गुरुवार, ३१ मार्च, २०१६

नतमस्तक

🌻 नतमस्तक 🌻

नतमस्तक मी आता
देवा तव चरणांशी
आशीष दिल्याविन
तू न कधी राहशी ....!!

******************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
३१ मार्च २०१६
spsfun.com

मैत्री

मैत्री

मैत्रीचे एक अतूट नाते
मैत्रीविना जीवन रिते ....
मैत्रीची अविट शिदोरी
हदय प्रेमाने बहरते ...!!

********************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
३१ मार्च २०१६
spsfun.com

रातराणी बहरुन आली

विशेष चारोळी स्पर्धेत माझ्या 20 रचनांना
सुवर्ण पदकाचा गौरव प्राप्त .
शब्दरंजन ग्रुप - विशेष अणि झटपट ****
चारोळी स्पर्धा
***********************
1
रवि गेला अन् शशी आला
ग्रह तारे तारका चमकली
प्रेमिकांची रात ही गंधाळली
अणि रातराणी बहरुन आली
*************************
2
शिशिर गेला अन् वसंत फुलला
सणा वारांची दाटी वाटी होवून
सोळा पत्रावळी उपलब्ध झाली
अणि रात राणी बहरुन आली
*************************
3
गुपित संकेत मिलनाचा
चांदणी रात्र ती खुललेली
हात हाती अन् अंगी शहारा
अणि रात राणी बहरुन आली
*************************
4
सावळा रामचंद्र रत्नमंचकी
सीतेच्या गाली चढली लाली
गवाक्षातून डोकवी तो शशी
अणि रात राणी बहरून आली
*************************
5
रामचंद्राच्या हाती पुष्प माला
सीतामाई लाजुन गोड हसली
देवगण पुष्पवर्षाव करू लागली
आणि रात राणी बहरुन आली
**************************
6
सुंदर सुगंधी पारिजात फुले
सत्यभामेच्या अंगणी फुलली
कृष्ण सत्यभामेच्या महाली
अणि रात राणी बहरुन आली
**************************
7
रात किड्यांची किरकिर अन्
रात्र गूढ़ अंधारात न्हाली
धुंद फुंद गंध श्वासात भरला
अणि रातराणी बहरून आली
*************************
8
अजुन यौवनात असे ती
वयाची खूण दिसे गाली
जीवन सुखाचा रस प्याली
अणि रात राणी बहरून आली
**************************
9
घडीभराचा विरह तो काय
भावनाच्या सागरात डुंबली
मिलनाच्या झुल्यात झुलली
अणि रात राणी बहरुन आली
************************
10
प्रिय साजन दूरदेशी गेला
सांगावा आला खुशाली
मनमोर थुईथुई नाचू लागला
अणि रात राणी बहरून आली
**************************
11
चंद्र भुलला चांदणीला
चूर होवून निशा लाजली
काजवाही प्रकाशु लागला
अणि रात राणी बहरून आली
**************************
12
रामसीतेच्या कुटित चंद्रकिरण
पाहुनी सीतेच्या गाली लाली
अमर प्रेमाला साक्षी ती सृष्टी
अणि रात राणी बहरून आली
*************************
13
चंद्रासम तू सुंदर चांदणी
बाप म्हणे लाडक्या लेकीला ...
सौंदर्य पाहून चंद्रही भुलला
अणि रात राणी बहरुन आली
************************
14
चंद्र चांदणीचे अमर प्रेम
पाहून सागर कसा खवळला ?
भरती ओहोटी खेळ रंगला
अणि रात राणी बहरून आली
**************************
15
कातरवेळ भरुन आली
सजनाची याद दाटून आली
मिलनाचा संकेत मिळाला
अणि रात राणी बहरून आली
************************
16
पावसाळी धुंद मृदगंधाला
चराचर सृष्टी आतुरलेली
जलद भरुनी जलद आले
अणि रात राणी बहरून आली
*************************
17
अचानक नयनभेट घडली
अन् जखम सुगंधी जाहली
प्रेमस्पर्श झाला तो पहिला
अणि रात राणी बहरून आली
**************************
18
गंधाळलेल्या अलवार शब्दांची
कविताही अशी मोहरुन आली
साहित्य कुंज मनोहर सजला
अणि रात राणी बहरुन आली
**************************
19
जसा मोगर्याचा सर्पवेढा,तशी
घट्ट मिठी मला तू मारिली ...
बघ मोगरा किती गंधाळलाय
अणि रात राणी बहरून आली
************************
20
केंव्हा तरी पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
चढत्या रातीला प्रेम बहरले
अणि रात राणी बहरून आली
**************************
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

