साक्षर
जेंव्हा मी वाचले
तुझ्या ओठावरील अक्षर
तेंव्हा मला कळले
मी झाले साक्षर ...
प्रा. सौ.संगिता भालसिंग
11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
साक्षर
जेंव्हा मी वाचले
तुझ्या ओठावरील अक्षर
तेंव्हा मला कळले
मी झाले साक्षर ...
प्रा. सौ.संगिता भालसिंग
करता उचित विचार
होईल उचित कृति ...
करता मात्र अविचार
नक्की होईल माती ....
...............................................................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
22/2/15
वाटा
अगदी अचानक
आपल्या जीवनाच्या वाटा
वेगळ्या का झाल्या ...?
प्रेमाच्या भावना का
अणि कुणाला
आंदण दिल्या ?
प्रा. सौ.संगिता भालसिंग
** खंत **
मुलांबरोबरच काही पालकांनाही
स्पर्धेमुळे करावे लागतात गैरप्रकार ..
अशा कागदी घोड्याच्या निकालात
देशाचं स्वप्न कसं होईल साकार ?.........
..............................................................
सौ.संगिता भालसिंग
24/2/15
............सुख............
सुखाच्या शोधात
सभोवार फिरले ....
शेवटी ते माझ्याच
पदरात गवसले ......
.........................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
25/2/15
बुद्धिदेव गणेशाच्या,पहा खोड्या ,
अभ्यास करतो,हसत खेळत ...
आज मुले झालेत स्पर्धेचा घोडा ,
हे वेड्या पालकांना नाही कळत ...
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रा. सौ.संगिता भालसिंग
16/02/16
दुसऱ्याच्या भावना
कधी दुखवु नयेत ...
अन,स्वतः च्या भावना
सुखवु नयेत ....
अधिकार नाही
कुणाला छळण्याचा ...
त्यांच्या मनाविरुद्ग
वळविण्याचा ...
.............................................................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
2/2/15
तुझ्या नयनातील मधुर भाव ,
कळतो फ़क्त वेड्या राधेला ...!!
घेऊन तुझ्या काळजाचा ठाव ,
देते साथ मधुर बासरीला ...!!
प्रा. सौ.संगिता भालसिंग
सर्वोत्कृष्ट चारोळीचा बहुमान प्राप्त ...
***************************************
चंद्र अन धरतीचे प्रेम पाहून
हिरवीगार सृष्टी बहरुन आली ...
परि,परप्रकाशी म्हणून सूर्याची
किरणे, चंद्राचे भेद खोलून गेली ...
****************************************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
लहरी निसर्ग अन् सरकारात
शेतकऱ्याला मिळेल काय न्याय ?
आई खाऊ घालीना,बाप भिक मागु देईना
कुठवर सोसावा हा घोरअन्याय ?....
प्रा.सौ.संगिता भालसिंग
28/2/15
मन मोगरा
फुलांचा ताटवा
मनात साठवा
दृश्य ते आठवा
मनोहर ...
भावफुले करू
अर्पण प्रभुला
आनंद मनाला
फुलवितो ...
मोगरा फुलतो
सुगंध भरतो
निर्माल्य करतो
ईश्वर तो ...
मन हे मोगरा
सुगंध गहिरा
फुलवी पिसारा
मनमोर ...
प्रा. सौ.संगिता भालसिंग
तू दूर
मी दूर
तरी मनी
एक सूर
येई प्रेमपूर
उठे काहुर
किती धरु
असा धीर
दे जरा हात
पुन्हा हाती धरु
नाजुक ओठ
पुन्हा स्पर्श करू
सौ.संगिता भालसिंग
राजे
आजकाल लोक,फ़क्त म्हणतात
राजे,तुमच्या साठी काय पण ...!!
एक ओठात अणि एक पोटात
विचार कृतीत आणतात का पण ...?
