मंगळवार, ३१ मे, २०१६

भेट

आज मंगळवार दि.३१ में २०१६ रोजी
एकमत वर्तमान पत्रातील "साक्षी"
पुरवणी मधे प्रकाशित रचना ...!

     " भेट "

प्रा.सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
spsfun.com

रविवार, २९ मे, २०१६

बाळकृष्ण

तृतीय क्रमांक प्राप्त रचना

🌻 बाळ कृष्ण 🌻
*****************
नंद दरबारी
आरसे बिलोरी
रांगताना पाही
नटखट हरी ...

नंदाच्या कान्हाला
टोचला ग खड़ा
यशोदेचा जीव
झाला थोडा थोडा ...

सावळा गोंडस
खोडील मुरारी
कवळाया धावे
दरबारी सारी ...

शिरी मोरपिस
वार्यावर डोले
हातीपायी वाळा
छुन छुन बोले ...

रांगत बसत
मागे पुढे पाही
हसत रडत
वाकुल्याही दावी ...

भरवित घास
यशोदा माऊली
नको म्हणूणीया
मुंडी हलविली ...

दमला भागला
पेंगाया लागला
कुशीत घेतला
अंगाई गायला ...

मिटल्या पापण्या
संपली अंगाई
गालात हसत
कान्हा झोपी जाई ...

***sps.fun ***********
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

हार

हार

विरहाच्या अग्नित
जे वार झाले
भेटीच्या मिठीत
ते हार झाले ...

सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
spsfun.com

जिंदगी

जिंदगी

शुक्रवार, २७ मे, २०१६

चाळीशी

चाळीशी

डोळ्याची चाळीशी
अचानक फुटली ...
अंधांची वेदना
मनाला भेटली ...

प्रा.सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर

सुखोंजळ

Good morning friends....!!

सुखोंजळ

दुःखाचे मूळ
दुसऱ्याकडे आहे
माझ्याकडे नाही ...

सुखाचे मूळ
दुसऱ्याकड़े नाही
माझ्याकडे आहे ...

मानवी खूळ
तुलना करीत राही
सुखोंजळ रिती राही ...

*******************
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
शुभ सकाळ

गुरुवार, २६ मे, २०१६

कोमल हात

श्वास

प्रतिबिंब

सखी

माया

विश्वास

प्रेम

बुधवार, २५ मे, २०१६

सुंदरी

***** सुंदरी *****
****************

रुसली की लाजली
का विचारात गढली
का अशी थिजली ...?
का प्रेम सागरी भिजली ...?

रूप गर्विता सुंदरी
किती लाजतेस तू ...?
गालातल्या गालात
किती हसतेस तू ...?

गुपित काय दडलय
तुझ्या गोड मनात
हळूच सांग् राणी
गुज माझ्या कानात ..!

भेट तुझी माझी स्मरते
अजुन त्या दिसाची ...
ईश्वराने दिलेल्या त्या
अविस्मरणीय क्षणांची ...

***************
प्रा.सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
spsfun.com
🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रकाशित रचना

आनंदाचे जीवनगीत

दैनिक लोकमन मधे 25में2016 रोजी
माझा प्रकाशित झालेला लेख

🌷 आनंदाचे जीवनगीत 🌷

बुधवार, ११ मे, २०१६

डंख

डंख

अदृश्य घाव उरात
झेलून येत आहे
नकार डंख परत
पेलून येत आहे ...

प्रा.सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
११ में२०१६

मंगळवार, १० मे, २०१६

माझी मुलाखत

मंगळवार दि.१०में२०१६ रोजी
एकमत वर्तमान पत्रात माझी
मुलाखत प्रकाशित झाली.

चित्रशलाका स्पर्धा भाग ०२


चित्रशलाका स्पर्धा भाग ०२ मधील
सर्व रचना ..

०१
जरी दुर गेलो भोळी माय
करण्यास परकी चाकरी....
स्मरण मज कण कण छेडे
कर माया, चुलीची भाकरी....