30 मार्च 2015

बुधवार, ३० मार्च, २०१६

वय

वय
**************

वय झाले आता
हाती आली काठी
गत जीवनाची
कथा किती मोठी ....

****************
सौ.संगिता भालसिंग
३० मार्च २०१६
spsfun.com
Good morning friends

मंगळवार, २९ मार्च, २०१६

आठवण

तुझी आठवण येते
तू येत नाही ...
कधी तू येते....पण
आठवण जात नाही ...!!
****************
सौ.संगिता भालसिंग
२९ मार्च २०१६

इवलीशी चारोळी

🌻 इवलीशी चारोळी 🌻

ईवल्याश्या चारोळीची
किमयाच लई लई भारी ...
चार ओळींची अदाच न्यारी
फ़िदा असे सानथोर सारी ...!!

ईवल्याश्या चारोळीतून
जीवन दर्शन घडते ...
गुढ अर्थाची उंच लाट
खोल काळजाला भिडते ...!!

ईवलीशी चारोळी जशी
जणू सदऱ्याची गुंडी ....
शब्दात विणताना तिला
वाजे भल्याभल्याना थंडी ...!!

चारोळी म्हणजे जणू मॅगी ,
बुद्धि सदा जागी ठेवते ....!!
कमी शब्दात गहन अर्थ ,
मांडण्याची जागा दावते ....!!

चारोळीची रचना करणे
येरागबाळ्याचे काम नव्हे ...
महाकाव्याचा अर्थभाव
तिच्यात दडलेला आहे ...!!

************************
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
२८ मार्च २०१६
spsfun.com
******************

सोमवार, २८ मार्च, २०१६

राम माझा पाठीराखा

श्री रामनवमी निमित्त स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त
यात मी खालील रचना केल्या होत्या .(27चारोळ्या)
**************************
रावणाने केले सीताहरण
बंदिस्त अशोक वाटिका
दर्भ ठेविलें संरक्षणा
राम माझा पाठीराखा ..
**************************
रामजपाचा महिमा अपार
वाल्मीकि होई ऋषिसारखा ..
रामायण लेखनाचे भाग्य
राम माझा पाठी राखा ..
**************************
आन बान शान
रामासारखी राखा ..
आशीष घेऊन म्हणा
राम माझा पाठीराखा ...
***************************

