मी तुझा,तू माझी सखी
यात काही शंका नको ..
दुश्मन असते जग प्रेमाचे
विनाकारण डंका नको ...
Sangita Bhalsing
11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
थरथरते ह्रदय कंपित हात
धावत आलीस तू
बोलायाचे होते खुप काही
विचार गोठवलेस तू
अलवार बोलताना शब्द
आवरलेस तू
स्पर्श करण्यास उतावीळ
सावरलेस तू
भेटीचा अमृत योग असा
परत येशील न तू ?
परत येशील न तू ?
परत येशील न तू ?
सौ.भालसिंग संगिता
रुसू नको, फुगू नको ,
तुला शब्दाची आन ..
ये प्रतिभेच्या दारात
तुला कवितेचा मान ..
Sangita Bhalsing
उजव्या हाताचं दु:ख
मला मेहंदी नाही लावली ,
फक्त एकच बोट लाल झालेय...
माझ्या बोटाच्या नखांना
नेलपॉलिश पण नाही लावली ...
डावा हात किती छान सजवलाय ...
मी त्याच्या पेक्षा जास्त काम करतो ...
तरी माझ्या वाटयाला
अशी उपेक्षा का ..?
Sangita Bhalsing
तुझ्या अधीर मनात असते
अनुत्तरित प्रश्नांची मालिका ..
पण सदा लक्षात ठेव सखी
तूच माझ्या दिलाची मलिका ...
Sangita Bhalsing
लेखन माझे
विचार माझे ,
कागद माझा
पेनही माझा ..
भावना माझी
शब्दही माझे ,
चारोळी माझी
काव्यही माझे ..
मी ही तुझी
तू ही माझा ,
व्यक्त होताना
आक्षेप तुझा ..?
Sangita Bhalsing
बोलत नाहीस आजकाल
कसला आलाय एवढा राग ,
काय हवे सांग सखी तुला
निःसंकोचपणे हवे ते माग ...
Sangita Bhalsing
Ahilyanagar
Maharashtra
सुखात चळू नका
दुखात पळू नका ...
संकटी गळू नका
प्रयत्न टाळू नका ...
गरीबाला छळू नका
श्रीमंतावर जळू नका
यशाला हुरळू नका
अपयशी पोळू नका ...
Sangita Bhalsing
संगिता भालसिंग
एकांत
शेवटी एकांत बरा
नको कुणाचा पहारा ...
आपापले नशीब,सखी
नको कुणाचा सहारा ...
Sangita Bhalsing
मोठ्या मोठ्या डोळ्यानी
माझ्याशी नको बोलू ..
किती प्रेम आहे तुझ्यावर
हे दुसऱ्यावरुन नको तोलू ..
Sangita Bhalsing
आयुष्यभराची साथ,सखी
अशी मधेच सोडू नकोस ...
मृगजळाच्या मागे धावून
दिलेले वचन मोडू नकोस ...
Sangita Bhalsing
तिरका कटाक्ष टाकून
सुंदर हसणं,लाजणं ..
गेलीस काळीज तुडवून
बरं नव्हे सखी,तुझं वागणं ...
Sangita Bhalsing
अतुट प्रेमालाही असावी
मुलायम मर्यादित चौकट..
अमर प्रेमालाही नसावी
कोणतीही जटिल अट ....
Sangita Bhalsing
अस्थिर विचार का तुझे ,
पुढे मागे पाऊल पडते ...
काळजी नको करू सखी
जे घडायचे तेच घडते ...
Sangita Bhalsing
मोहक तुझी अदा
झालो ग मी फिदा ..
कातरवेळी भेटीचा
तोडू नकोस वादा ...
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
उंबरा
******************
नवरंगाने सजला असा
सुंदर घराचा उंबरा ...
पुसू नका,काळजी घ्या
हळूच जा बाजूने जरा ...
*******************
Sangita Bhalsing
आहे तिथे सुखी रहा
शुभेच्छा देतो भरभरून..
समाधानाने पाहीन दुरुन
पुढच्या जन्मीचा करार करून ...
Sangita Bhalsing
घेतले होते कधीकाळी
तुझ्या वरुन ओवाळून...
आज मात्र मनातील
प्रेमांकुर गेला जळून ...
Sangita Bhalsing
मेघा रे मेघा रे,माझ्या
सखीला निरोप दे रे ,
अमृताविना चालले
सुकून प्रेमाचे रोप रे ...
Sangita Bhalsing
जगावेगळे असे,सखी
काही नाही माझ्यात ,
फक्त विरघळून गेलो
साखरे सारखा तुझ्यात ...
