शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

डंका

मी तुझा,तू माझी सखी
यात काही शंका नको ..
दुश्मन असते जग प्रेमाचे
विनाकारण डंका नको ...

Sangita Bhalsing

भाव

सांगतो तुला एकदाच सखी
नको खाऊ विनाकारण भाव...

विसरु नको, तुझ्या काळजात
वसलेले माझेच नाव-गांव...

Sangita Bhalsing

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०१७

नाव

तुझ्या नाजूक ओठात ,
माझे नाव का अडते ?

कातरवेळी भेटीत सखी
काळीज का धडधडते ...

Sangita Bhalsing

भेट

भेटायला ये चोरून
कुणाला सांगू नको ..

सांजवेळी उशीर करुन
माझा जीव टांगू नको ..

Sangita Bhalsing

धागे

रंगीत धागे प्रेमाचे
गुंफले किती छान ...

होणार नाही गुंता
याचे ठेवावे भान ...

Sangita Bhalsing

तू

थरथरते ह्रदय कंपित हात
धावत आलीस तू

बोलायाचे होते खुप काही
विचार गोठवलेस तू

अलवार बोलताना शब्द
आवरलेस तू

स्पर्श करण्यास उतावीळ
सावरलेस तू

भेटीचा अमृत योग असा
परत येशील न  तू ?

परत येशील न  तू ?
परत येशील न  तू ?

सौ.भालसिंग संगिता

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

मान

रुसू नको, फुगू नको ,
तुला शब्दाची आन ..
ये प्रतिभेच्या दारात
तुला कवितेचा मान ..

Sangita Bhalsing

सखी

कविता माझी सखी
जीवनात रंग भरते ...
तिच्याविना माझे
अस्तित्व ना उरते ...

Sangita Bhalsing

विश्चास

अतूट विश्वास हाच ,
असतो प्रेमाचा पाया ..
झिजवावी लागते ,
मनाबरोबर काया ...

Sangita Bhalsing

तंत्र

क्षणभर भेटून
कंठ आला दाटून ..
भावना लपवायचं
तंत्र आणू कोठून ...

Sangita Bhalsing

लपंडाव

नको लपवू मनाचे
बदलणारे भाव ,
नको खेळू सखी
प्रेमाचा लपंडाव ..

Sangita Bhalsing

साय

सखी तुझ्या मनात
चाललंय तरी काय ?
प्रेमाच्या दुधावरची
करपली का साय ?

Sangita Bhalsing

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०१७

स्वीकार

ओठात नकार
नजरेत होकार ,
समजतो सहज
मौनातला स्वीकार ..

Sangita Bhalsing

उपेक्षा

उजव्या हाताचं दु:ख

मला मेहंदी नाही लावली ,
फक्त एकच बोट लाल झालेय...

माझ्या बोटाच्या नखांना
नेलपॉलिश पण नाही लावली ...

डावा हात किती छान सजवलाय ...

मी त्याच्या पेक्षा जास्त काम करतो ...

तरी माझ्या वाटयाला
अशी उपेक्षा का ..?

Sangita Bhalsing

मलिका

तुझ्या अधीर मनात असते
अनुत्तरित प्रश्नांची मालिका ..

पण सदा लक्षात ठेव सखी
तूच माझ्या दिलाची मलिका ...

Sangita Bhalsing

आक्षेप

लेखन माझे
विचार माझे ,
कागद माझा
पेनही माझा ..

भावना माझी
शब्दही माझे ,
चारोळी माझी
काव्यही माझे ..

मी ही तुझी
तू ही माझा ,
व्यक्त होताना
आक्षेप तुझा ..?

Sangita Bhalsing

पदर

बरा नव्हे सखी
तुझा असा अबोला ,
वळून बघ जरा
पदर झाला ओला ..

Sangita Bhalsing

बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

घाव

घाबरायचं कशाला
हरला जरी डाव ...
मुखवटा पांघरुण
सखी,लपवावा घाव ...

Sangita Bhalsing

राग (चारोळी)

राग 

बोलत नाहीस आजकाल
कसला आलाय एवढा राग ,
काय हवे सांग सखी तुला
निःसंकोचपणे हवे ते माग ...

Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 

प्रतिबिंब

चंद्राचे प्रतिबिंब
पाण्यात पडले ,
जणु धरतीवर
अतूट प्रेम जडले...

Sangita Bhalsing

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०१७

नका

सुखात चळू नका
दुखात पळू नका ...
संकटी गळू नका
प्रयत्न टाळू नका ...

गरीबाला छळू नका
श्रीमंतावर जळू नका
यशाला हुरळू नका
अपयशी पोळू नका ...

Sangita Bhalsing
संगिता भालसिंग

विषमता

नाही गरिबाला खाया
श्रीमंताचे अन्न वाया ,

विषमतेची दरीचा
कधी ढासळेल पाया ?

Sangita Bhalsing

वाचन

सतत आसावा
ध्यास वाचनाचा ,
चिरंतन ठेवा
खजिना ज्ञानाचा  ..

Sangita Bhalsing

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

एकांत

एकांत

शेवटी एकांत बरा
नको कुणाचा पहारा ...
आपापले नशीब,सखी
नको कुणाचा सहारा ...

Sangita Bhalsing

रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

नाते

चल सखी शोधू
   नाते हरवलेले ...
      हातात हात घालून
          वाळूत गिरवलेले ....

Sangita Bhalsing

डोळे

मोठ्या मोठ्या डोळ्यानी
माझ्याशी नको बोलू ..
किती प्रेम आहे तुझ्यावर
हे दुसऱ्यावरुन नको तोलू ..

Sangita Bhalsing

साथ

आयुष्यभराची साथ,सखी
अशी मधेच सोडू नकोस ...
मृगजळाच्या मागे धावून
दिलेले वचन मोडू नकोस ...

Sangita Bhalsing

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

कटाक्ष

तिरका कटाक्ष टाकून
सुंदर हसणं,लाजणं ..
गेलीस काळीज तुडवून
बरं नव्हे सखी,तुझं वागणं ...

Sangita Bhalsing

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

अट

अतुट प्रेमालाही असावी
मुलायम मर्यादित चौकट..

अमर प्रेमालाही नसावी
कोणतीही जटिल अट ....

Sangita Bhalsing

पाऊल

अस्थिर विचार का तुझे ,
पुढे मागे पाऊल पडते ...

काळजी नको करू सखी
जे घडायचे तेच घडते ...

Sangita Bhalsing

अदा

मोहक तुझी अदा
झालो ग मी फिदा ..
कातरवेळी भेटीचा
तोडू नकोस वादा ...

प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

उंबरा

उंबरा
******************

नवरंगाने सजला असा
सुंदर घराचा उंबरा ...
पुसू नका,काळजी घ्या
हळूच जा बाजूने जरा ...

*******************

Sangita Bhalsing

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

करार

आहे तिथे सुखी रहा
शुभेच्छा देतो भरभरून..

समाधानाने पाहीन दुरुन
पुढच्या जन्मीचा करार करून ...

Sangita Bhalsing

खिडकी

जर चुकुन गेलो ,
तुझ्या दारावरुन ...

तर नको पाहूस ,
खिडकीतुन चोरुन ..

Sangita Bhalsing

नजराना

प्रेमाचा नजराना
गेलीस अव्हेरुन...

आता का पहाते
पुन्हा मागे वळून ..

Sangita Bhalsing

प्रेमांकुर

घेतले होते कधीकाळी
तुझ्या वरुन ओवाळून...

आज मात्र मनातील
प्रेमांकुर गेला जळून ...

Sangita Bhalsing

अमृत

मेघा रे मेघा रे,माझ्या
सखीला निरोप दे रे ,
अमृताविना चालले
सुकून प्रेमाचे रोप रे ...

Sangita Bhalsing

साखर

जगावेगळे असे,सखी
काही नाही माझ्यात ,
फक्त विरघळून गेलो
साखरे सारखा तुझ्यात ...

Sangita Bhalsing

जमले नाही

जमले नाही

स्वार्थ टाळण्याचे
अजून जमले नाही ..
परमार्थ साधण्याचे
अजून जमले नाही ..

Sangita Bhalsing

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

गळामिठी

सखी तुझे आठवतात
   गोरे गोरे मुलायम हात..
      गळामिठी घालताना
          कुजबुजलेली बात ..