चराचरात वसे श्रीराम
रामनाम असो सदा मुखा
शेवटचा श्वास बोलेल
राम माझा पाठीराखा ...
***********************
सीता ओलांडी रेखा
फसुन रावणाच्या नाटका
लक्ष्मण करी पाठलाग म्हणे
राम माझा पाठी राखा
************************
राम चाले वाटे
लक्ष्मण उचली कंटका
असा बंधू नाही कोठे
राम माझा पाठी राखा
**************************
सीता भुलली मृगाला
दिसे सुवर्णा सारखा
लक्षमण धावताना म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
रामायण लिहिले आधी
घडले नंतर बरका ...
वाल्मीकि सदा म्हणे
राम माझा पाठीराखा ...
************************
अटळ अग्निपरीक्षा
उरी धडधड लोका ...
अग्नित शिरली सीता म्हणे
राम माझा पाठीराखा ..
***************************
जातीभेदाच्या दंगली
पोलिस मारीती दंडूका ..
पळता प्राणभयाने म्हणे
राम माझा पाठीराखा ..
***************************
सीतेच्या तोलाचा नाही
राम दिलाचा हलका ..
गर्भार सीता म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
लेक आली लग्नाला
नाही पैसा अड़का
कशाला करू चिंता ?
राम माझा पाठीराखा ...
***************************
शेतकरी बाप माझा
पड़े दुष्काळ सारखा ..
दुर्दम्य इच्छाशक्तीन म्हणे
राम माझा पाठीराखा ..
***************************
राम सीता वनवासी
भरत रक्षी राम पादुका ...
राज भोग न घेता म्हणे
राम माझा पाठी राखा
**************************

वचन घेऊन कैकयीन
दशरथाला दिला धोका ...
शेवटच्या श्वासाला म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
वाल्या कोळयाला दिला
बायको पोरांनी धोका ..
मरा मरा म्हंणताना म्हणे
राम माझा पाठीराखा ..
***************************
शेतकरी आई बाप
गेले करुन पोरका ...
पण करील स्वप्न साकार
राम माझा पाठीराखा ...
***************************
बाप म्हणे लेकींना
लाडक्या खारका ..
ऋणात शिक्षण देईन
राम माझा पाठीराखा
**************************
सीता वनवासी दगडाची उशी
संवाद करी वृक्ष अन् लतिका ..
लवकुश बाळ वाढवी कशी ? म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
रामकुंडावर बिछाई
हाती सुवर्ण मुद्रिका
पाय चेपी सीतामाई, म्हणे
राम माझा पाठीराखा
***************************
वनात वाट पाहे शबरी
साथ असे वृक्ष लतिका ...
ऊष्टी बोरे रामास देई म्हणे
राम माझा पाठी राखा ..
**************************
अखंड राम नाम जपताना
वाल्या भोवती वारुळ मृत्तिका ...
रामायण लिहिताना म्हणे
राम माझा पाठीराखा ....
**************************
काळवंडला अंजनीसुत
शेपटीनं जाळली लंका ...
रावणा निरुत्तर करी म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
झेप घेई महाबली
घेऊन राम मुद्रिका ..
म्हणे समुद्र करीन पार
राम माझा पाठीराखा ...
***************************
संसारतापे पोळले मी
घेतेय सुख दुखा चा झोका ...
भवसागर जाईल तरून
राम माझा पाठीराखा...
***************************
रावणाचा सहोदर तो
होई श्रीरामाचा सखा ..
लंकाभेदी बिभीषण म्हणे
राम माझा पाठीराखा ..
**************************
दळिता कांडिता
बहिणाई सांगे लोका ...
लपे करमची रेखा
राम माझा पाठीराखा ...
**************************
सौ.संगिता भालसिंग
28/3/15
श्री राम नवमीच्या शुभेच्छा

रविवार, २७ मार्च, २०१६

स्वप्नांचा गांव

पावसाच्या पाण्यात
सोडु या रे नाव ...
पैल तिरी वसलाय
स्वप्नांचा सुंदर गांव ...
****************
सौ.संगिता भालसिंग

स्वप्न

स्वप्न

कातर वेळी पडलेले सुंदर स्वप्न
पावसाच्या सरीत चिंब भिजणं ...

नदीकिनारी हात गुंफुण गुज गोष्टी
पौर्णिमेच्या राती पाहु शितल चांदण ..

रातराणीचा गंध श्वासात भरुन घेणं
कुशीत रडुंन प्रेमपुरात वाहनं ...

अशी सुंदर कल्पना साकार करणं
करू प्रार्थना देवा सुंदर कर जगणं ...