तुम्ही परस्त्रीचा मान सन्मान केला
आज समाज हेच विसरून गेला
तुम्ही दुसऱ्या धर्माचा आदर केला
आज समाज इथेच घसरुन गेला
तुम्ही सुख सोडून दुःखात जगले
आज लोक ताळ तंत्र सोडून वागले
तुम्ही स्वराज्यासाठी प्राण पणाला लावले
आज लोक एकमेकांचे प्राण घ्यायला लागले
राजे,तुमची शिकवण लोक विसरले
नीतिमूल्य ,चारित्र्य सोडून घसरले
तुम्ही होते,स्वराज्य प्रेमाने भारलेले
आज लोक देशभक्तीही विसरले
राजे,पुन्हा या जन्माला
सन्मार्ग दाखवायला ...
तयार आहोत आम्ही
पुन्हा मावळे बनायला ...!!
प्रा. सौ.संगिता भालसिंग
Spsfun.com
*************************
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
*************************
मी मराठी,माझी मराठी
मी मराठी,माझी मराठी
नको फुकाचा जयघोष ,
आपणच बोलत नाही मराठी
देऊ नका दुसऱ्याला दोष ...!!
मराठी जगवा,मराठी जागवा
नुसते बोलून काय उपयोग ?
दुसऱ्याशी मराठी बोलून दाखवा
तरच होईल काही उपयोग ..?
मराठीचा डांगोरा नुसताच पिटू नका
तिचा मान सन्मान वाढवा
मराठीचा दर्जा घसरु देऊ नका
तिला वैभवाच्या शिखरी बसवा ...
प्रा. सौ.संगिता भालसिंग
27/02/16
🌷 माझे घर,माझे मंदिर 🌷
जिथे नाही प्रवेश मला
तिथे मी कशाला जाऊ ...?
विनाकारण नको तिथे
माझी शक्ती का दावू ...?
नाही जाणार मी कधीच
कोणत्याही मंदिरात ..
आहेत सारे देव देवता
जर माझ्याच घरात ...!!
माझ्या घरातील देव्हारा
जसा मंदिरातील गाभारा
येता जाता दर्शन घेता
निघून जाई शीण सारा ...!!
प्रिय आई बाप माझे
सासू सासरे ही माझे
सदा आशीर्वाद देणारे
देव्हाऱ्यातील देव माझे ...!!
बहिण-भावंडे , दिर-जावा
केसावानी दाट गण गोत
सुखा दुःखात साथ सोबत
जसे पंढरीचे वारकरी होत ...!!
पवित्र गाभारी शिजतो
खमंग देवाचा प्रसाद
चिल्यापिल्यांना हाक देतो
जसा मंदिरी घंटानाद ...!!
विष्णुची मी लक्ष्मी
रामाची मी सीता
नाही गरज कोणत्याही
दगडी देवाची आता ...!!
माझे घर,माझे मंदिर
तन मन धनाने पुजते
सुखी समाधानी संसार
प्रेमाची ज्योत तेवते ...!!
🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रा. सौ.संगिता भालसिंग
24/02/16
काल पेरलेली स्वप्नं जळाली ,
उरी खोलवर अबोल घाव ...!!
आज मिळाली नवी उभारी ,
मांडला पुन्हा मी नवा डाव ...!!
***********************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
*** तुळस ***
तुळशी ग बाई
तुझा जन्म रानी - वनी
ये ग माझ्या अंगणात
जागा देते वृंदावनी ।। १ ।।
तुझ्या प्रेमाच्या भजनात
दंग जाहले मी मनी
अशी आली बहरत
दरवळ पसरला जनी ।। २ ।।
बाळ कृष्णाच्या शोधात
फिरले मी लोक तिन्ही
नंद-यशोदेच्या गोकुळात
स्थळ हे झोकात ।।३ ।।
छान वाढली अंगणात
झाली तयारी जोरात
अशी वाजत - गाजत
आली दारात वरात ।।४ ।।
लग्नाला या हो तुम्ही
नका करू हो आळस
अशी लाडा कोड़ाची
माझी साजिरी तुळस ।।५।।
सौ.संगिता भालसिंग
४/११/२०१४.