रोहिदास होले ......
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे.....
०१/०५/२०१६

०२
*******
हात थकलेला विचारी
चुलीवरच्या भाकरीला।
घाम गाळलेल्या श्रमाचे
मोल मिळाले का बळीला।

कवी सुजन

03
हाती असे हिरवा चुडा
खाली असे धगधग चुला
पोटी पडे जेव्हा भाकर
तृप्ती मिळे तेव्हा तुला।

मनिषा वाणी.
सुरत.०१/०५/२०१६.

०४

चटका तव्याचा
     श्रमीक हाताला
        खमंग भाकरी
           रिकाम्या पोटाला......

                -राम....

०५

चटका सहन करुन  माता
देई बाळाला  चविष्ट  भाकर
पाठवून तिला  वृद्धाश्रमात
करू नका निराधार
..................... वैशाली रा. रसाळ

०६

स्पर्धेसाठी चारोळी

आयुष्याच्या तव्यावर
कष्टाची भाजते भाकरी
प्रयत्नांचा घातला जाळ
नशिबाची करते चाकरी

© सौ. शशिकला बनकर, भोसरी, पुणे

०७

आई आणि भाकरी
वेगळी असत नाही
चटका खाऊन सर्वांचे
पोट भरत राही
~पृथ्वी
1मे2016

०८

भुकेली पाखरे आता येतील घराला
हाताच्या चटक्यांची इथे पर्वा कुणाला
घर भरले गोकुळ , सुख इथे ग नांदते
घराच्या सुखासाठी , माय भाकरी रांधते .

सुनीता भुजबळ

०९

भुक्या लेकरासाठी
किती राबे दिनरात
तव्यावर भाकरीला
तुझ्या मायेचा गं हात

हणमंतराव अवघडे

१०

स्पर्धेसाठी चारोळी

उन्हातान्हामंदी ऊर
भरून तीचा जाय
वितभर भूकेसाठी
जळती माझी माय

सौ.छाया रसाळ.अहमदनगर.

११

स्पर्धेसाठी चारोळी
----------------

कष्ट करून थकले
ही तरी जीर्ण शरीर
धगधगत्या चुलीवर
रांधते मायेची भाकर

विलास साळवे
विक्रोळी,मुंबई
९८२०५९६४७२
०१/०५/२०१६

१२

तुझ्या मायेची मिसळून पिठात साखर
किती प्रेमाने बनवतेस बाई भाकर
क्षुधा शमवून येते तृप्तीची खरी ढेकर
अमृताच्या चवीला आहे कष्टाची भर!
             शशी खंडाळकर पुणे.

१३

खुप काही मिळवल इथ
    आता रोजच खातोय तुप-साखर..
आजही तरसतय हे मन
     खावया आई तुझ्या हातची भाकर...

अजयभाई साळुंखे

१४

तुटक्या या चुलीवर
माय भाकर भाजते
भुकेलेल्या लेकरांसाठी
धगीचे चटकेही सोसते

प्राची देशपांडे

१५

==== स्पर्धेसाठी ====

अंतरबाह्य चटके सोसुन ,

माय देई पोटास भाकरी .

मजला छप्पन भोगांहुन ,

श्रेष्ठ तुझी अमृत न्याहरी .

===ॐनिल पाटील===

१६

माय

पाची बोटानी भाकरीवर
पाणी लावते कष्टाळू माय ...
बांगड्यांच्या चटक्यावर
लेकरांच्या मायेची साय ...

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
०२ में २०१६
स्पर्धेत नाही

१७

तापलेल्या तव्यावर

खमंग भाजली भाकरी !!

दोन वेळेच्या घासासाठी

किती करावी चाकरी !! 1 !!

प्रशांत खडसे पाटील
2/5/2016

१८

तव्यातल्या भाकरीत
प्रेम माय ने ग ओतल
भुकेल्या  लेकराला
प्रेमान जेवु तिने घातल

        सौ.शुभांगी धारमळकर,पुणे

१९

चुलीवरल्या भाकरीची चव,
गॅस वरल्या पोळीला नाय.
मायेन रांधून वाढत होती,
राहिली न आता, माझी माय.

..............निलिमा देशपांडे.