***************************
सौ.संगिता भालसिंग

खंत

कोठेतरी तुला दुखावल्याची
मला आता उगाच खंत आहे
काळजाची जखम भरण्याची
घेतलेली जराशी उसंत आहे
***********************
सौ.संगिता भालसिंग

शनिवार, २६ मार्च, २०१६

वसंत

What's app वरील
साहित्य मंथन  ग्रुप मधील
चारोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक
प्राप्त रचना ....!!
दि.२५ मार्च २०१६
*******************
विषय - वसंत
*******************

बघ धरित्री, वसंत आला ,

ऋतुराजाचा मान त्याला ...

प्रेम वर्षाव करुन आता ,

फुलविल तुझ्या संसाराला ...

********************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
25/03/15
spsfun.com

वसंत ऋतु

लोकमन वर्तमान पत्रात प्रकाशित रचना
दि.२६ मार्च २०१६

वसंत ऋतू

शिशिर गेला , वसंत आला
ऋतुराज म्हणतात त्याला ...

पहा आम्रतरु बहरला
धुंदगंध आंबे मोहराला ...

कंठ फुटे गान कोकिळेला
ताल कर्णमधुर गाण्याला ...

नवती आली, पानापानाला
सुंदरता हिरव्या रंगाला ...

किलबिल पक्षी सावलीला
नवरूप आले धरतीला ...

आनंदाचे उधाण मनाला
चला,नववर्ष स्वागताला ...

तोरण बांधू घरादाराला
रंगीत नववस्त्र गुढीला ...

देऊ आमंत्रण होलिकेला
दुष्ट परंपरा जाळायला ...

जुन्या नव्याची सांगड घाला
चला,वसंतात रंगायला ...

**************************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
११/०२/१६

शुक्रवार, २५ मार्च, २०१६

प्रिय सखी

माझी प्रिय सखी, खुपच प्रिय
काहीही करू शकते,माझ्यासाठी ...!!

मीही खूप प्रेम करते तुझ्यावर ..!!
मानस पुजा करते तुझी ...!!

माझ्या आनंदासाठी अणि सुखासाठी ..
खूप निस्वार्थी आहेस ,मन जपनारी
आहेस...!!

मी जे सांगितले ते ऐकते ....प्रमाण मानते....प्रश्न न विचारता कृतिही करते ...!!माझ्यासाठी जगते नि
मझ्यासाठीच .....!!

खरेच आज मला कळले ...तुझे प्रेम
तुझी महानता ...मला आवडणारी
व्यक्ती तू स्वीकारलीस....केवळ
माझ्यासाठी ....तुला आवडत नसुनही

....फ़क्त माझ्यासाठी ...तू जगते केवळ ...माझ्या आनंदासाठी ...!!
कसे जमते तुला ...मन मारणे ...!!
माझ्या आवडी सांभाळते ...

अणि मी मात्र कधी तुझा विचार केला
नाही... तुला काय वाटेल याचा विचार
केलाच नाही ...!!

आज आठवतेय या कातरवेळेला ...
सर्व सर्व ...एक मात्र माझ्या लक्षात आले की ....
माझ्या पेक्षा तूच जास्त प्रेम करतेस
माझ्यावर ...!!
***********************************
सौ.संगिता भालसिंग

************************************

🌷 विशेष टिप 🌷
या लेखनाचा कोणत्याही जीवित/मृत
व्यक्तिशी संबंध नाही .