***********
23 फेब्रुवारी 2015 च्या चपराक साहित्य
मासिकात प्रकाशित काव्य रचना
एकमत वर्तमान पत्रात प्रकाशित रचना
🌻सखी🌻
सखे ग , कुठे हरवली तू ...?
कुठे कशी शोधु ग मी तुला
का माझा कंटाळा आला ...?
आवडे का तुला लपायला ...
करतेय विनवणी तुला
नको सोडुस कधी तू मला
करमेना सखी तुझ्याविना
एकटीचा जीव सुनासुना
तू असली की ,आनंदठेवा
जाऊ आवडत्या दूर गावा
वाजे सुरेल संगीत पावा
मागु हाच आशीर्वाद देवा
हिरव्या पानात नि रानात
रंगीत फुलात नि मुलात
अवकाशात नि सागरात
फिरले सदा तुझ्या शोधात
सहज सुचले विचारात
डोकावले जरा हृदयात
दिसली मला तू काळजात
बद्ध होती माझ्याच मनात
********************
सौ.संगिता भालसिंग
कातरवेळ
माझ्याशी बोलता बोलता
अचानक अबोल झालीस
मला एकटयाला सोडून
कुठे दूर निघुन गेलीस
कधीचा तुला शोधत आहे
तुझ्यावीना दुःख मला लाभत आहे
पापण्यात माझ्या ओल आहे
माझे प्रेम साग़रासम खोल आहे
तुझ्या घट्ट मिठीची याद आहे
माझ्या शेवटच्या श्वासाची साद आहे
गुलाबी ओठांचा मऊ स्पर्श आठवत आहे
तुझ्या श्वासाचा गंध काळजात साठवत आहे
तुझ्याशिवाय नाही राहू शकत
तुझ्याशिवाय नाही जगु शकत
ये परतून सखे,ये परतून
अशा धुंद कातरवेळी .......!!
प्रा. सौ.संगिता भालसिंग
कविता क्रमांक 07
----------------
🌻सखी🌻
सखे ग , कुठे हरवली तू ...?
कुठे कशी शोधु ग मी तुला
का माझा कंटाळा आला ...?
आवडे का तुला लपायला ...
करतेय विनवणी तुला
नको सोडुस कधी तू मला
करमेना सखी तुझ्याविना
एकटीचा जीव सुनासुना
तू असली की ,आनंदठेवा
जाऊ आवडत्या दूर गावा
वाजे सुरेल संगीत पावा
मागु हाच आशीर्वाद देवा
हिरव्या पानात नि रानात
रंगीत फुलात नि मुलात
अवकाशात नि सागरात
फिरले सदा तुझ्या शोधात
सहज सुचले विचारात
डोकावले जरा हृदयात
दिसली मला तू काळजात
बद्ध होती माझ्याच मनात
********************
सौ.संगिता भालसिंग
जेंव्हा एकटेपणा
उठतो खायला ..
तेंव्हा तू नसतेस
मला पहायला ...
....................................
......सौ.संगिता भालसिंग
चंद्र तारकेची फुले
पौर्णिमेला प्रेमकथा ...
अमावस्येला बोले
चंद्र विरह व्यथा ...
**************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
Spsfun. com
3
पहाटवेळी हातांचा हार झाला ,
काळजाचा निखारा गार झाला ...!!
कातरवेळी आठवांचा फेर झाला ,
पापण्यांना आसवांचा भार झाला ...!!
**************************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
Spsfun. com
एकमत वर्तमान पत्राची साक्षी पुरवणीत
नातं ही काव्य रचना आज प्रकाशित ...!!
नातं
....................
तुझं माझं नातं
जरी नवं होतं
तरी मला किती
ते हवं हवं होतं ....
तुझ्या डोळ्यात
माझं गावं होतं
माझं मन सतत
तिथे धाव घेतं ...
प्रेमाचं गावँ सखे
तुजविना रितं होतं ...
सुखाचा प्याला सखे
तुजसवे पित होतं ...
*****************
सौ.संगिता भालसिंग
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...