२०

मानत नाही कुटूंबाला आपला भार
चुलीचा जाळ होई सकलांचा आधार
गोल भाकरी करी काळजात चरॅऽरॅ
सतत चिंता कसा होई सुखी संसार.

सुलभा कुलकणीॅ.

२१

चित्रशलाका...
स्पर्धेसाठी चारोळी...

तापलेल्या तव्यावर,
माय भाकर भाजते।।
चिल्यापिल्यांच्या साठी,
माय उपाशीचं निजते।।

✒अनिल लांडगे उंडणगाव,
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050/9021261820

२२

चित्रशलाका स्पर्धा -2

         'भाकर' !
चटके सोसत संसार तव्यावर
   खाऊ घालतेस आयुष्याची 'भाकर' ,
     विसरु कसे 'आई' तुझे उपकार
       मारीन तुझ्यासाठी जगाला 'ठोकर' !!!
. . . . .

कवी चंद्रवर्धन लांडगे
आटपाडी जि सांगली

२३

ज्वारीची खरपूस भाकरी ,
चुलीच्या निखाऱ्या वर।
आईचे प्रेम वाढवी गोडी
पाची पक्वान्नाला नाही सर!

   प्रा सौ शांता ठुबे
स्पर्धेसाठी 2/5/2016

२४

गोल गोल भाकरी
तव्यावरती शेकली
आग  विझवण्यास
जन्मभर ती  राबली

संगीता देशपांडे

२५

गरीबांच पोट  बाई
तव्यावर  ते शेकते
लावून उतरंडीन ते
सजवुन  मी ठेवते

शिरीष   देशमुख

२६

चित्रशलाका

"चुलीत लाकूड जळल्याशिवाय
भाकर भाजत नाही,
कुटुंबात बाई  झटल्याशिवाय
संसार सजत नाही"
   -संगीता देशमुख,वसमत

२७

चुलीवरच्या भाकरीन ,
जळतोय माझ्या माय चा हात....!!!
संसाराच्या व्यापासाठी,
दुष्काळावर करते ती मात...!!!
...    ......कुल कुणाल
पोलादपुर, रायगड

२८

सुगरणीची अग्नी परीक्षा
नेहमीच घेते धगधगतीही चूल
चटक्यांची पर्वा इथे कुणाला
भुकेनी व्याकुळ माझे मुल

    * सौं सुरेखा गुर्जर *
२९

स्पर्धेसाठी चारोळी

प्रगतीचे उंचच उंच शिखर गाठलंय
खातोय रोज पिझ्झा अन् बर्गर
आई !तुझ्या हातच्या चुलीवरच्या भाकरीची
कधीच येत नाही गं त्याला सर !

      संगीता भांडवले

३०

निखाऱ्यावर तप्त चुलीच्या
भाकरी खरपूस भाजते...!
चटक्यांची कुठे पर्वा तिला
माय लेकरांस्तव राबते....!
     ,,,,,,,प्रल्हाद दुधाळ.

३१

चित्रशलाका स्पर्धेसाठीची माझी चारोळी
                
              ~माय~
   
      "धग इस्तवाची सोसत
        माय थापते भाकर ...
        मायासाठी 'कोहिनूर',
        तुया हाताचा 'बिल्लोर'....!!"
      
                कवी अनिकेत देशमुख
                   (पाऊलखुणाकार )
               गोपालखेड  जि. अकोला
                 Mo 9689634332
               copyright 03 मे 2016

३२

कधी बर्गर तर
कधी खाशी पिझ्झा रे...........
मायच्या भाकरीची चव
कशातच नाय रे .........

____ स्मिता प्रशांत
3.5.2016

३३

माय तुझ्या हाताला
चव अमृताची ।
फेडण्या पांग जन्म घ्यावा तुझ्याच पोटी
मागणी मज पामराची ।।

नरेंद्र म्हस्के , शिरपूर ( धुळे )

३४

इवलीशी चुल विस्तवाची धग,
काळजात धरते...
अन् पोटाची आग मिटवाया,
माय माझी कष्टाची भाकरी शेकीवतेे..