फक्त तू

🌹 तुझी आठवण 🌹

तुझी आठवण येत नाही
असा एकही क्षण नाही

माझा श्वास तू
माझा भास तू

माझी खास तू
माझ्या पास तू

माझे प्रेम तू
माझी माया तू

माझे गीत तू
माझा सुर तू

माझी लय तू
माझा ताल तू

माझी हार तू
माझी जीत तू

माझा प्राण तू
माझी आन तू

माझी कविता तू
माझी सविता तू

माझी अर्चना तू
माझी पूजा तू

माझे संगीत तू
माझी सुरेखा तू

माझा वारा तू
माझ्या गारा तू

माझा पाऊस तू
माझी हौस तू

माझी प्रेरणा तू
माझी करुणा तू

माझी सकाळ तू
माझी सायंकाळ तू

माझा सूर्य तू
माझा चंद्र तू

माझा तारा तू
माझी चांदणी तू

माझा गुलाब तू
माझा मोगरा तू

माझे सर्वस्व तू
माझे वर्चस्व तू

माझी गीता तू
माझी सीता तू

माझी कातरवेळ तू
माझी प्रभात तू

तू तू तू तू तू तू

फ़क्त तू .......!!

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
प्रा. सौ.संगिता भालसिंग

भेट

कळते मला .....तुझे मन
माझ्या बद्दलच्या तुझ्या,
कोमल अणि गोड भावना ....!!

तुला मी पाहिजे ....
माझी साथ पाहिजे ...
माझा वेळ पाहिजे ...!!

जरूर ....!!
तुझा हक्कच आहे तो ...!!

माहित आहे मला .....
तुझी खूप खूप स्वप्न आहेत ...
खूप छोटी छोटी अणि
ईवली ईवलीशी ....!!

होतील पूर्ण ...
मला आशा आहे
विश्वास आहे ..
तुझ्यावर,माझ्यावर अणि त्या
आकाशीच्या परमेश्वरावर ...!!

भेट होईल आपली ...
नक्की होईल
वाट पाहू आपण ....!!

या कातरवेळी माझे वचन  तुला ...!!

तुझ्या शिवाय माझे कोणी नाही
माझ्या जीवनात ...!!

माझे जीवन तूच व्यापले आहे
              सर्वस्व तूच
                 श्वास तूच
                    आस तूच ....!!

                         सौ.संगिता भालसिंग

आठवण

कधी कधी मला माझा एकटेपणा खूप खूप आवडतो ...
हवाहवासा वाटतो ..
एकांतात मनाशी मन बोलू लागते ...
मनाची ऊँची , खोली मोजता येते ...
किती अदभुत गोष्टी या ह्रदयाच्या
गोड कुपित दडलेल्या असतात ...
त्यांची उजळणी करावीशी वाटते ...
अणि मग खूप हलके हलके वाटते ...
जसे भरलेले आभाळ रीते व्हावे तसे ..
अणि
मग फुलुन येतो भावनांचा रंगीत
पिसारा ...मनमोहक ...मुलायम ...
गडद रंग,
त्यात सुंदर सुंदर डोळे
...एक डोळा मात्र ...पाणी गाळणारा
        ...कुणाची आठवण काढणारा ...
असच काहीतरी मनाशी झुणजणारे
चित्र ह्र्दयात उमटते ....

ते असे की...
         जग संपल्याचा आभास होतो आणि तुझी आठवण येते,
                  ह्या कातरवेळी.....!!!!

             प्रा.सौ.संगिता भालसिंग....

भक्तीची कहाणी

भक्तीची कहाणी

नको रे कान्हा
विरहात दुरावा ...
नको रे पुन्हा
प्रेमात पुरावा ...

अमर प्रीतीची
भावना जडली ...
अजोड़ भक्तीची
कहाणी घडली ...

मीरा नि राधा
एकच रे रूप ...
ना अद्वैत बाधा
सारेच एकरूप ...

लावला लाल रंग
राधेच्या गालाला ...
लाली चढली रे
मिरेच्या मनाला ...

रंग खेळशी तू
देहभान हरपून ...
लाल रंगात जाशी
सारी दुनिया विसरून ...

