परिचय -
साहित्य ही कॅटेगरी वाचकांच्या विचारविश्वाला समृद्ध करणाऱ्या लेखनासाठी समर्पित आहे. या विभागात मराठी साहित्याचे विविध पैलू — चारोळी,कविता, कथा, निबंध, विचारलेख, प्रेरणादायी लिखाण तसेच शैक्षणिक दृष्टिकोनातून उपयुक्त साहित्य — वाचायला मिळेल. विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत आणि साहित्यप्रेमी वाचकांपर्यंत सर्वांसाठी ज्ञान, संवेदना व सर्जनशीलतेचा संगम साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. वाचनातून विचारांना नवी दिशा मिळावी आणि भाषेवरील प्रेम अधिक दृढ व्हावे, हाच या साहित्य विभागामागील उद्देश आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेची महती सांगताना म्हटले आहे —
“माझा मर्हाटाचि बोलू कवतिके । परी अमृतातेही पैजेसी जिंके ।”
या ओळी मराठी भाषेच्या थोरवीचे सर्वोच्च उदाहरण आहेत. माऊलींनी संस्कृतसारख्या विद्वानांची भाषा बाजूला ठेवून सामान्य जनतेसाठी मराठीतून ज्ञानामृत दिले. त्यांना ठाम विश्वास होता की मराठी भाषा केवळ भावनांचीच नव्हे, तर तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि ज्ञान मांडण्याचीही समर्थ भाषा आहे. म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ मराठीत लिहून मराठी भाषेला अमृतालाही मागे टाकणारे सामर्थ्य प्राप्त करून दिले. ज्ञानेश्वर माऊलींच्या लेखणीतून मराठी भाषा ही जनतेची, भक्तीची आणि ज्ञानाची भाषा ठरली आणि तिची थोरवी अजरामर झाली.
याच उदात्त हेतूने माझी लेखणी साहित्य सेवा करण्यास धजावली आहे. चारोळी, गझल, कविता वगैरे पद्य प्रकार आणि लेख, कथा वगैरे गद्य प्रकाराचा आस्वाद या ब्लॉगवर वाचकांना घेता येईल.
Sangita Bhalsing
Ahilyanagar
Maharashtra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.