? का रे दुरावा ?
अपराध माझा असा काय झाला ?

अबोध प्रितीच्या फुलावरी तू
निर्दयी किती जबर घाव केला...

हात हाती घेऊन वचन दिले तू
प्रेम खेळ रडीचा डाव केला...

समर्पण भावनेचा त्याग केला तू
व्यवहारात प्रितिचा भाव केला...

अमर प्रितिचा बाजार मांडला तू
चवली पावलित लिलाव केला...

***********************

सौ.संगिता भालसिंग

शनिवार, २९ जून, २०१९

पिंजरा

बंद सोन्याचा पिंजरा
ना मुक्त भरारीचे सुख ...
इवले पंखही छाटलेले
तरीही ठेव हसरे मुख...

Sangita Bhalsing

रुसवा

सखा सखीची समजूत काढत आहे (कल्पना )
 रुसवा सोड सखे 
रुसवा सोड सखे,ये
आनंदाने नांदायला
तुझ्याविना सुकलेल्या
संसाराला पहायला ...
घरात तुझा वावर
धुंद सुगंधा सारखा
देवा पुढे धूपालाही
झालोय ग मी पारखा ...
छुन छुन पैंजणाची
काळजात रुतलेली
टच टच जोडव्याची
हृदयात घसलेली ...
किणकिण काकणाची
कानात ग घुमलेली
गुणगुण आवाजाची
मनात बहरलेली ...
चंद्रकोर भाळावर
नजरेत भरलेली
स्पर्श रोमांच सुखाची
सवय फार  झालेली ...
अंगणात वृंदावन
तुळसही सुकलेली
तीही पाहतेय वाट
नजर आसुसलेली ...
******************
सौ.संगिता भालसिंग
Sangita Bhalsing
अहमदनगर

गुरुवार, २७ जून, २०१९

खुशी

रिश्ता तोड़के हसके
खुदखुशी कर ली हमने..
खुशी का दान देकर हमने
दुखसे झोली भर ली हमने..

सौ.संगिता भालसिंग

बुधवार, २६ जून, २०१९

योग

गुलाबी ओठांचा
रंग सुकून गेला...
भेटीचा अमृतयोग
जेंव्हा चुकून गेला...
सौ.संगिता भालसिंग

नंदादिप

वेदनांचा नंदादिप
काळजाची मंद वात...
आसवांची संततधार
तर्पण करी सारी रात ...

सौ.संगिता भालसिंग

मंगळवार, २५ जून, २०१९

काटा

अनवानी गोरे पाय
काटा रुतला चुमुक...
कसा काढावा कोरुन
सल दाखवी चुणुक...
सौ.संगिता भालसिंग

निरोप

द्यायचं तर दे सोडून
नको लावू आरोप ...
खोटे खोटे हसून
घे आनंदाने निरोप...

@प्रा.सौ.संगिता भालसिंग

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...