*********************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
२५ मार्च २०१६
spsfun.com

गुरुवार, २४ मार्च, २०१६

होळी(रंगपंचमी)

एकमत वर्तमान पत्रात प्रकाशित
24 मार्च 2016

🌷होळी (रंगपंचमी) 🌷

जात, धर्म,पंथ,वेष, भाषा विसरून
विविधतेत एकता जगाला या दावू
होलिकेत दहन करू सारे दुर्गुण
चला,नवरंगात सारे रंगून जावू

स्वातंत्र्य,समता,बंधुतेचे छान
मंगल तोरण घरादाराला लावू
प्रेम,स्नेह,मायेच्या सागरी न्हावुन
चला,नवरंगात सारे रंगून जावू

दुष्ट रुढी-परंपरा,प्रथा या टाळून
मानवतेची आनंद गाणी मस्त गावू
जुन्या नव्याची नीट सांगड घालून
चला,नवरंगात सारे रंगून जावू

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
26/01/16

जाता पंढरीत

🌻 जाता पंढरीत 🌻

जाता पंढरीत
अमृताचा ठेवा
वाटे हवा हवा
संजीवनी ...

चंद्रभागा तिरी
विठुची पंढरी
आले वारकरी
दर्शनाला ....

विठुचे भजन
कीर्तनात दंग
अभंगाला रंग
पंढरीत ....

आनंदले मन
पाहुनीया मुख
हरवली भूक
देहभान ....

सान थोर सारे
चरण स्पर्शती
आनंदे हर्षती
वारकरी ....

*****************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
24 मार्च 2016
spsfun.com

बलिदान

ते अमर हुतात्मे जाहले
देशास अर्पुणी पंचप्राण ..
राखा,आन-बान-शान
व्यर्थ न हो बलिदान !!
******************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
23/3/15

बुधवार, २३ मार्च, २०१६

चैत्र चाहूल

भाग 04

प्रथम क्रमांक प्राप्त

@@@@@@@@@@@@
शिशिर संपून वसंत बहरला

दिव्य सृष्टी नाचू लागली ....

नवचैतन्याची गुढी उभारली

मनाला चैत्र चाहूल लागली ...