Sangita Bhalsing
जमले नाही
स्वार्थ टाळण्याचे
अजून जमले नाही ..
परमार्थ साधण्याचे
अजून जमले नाही ..
Sangita Bhalsing
मी तुझा शब्द सखी
तूच माझी कविता ,
भरभरून वाहू दे ग
प्रेमकाव्य सरिता ...
Sangita Bhalsing
कातरवेळ...
सुगंध भरली ललाटरेषा
मौन नयने आसवे गाळी ,
आठवांची विणली जाळी
उदास हुरहुर कातरवेळी ...
Sangita Bhalsing
निळ्या सावळ्या ढगांचे
नृत्य रंगले अवकाशात ..
धावत धावत प्रेम सरी
उतरल्या अवनीवर साक्षात ...
Sangita Bhalsing
पसारा .....
घरातला काय ,
नि
मनातला काय ...
आवरावा लागतोच ..
कधी सहज
तर
कधी हेतुपूर्वक ...
नाहीतर
जबरदस्तीनेही ...
स्वच्छ करावा लागतो,
कोपरा नि कोपरा ....
घराचा नि मनाचा ...
पुन्हा पसारा करण्यासाठी.....
Sangita Bhalsing
मोठ्या मोठ्या डोळ्यात
नक्कीच काहीतरी दडलंय ...
सांग सखे,लाजू नको
घडलंय की बिघडलंय ...
Sangita Bhalsing
तुझ्याविना जगण्याची
नाहीच थोड़ीही हिंमत...
जरी तू देत नाहीस
प्रेम भावनेला किंमत ...
Sangita Bhalsing
spsfun.com
कवडसा तिरप्या उन्हाचा
गोऱ्यापान चेहऱ्यावर ,
रागावून चांदव्यावर
रवि आला पहाऱ्यावर ..
Sangita Bhalsing
spsfun.com
सांगू नको कुणाला
तुझं माझं नातं काय ?
नजर लागेल जगाची
जरा काळजी घेत जाय ..
Sangita Bhalsing
spsfun.com
जीव घायाळ होतो
जेंव्हा तू पहाते वळून ..
दोन शब्द बोल जरा
संधी जाईल टळून ..
Sangita Bhalsing
spsfun.com
किती वेळा विचारु
तुझं माझं नातं काय ?
खरं खरं बोलायला
सांग तुझं जातं काय ?
Sangita Bhalsing
spsfun.com
जीवन एक संघर्ष , पण
जगणं एक कला आहे ...
आचार विचार पायावर ,
उभा समाधान इमला आहे ...
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
दि.२२/०९/१६
लाडिक तुझा हट्ट
किती वेळा मिटवू ...
खूप खूप प्रेम आहे
हे कितीवेळा पटवू ...
Sangita Bhalsing
spsfun.com
आनंदाने ओलांड सखे
माझ्या घराचा उंबरा ...
काळजाच्या पायघडया
जाऊ सुखाच्या अंबरा ..
Sangita Bhalsing
spsfun.com
लाडिक तुझा हट्ट
किती वेळा मिटवू ...
खूप खूप प्रेम आहे
हे कितीवेळा घटवू ...
Sangita Bhalsing
spsfun.com
What's app
ग्रुप वर स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त रचना
_______________________________
सजनाच्या प्रेमात
हर्ष दाटला मनात ....
अलवार प्रेम सांगते
सजनाच्या कानात ....
****************
सौ.संगिता भालसिंग
द्वितीय क्रमांक प्राप्त रचना .....!!
वरहाड़ी कट्टा
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
धुंदावले तनमन,रोमांच शहारे ,
पावसात न्हाताना तुला भेटू वाटे .....
फुल तुला वाहून घेतो मला काटे ,
समर्पणानंद असा मिळेल का कोठे?
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
दि.१७/०९/१६
एकमत वर्तमान पत्रात साक्षी पुरवणी मधे माझी कविता प्रकाशित ...
💐
दि.15 ऑगस्ट 2017
"कोळ्याची पोर"
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
एकमत वर्तमान पत्रात साक्षी पुरवणी मधे माझी कविता प्रकाशित ....
💐
दि.29 ऑगस्ट 2017
किती ही गर्दी ?
💐💐💐💐💐
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
हल्ली खुप खुप
एकट वाटतं ..
अलवार मनात
काहुर पेटतं ...
डोळ्यात आभाळ
येऊन साठतं ..
उंच टोकदार
खिंडीत गाठतं ...
Sangita Bhalsing
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...