कांचन शिंदे

३५

आगीचे चटके सोशीत
=============
===SANAND===

आगीचे चटके सोशीत
भाकरी करीन  खुशीत,
कष्टाची किमया चवीत
खाईन  घरचे   जोमात.
.........संजय अंद्रस्कर

===SANAND===
=============
04/05/2016

३६

थापते तव्यावर भाकर कंकण रवाने
धगीने खुसखुशीत होण्या मायेच्या स्पर्शाने।
तमा नाही चटक्यांची लेकर प्रेमाने
साधे यज्ञकर्म भाकर नवनीताच्या गोळ्याने।।

सुधीर बेंद्रे

३७

नमस्कार  ,,,,,, सर्व स्पर्धकांना आणि धन्यवाद संयोजकांचे  ,,,,,,
चित्र शलाका क्र. 2  ,,,,,,

धगधगती चुलीतील ज्वाला
दारी जसा तुझा कष्ट सोहळा ...!!
तुझ्या हातची अमृत भाकर
शीतल चंदन विठाईचा टिळा ...!!.....अंजली अंजली. ......

३८

तवा , चुलीवर म्या मांडली,
सपान माह्या सुखी संसाराचे...
हाती मोठाले फोड उमटली ,
चटके गाथा सांगे जीवनाचे.

...सौ. शितल  हर्षल  संखे .....

३९
चव आईच्या मायेची
उतरे त्या भाकरीत
पैका देऊन ती चव
नाही मिळे बाजारात.

अजित करंबेलकर

४०

संसाराची धग
लागते  हिरव्या चुड्याला
अन्नपुर्णेचे तुझे रूप
अमृताची चव हाताला

आशा ठिपसे

४१

धगधगत्या आगीवर
सत्वगूणाची भाकर ...
हात फिरवता मायेने
येते आनंदाची ढेकर.

संगिता अंबोले

४२

जाळासंग मन बी धगधगत गं माय,
शेकणाऱ्या भाकरीला तुझ्या हाताची गं सय.!!
आग पोटात, बघून तुझ्या भाजल्या बोटाला,
भाकर निघाली तव्याहून ताटाच्या भेटीला...!!

सौ. मनीषा निपाणीकर
लातूर

४३

भाजला तर भाजुदे हात माझा ,
या भाकारीच्या धगीला .
उघड्यावर संसार माझा जरी ,
खेचून आनिन आनंदाच्या सुगिला .
.....राम....

४४

स्पर्धा क्रमांक 2
1 ते 5 मे, 2016

नको चंद्राची उपमा,
अन् त्याच्यावरचा डाग
आईचा हात फिरता तव्यावर,
विझे पिल्लाच्या पोटाची आग

गुरुदत्त वाकदेकर, मुंबई
दिनांक - 5 मे, 2016

४५
आली तुझी आठवण
  हात तव्यावर भाजला 
आई तुझी शिकवण 
चंद्र भाकरीत हसला......

sudrshana jadhav...

४६

-----------------
चुलीवर भाकरी शेकताना
फूले समजूनी निखारे झेलले
चटके तव्यावरले सहन करत
ओझे संसाराचे एकटीने पेलले
--------------------
                     - मारुती खुडे
                          माहुर,नांदेड

४७

"घालून हातात चुडा हिरवा,
मांडून तव्यावर भाकरीचा थाट..
तृप्त करीसी सर्व जगताला,
तूझ्यात अण्णपूर्णेचा वहिवाट".
              
          सौ.किरण पिंपळशेंडे
               नागपूर

४८

परीक्षक कवी नरसिंग इंगळे

पुनवेचा चाद फिका,
माय तुझी भाकर !
तू सोसून चटके,
पोशिले हो लेकरं !
उघडी चुल तुझी ,
तू जाळीले लाकडं,
माय तुझं सपन ,
उगड अन् नागडं !



सोमवार, ९ मे, २०१६

कर्मवीर

प्रथम क्रमांक प्राप्त रचना ...

दलितांसाठी झिजली काया
ज्ञानशक्ती पीठाचा धर्मवीर ...
प्रबोधनाचे पंख लेवुनी
झाले भाऊराव कर्मवीर ...