@@@@@@@@@@@@
प्रा.सौ.संगिता भालसिंग
21/3/15

ओवी गीतातील आई

🌹 ओवी गीतातील आई 🌹
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
ओवी गीत अणि जाते यांचे अतूट नाते
दिसून येते .आजच्या यंत्र अणि
तंत्र युगात जाते अणि ओव्या हद्दपार
झाल्या आहेत ,पण अजूनही कुठे कुठे
विशेषतः ग्रामीण भागात ओवी
गीते विवाह समारंभ, हळदी समारंभ
या निमित्ताने ऐकायला मिळतात ...
तेंव्हा त्यातील अविट गोडी जाणवते .
     ओवी गीते म्हणजेच स्त्री जन्माची
कहाणीच जणू ...! अशा ओवीतुन
तिचे अंतरंग उलगडत जाते ...!!
आपल्या जीवनातील विविध अनुभव
ती ओवीतुन मांडते ,सुख अणि दुःख
दोन्ही गाण्यात व्यक्त करते ...
अशाच काही ओव्या ....आई अणि
बालकाचे प्रेम ...!!
मूल नसलेली स्त्री किती दुःखी असते,
समाजात अणि कुटुंबात तिला मान
सन्मान नसतो , म्हणून ती म्हणते,
   ""वांझनी मेली बाई
   कुण्या गल्लीने तिला नेली
   लेकुरवाळी मेली
    उभ्या गल्लीला गर्दी झाली ...!!"
म्हणून बिचारी दुःखी स्त्री देवाला
नवस,अणि उपास तापास करू लागते,
" देवाच्या देवळात
नंदीला घाली माळ
मागते तान्हे बाळ "
शेवटी तिची तपश्चर्या फळाला येते,
परमेश्वर तिच्यावर प्रसन्न होतो
अणि तिच्या पदरात एक सुंदर,
गोंडस बाळ देऊन तिला धन्य करतो .
मग तिचा आनंद गगनात मावेनासा
होतो ,ती म्हणते,
" तान्हे ग जन्मले
भाग्य ग उदेले
आनंदी बुडाले
जग सारे "
तिला आपल्या बाळाचे किती कौतुक,
अणि आवड ...
"मला हौस मोठी
तान्हे बाळ ते असावं
दोन मुठीत धरावं
नेसू माझं ...!!"
किती सुंदर दृश्य मनात रंगविते पहा
एक सुंदर गुटगुटित बाळ आईचे
नेसू म्हणजे साडीचा पदर धरून
उभे आहे अणि आईला म्हणते की
मला तू उचलून घे ...!!
"लांब लांब केस
वेणी येते गोफाची
मला हौस लेकाची
सई बाई "
पुरुषप्रधान संस्कृती या ओवीतून
दिसते ,मुलगा वंशाचा दिवा ही रीत
,समाज रीत ती जाणून आहे .
एकुलत्या एक मुलावर ती आतोनात
प्रेम करते, जीव ओवाळून टाकते .
"एकुलता एक
म्हणू नको सई बाई
बाळ राजस ग माझा
मला शंभराच्या ठायी ...!!"
बाळाचे कौतुक किती करू अणि
किती नको असे तिला होते ...
" पाळण्याच्या वरी
विचित्र पाखरू
नक्षत्र लेकरु
तान्हे बाळ ...!!"
"चंद्राची वाढे कला
तसे बाळाचे बाळसे
लावण्या उणे नसे
अनुमात्र ...!!
असे सुंदर बाळ दिसामासानी वाढू
लागते, रांगू लागते, खेळू लागते ..!
त्याच्या खोड्या वाढू लागतात ..
"रांगुनी खेळूनि
बाळ उंबर्यात बसे
सोन्याचा ढिग दिसे
बाळ माझे ...!!"
किती सुंदर कल्पना ..आईला बाळ
सोन्या सारखे दिसते ...!!
"गोऱ्या गालावर
लाल शोभतो मुलामा
गोड हसशी गुलामा
तान्हे बाळ ...!!"
खुदुखुदू हसणारे बाळ पाहून ती
माऊली आपले सारे कष्ट विसरते,
त्याच्या हास्यात आनंद शोधते ...!
खोडकर बाळाच्या खोड्या किती
पहा ..!! शेजारी जाऊंन खोड्या
करणे हा त्याचा छंद ...!! मग
शेजारनी बरोबर वाद होणे ठरलेले ...
"शेजीने दिली शिवी
वेचुन घेतली
जाई जुईची
कळी मानली ...""
"शेजीने दिली शिवी
लागली माझ्या जीवी
आयुष्याची तुला ओवी
तान्हे बाळा ...!!"
अशी अमृत तुल्य आई आपल्याला
अशा ओवी गितातून सापडते ...!!
आपले सुख दुःख ,वेदना,अनुभव
ओवी मधे मांडून जीवन सुसह्य
करते ....!!
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com