Sangita Bhalsing

पापणी

हळूच डोळे पूस
पापणी दुखावेल ..

हसताना पाहून
माझं मन सुखावेल ...

Sangita Bhalsing

प्रेम सरिता

मी तुझा शब्द सखी
    तूच माझी कविता ,

       भरभरून वाहू दे ग
            प्रेमकाव्य सरिता ...

Sangita Bhalsing

ईशारा

समजला सखी
    नजरेचा इशारा ..
         पण नको विसरु
              जगाचा पहारा ...

Sangita Bhalsing

आळ

येईल ग सखे
    अकारण आळ ,

        आता राजरोस
              भेटण्याचे टाळ ..

Sangita Bhalsing

वचनबद्ध

वचनबद्ध ही
    नजरेशी नजर ..
       फक्त याद कर
           होईल हजर ..

Sangita Bhalsing

उरुस

कोसळणारा पाऊस
नि एका छत्रीत दोघे ..
श्वासाश्वासात उरुस
नि संशय घेण्याजोगे ..

Sangita Bhalsing

कातरवेळ

कातरवेळ...

सुगंध भरली ललाटरेषा
मौन नयने आसवे गाळी ,

आठवांची विणली जाळी
उदास हुरहुर कातरवेळी ...

Sangita Bhalsing

नृत्य

निळ्या सावळ्या ढगांचे
नृत्य रंगले अवकाशात ..
धावत धावत प्रेम सरी
उतरल्या अवनीवर साक्षात ...

Sangita Bhalsing

पसारा

पसारा .....

घरातला काय ,
नि
मनातला काय ...
आवरावा लागतोच ..
कधी सहज
तर
कधी हेतुपूर्वक ...
नाहीतर
जबरदस्तीनेही ...
स्वच्छ करावा लागतो,
कोपरा नि कोपरा ....
घराचा नि मनाचा ...

पुन्हा पसारा करण्यासाठी.....

Sangita Bhalsing

मुरली

तो वेडा माधव
ती वेडी मुरली ..
वेड्या राधेची
सुधबुध हरली ...

Sangita Bhalsing

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

भेट

या जन्मातील भेट
राहिलीय अधुरी ..
पुढच्या जन्मी तरी
ईच्छा होईल का पूरी ?

Sangita Bhalsing

रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

दवबिंदु

शुभ्र दवबिंदु पहा
पापणीवर साठले ...
सांग सखी,अकारण
तुझे शब्द का गोठले ...

Sangita Bhalsing

शब्द

गोड तुझे बोलणे
इतके का लांबले ..
ओठावर येता येता
शब्द का ग थांबले ...

Sangita Bhalsing

मन

सांग सखी कानात
असे काय घडले ..
कोवळेसे मन कसे
का कुणावर जडले ..

Sangita Bhalsing

साथ

साथ सुटेल अर्ध्यात
असे का ग वाटले ..
आवंढा गिळताना
आसवं का ग दाटले ...

Sangita Bhalsing

पान

प्रेमाचं हिरवं पान
आता का ग सुकले ..
खरं खरं सांग सखी
माझे काय चुकले ..

Sangita Bhalsing

डोळे

मोठ्या मोठ्या डोळ्यात
नक्कीच काहीतरी दडलंय ...

सांग सखे,लाजू नको
घडलंय की बिघडलंय ...

Sangita Bhalsing

नाती

पेटविल्या होत्या
प्रेमाच्या घट्ट वाती ..
आज संपले स्नेह
कोरडी सारी नाती ...

Sangita Bhalsing

जाब

निशब्द तुझे डोळे
विचारतात जाब ..
मोडणार नाही मन
ठेवीन तुझा आब ..

Sangita Bhalsing

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

अस्तित्व

नसे अस्तित्व
विरघळले स्वत्व
अद्वैत रूप ...

Sangita Bhalsing

देह

कोमल देह
बहर तारुण्याचा
डंख जगाचा ..

Sangita Bhalsing

काजळ

पापणी खाली
लपलेले काजळ
कातरवेळ ...

Sangita Bhalsing

पक्षी

पक्षी स्वतंत्र
पारतंत्र्यात नारी
विचार करी ...

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...