सौ.संगिता भालसिंग
5/5/15

रविवार, ८ मे, २०१६

प्रेमझुला

प्रेमझुला

अतूट जोड़ी तुझी माझी
असावी जन्मोंजन्मीची ...
काळजाच्या प्रेमझुल्यात
नजर लागो न कुणाची ...

प्रा.सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
०८में२०१६
spsfun.com

विठ्ठल विठ्ठल

🌷 विठ्ठल विठ्ठल 🌷

विठ्ठल दिसावा ||
विठ्ठल विसावा ||
विठ्ठल रुजावा ||
जीवभाव.....||

हाक ती वारीची ||
पाऊले निघाली ||
जीवाला लागली ||
विठु ओढ़ ....||

मृदंगाचा दंगा ||
नामाचा गजर ||
प्रेमाचा बहर ||
पंढरीत ....||

विठुची पंढरी ||
लालेलाल झाली ||
फुले उधळली ||
गुलाबाची ....||

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
Copyright
21/5/15

🌷🌷🌷🌷🌷

बुधवार, ४ मे, २०१६

सप्तरंग

सप्तरंग

सप्तरंग असो
सुंदर जीवनी
सदा वसो मनी
इंद्रधनु ..

सुख अन् दुःख
जीवनाचा खेळ
अस्थिर ती वेळ
गतिशील .....

उन्हा पावसाचा
आनंद तो घ्यावा
सामोरे ते जावा
संकटाला ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
3/5/15

मंगळवार, ३ मे, २०१६

क्षण

क्षण

तुझा कोमल हात
माझ्या हातात होता
किती विश्वासाने तू
घट्ट धरला होता ...

बंद पापण्यातले स्वप्न
माझ्या सवे पाहत होती
हात कधी सोडणार नाही
याची तुला खात्री होती ...

मनीचे गुज सांगताना
आनंदाने हसत होती
आयुष्य सुंदर आहे
समजल्याने फुलत होती ...

आज मात्र रुसुन बसली
कुठेतरी दडून बसली आहे
सहवास क्षण आठवून
रोमरोमात बसली आहे ...

सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
०३ में २०१६
Copyright
Good night
spsfun.com

सोमवार, २ मे, २०१६

चिमणी अणि माकड

🌻 चिमणी अणि माकड 🌻
••••••••••••••••••••••••••••••
एका झाडावर एक
चिमणी राहात होती ...
रात्रंदिवस सोबत तिला
माकड़ाची होती ...

चिमणीचे घरटे खुप
सुंदर होते ..
माकडाला मात्र
घरच नव्हते ...

उन्हाळ्यात खुप
उन लागत असे
पावसाळ्यात खुप
पाऊस लागत असे

हिवाळयात खुप
कुडकुडत असे
चिमणी त्याचे हाल
पहात असे ...

घर बांधण्याचा उपदेश
सतत चिमणीने केला ..
माकड़ खुप वैतागले
पण निवारा नाही केला

चिमणीचा उपदेश
माकडाला खटकले
रागावून चिमणीचे
घरटेच उखडले ••••
•••••••
तात्पर्य _
फुकटचा उपदेश
कोणाला देऊ नये अणि
स्वतः चे नुकसान करुन
घेऊ नये •••
•••••••••••••••••••••••
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
शुभ प्रभात
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

रविवार, १ मे, २०१६

महाराष्ट्र

🌹 महाराष्ट्र 🌹

संपन्न परंपरा
महान संतांची
उत्तम पंतांची
महाराष्ट्र ...

मंगल पवित्र
नद्यांचा संगम
असे सुजलाम्
महाराष्ट्र ...

क्षत्रिय काटक
दऱ्या खोऱ्यात
शोभतो तुऱ्यात
महाराष्ट्र ...

भारत मातेचे
बाळ आवडते
कुशीत खेळते
महाराष्ट्र ...

इतिहास मोठा
प्रिय स्वराज्याचा
राजा शिवबाचा
महाराष्ट्र ...

कस्तुरी सुगंध
मराठी मातीचा
टिळा कपाळीचा
महाराष्ट ...

प्रा. सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
०१ में २०१६

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...