आई

🌹 ओवी गीतातील आई 🌹
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
ओवी गीत अणि जाते यांचे अतूट नाते दिसून येते .आजच्या यंत्र अणि
तंत्र युगात जाते अणि ओव्या हद्दपार
झाल्या आहेत ,पण अजूनही कुठे कुठे विशेषतः ग्रामीण भागात ओवी
गीते विवाह समारंभ, हळदी समारंभ
या निमित्ताने ऐकायला मिळतात ...
तेंव्हा त्यातील अविट गोडी जाणवते .
     ओवी गीते म्हणजेच स्त्री जन्माची
कहाणीच जणू ...! अशा ओवीतुन
तिचे अंतरंग उलगडत जाते ...!!
आपल्या जीवनातील विविध अनुभव
ती ओवीतुन मांडते ,सुख अणि दुःख
दोन्ही गाण्यात व्यक्त करते ...
अशाच काही ओव्या ....आई अणि
बालकाचे प्रेम ...!!
मूल नसलेली स्त्री किती दुःखी असते,
समाजात अणि कुटुंबात तिला मान
सन्मान नसतो , म्हणून ती म्हणते,
   ""वांझनी मेली बाई
   कुण्या गल्लीने तिला नेली
   लेकुरवाळी मेली
    उभ्या गल्लीला गर्दी झाली ...!!"
म्हणून बिचारी दुःखी स्त्री देवाला
नवस,अणि उपास तापास करू लागते,
" देवाच्या देवळात
नंदीला घाली माळ
मागते तान्हे बाळ "
शेवटी तिची तपश्चर्या फळाला येते,
परमेश्वर तिच्यावर प्रसन्न होतो
अणि तिच्या पदरात एक सुंदर,
गोंडस बाळ देऊन तिला धन्य करतो .
मग तिचा आनंद गगनात मावेनासा
होतो ,ती म्हणते,
" तान्हे ग जन्मले
भाग्य ग उदेले
आनंदी बुडाले
जग सारे "
तिला आपल्या बाळाचे किती कौतुक,
अणि आवड ...
"मला हौस मोठी
तान्हे बाळ ते असावं
दोन मुठीत धरावं
नेसू माझं ...!!"
किती सुंदर दृश्य मनात रंगविते पहा
एक सुंदर गुटगुटित बाळ आईचे
नेसू म्हणजे साडीचा पदर धरून
उभे आहे अणि आईला म्हणते की
मला तू उचलून घे ...!!
"लांब लांब केस
वेणी येते गोफाची
मला हौस लेकाची
सई बाई "
पुरुषप्रधान संस्कृती या ओवीतून
दिसते ,मुलगा वंशाचा दिवा ही रीत
,समाज रीत ती जाणून आहे .
एकुलत्या एक मुलावर ती आतोनात
प्रेम करते, जीव ओवाळून टाकते .
"एकुलता एक
म्हणू नको सई बाई
बाळ राजस ग माझा
मला शंभराच्या ठायी ...!!"
बाळाचे कौतुक किती करू अणि
किती नको असे तिला होते ...
" पाळण्याच्या वरी
विचित्र पाखरू
नक्षत्र लेकरु
तान्हे बाळ ...!!"
"चंद्राची वाढे कला
तसे बाळाचे बाळसे
लावण्या उणे नसे
अनुमात्र ...!!
असे सुंदर बाळ दिसामासानी वाढू
लागते, रांगू लागते, खेळू लागते ..!
त्याच्या खोड्या वाढू लागतात ..
"रांगुनी खेळूनि
बाळ उंबर्यात बसे
सोन्याचा ढिग दिसे
बाळ माझे ...!!"
किती सुंदर कल्पना ..आईला बाळ
सोन्या सारखे दिसते ...!!
"गोऱ्या गालावर
लाल शोभतो मुलामा
गोड हसशी गुलामा
तान्हे बाळ ...!!"
खुदुखुदू हसणारे बाळ पाहून ती
माऊली आपले सारे कष्ट विसरते,
त्याच्या हास्यात आनंद शोधते ...!
खोडकर बाळाच्या खोड्या किती
पहा ..!! शेजारी जाऊंन खोड्या
करणे हा त्याचा छंद ...!! मग
शेजारनी बरोबर वाद होणे ठरलेले ...
"शेजीने दिली शिवी
वेचुन घेतली
जाई जुईची
कळी मानली ...""
"शेजीने दिली शिवी
लागली माझ्या जीवी
आयुष्याची तुला ओवी
तान्हे बाळा ...!!"
अशी अमृत तुल्य आई आपल्याला
अशा ओवी गितातून सापडते ...!!
आपले सुख दुःख ,वेदना,अनुभव
ओवी मधे मांडून जीवन सुसह्य
करते ....!!
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...