झोपलेले मांडीवर
कडू दुःख आहे ...
टांगलेले वेशीवर
गोड सुख आहे ...
Sangita Bhalsing
11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
झोपलेले मांडीवर
कडू दुःख आहे ...
टांगलेले वेशीवर
गोड सुख आहे ...
Sangita Bhalsing
माझ्या प्रेमाची किंमत
आज कळणार नाही तुला ..
मी गेल्यावर माझी आठवण
खुप खुप छळणार आहे तुला ..
Sangita Bhalsing
अबोला धरून
छळते कशाला ...
वळून बघ जरा
गुलाब उशाला...
Sangita Bhalsing
🌹 श्रावण 🌹
सुगंधात आल्या सरी पावसाच्या
जशा अत्तराच्या सरी श्रावणाच्या...
असा गारवा हा शहारा मनावर
दिसे अंगणाशी खुणा पावलाच्या...
नव्या कागदाची अशी नाव सोडू
कथा सांग पाण्यातल्या साहसाच्या ...
पडे सारखा संथ शेवाळ आले
तुरे लोंबलेले शिरी कातळाच्या ...
अशी साद येते उभा पैलतीरा
घराचा दुरावा नको माणसाच्या ..
किती बरसतो हा पुराचाच धोका
उठे उंच लाटा उरी सागराच्या ...
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
12/08/2018
मोह हेच दुःखाचे
खरे कारण आहे ...
प्रेम हेच सुखाचे
खरे तारण आहे ...
प्रा.सौ.संगिता भालसिंग
Sangita Bhalsing
अहमदनगर
🌻सरकारी नोकर 🌻
सरकारी नोकरी
बसतो घोकत ...
नोकरी मिळाल्यावर
बसतो ओकत ...
पाटी टाकण्याची
वाटत नाही लाज ...
पगार घेतानाही
वाटत नाही लाज ...
अंगाला कपडा
पोटाला भाकर ...
नोकरी मुळेच
पडे चहात साखर ...
दुसऱ्याची बरोबरी
सत्कार्याने कर...
जनाची नाही मनाची
थोडी तरी लाज धर...
खाजगी क्षेत्रात बघ
कसा मिळतो दट्टा ...
फक्त हक्क जाणतोस
कर्तव्याला मात्र बट्टा ...
भरतील कधीतरी
अपराध शंभर...
जागा हो,नाहीतर
तुझाच नंबर ...
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
🌹 काही क्षण 🌹
आठवांचे काही क्षण
ठेवले काळजात भरून ....
ओल्या पापण्यात नयन
पाहते कधी कधी दुरुन ...
भार झालेले दग्ध मन
ठेवले संयमात चोरून
घातले किती पांघरूंन
उचंबळे सागर फिरून ...
वादळातील काही कण
ठेवले अलगद धरून
येशील कधी परतुन
प्रश्न प्रेमाला स्मरुन ...
सौ.संगिता भालसिंग
Sangita Bhalsing
झुलत्या झोक्यावर जणु
स्त्री जीवनही झुलतं ...
घर नि दार दोन्हीही जळतं
जेंव्हा तिचं जीवन फुलतं ...
सौ.संगिता भालसिंग
गुलमोहर
लाल फुलांचा सडा
पाऊस वेडा ...
Sangita Bhalsing
घायाळ रूप राणी
किती मधाळ वाणी ...
का रुसली करुन अशी
अघोषित आणीबाणी ...
Sangita Bhalsing
आठवात तुझ्या
मोजले चांद तारे ...
हिशेब ही चुकला
गेले आटून झरे ...
Sangita Bhalsing
*******सुई *******
सुई बाई सुई
किती तुला घाई ..?
पुढे शिवत जाताना
मागे जोडत जाई ....
गुण तुझा घ्यायला
कळेल का माणसाला ?
भांडून तोड़तो मन
शिकव जोडायला ....
जन्म मरणाची
असे वाट एकच
स्त्री अन् पुरुष
जगी जाती दोनच ....
जगा अन् जगु दया
मंत्र हा पाळा
फोड़ा अन् झोडा
तंत्र आता टाळा ....
आदर्श सुईचा
ठेवा रे समोर
प्रेमानंदी मनोमनी
नाचू दया रे मोर ....
प्रा.सौ.संगिता भालसिंग
21/3/15
जे सरले ते सरले ,
नको काळजी करू ...
जे उरले ते उरले ,
नवे स्वप्न उभारु ...
सौ.भालसिंग संगिता
सुप्रभात.....!!
प्रेमाचा सागर
नयनी भरला ,
राधा नि कान्हा
फरक ना उरला ..
Sangita Bhalsing
रक्ताळलेले शब्द तुझे
साहते जराशी हसून
काळजावर दाग माझे
ठेविते उराशी पुसून ...
*********************
सौ.संगिता भालसिंग
तुझं माझं नातं होतं
शब्दांच्या पलिकडले ...
भावना व्यक्त करताना
तन मन ही अवघडले ...
Sangita Bhalsing
हुंदका
****************
पंख छाटले प्रितिचे ,
हुंदका दाटला उरी ...
क्षण उरले आठवांचे ,
मागे बघ वळून तरी ...
*****************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
Sangita Bhalsing
पांढरी फुले
सुगंधी लयलूट
रंगहीन ती ...
Sangita Bhalsing
माडाचं झाड़
करुन घेते लाड
नारळ पाणी....
Sangita Bhalsing
ही कळी का रडते आहे
पानाआड का दडते आहे ...
सुगंधासह उमलताना
अनामिक का घडते आहे ...
Sangita Bhalsing.
रुसू नको सखी
देते फुलं तोडून ...
मैत्रीच्या धाग्याला
घेऊ सुगंध जोडून ....
Sangita Bhalsing
कमावले काय नि गमावले काय
ताळमेळ काही कळत नाही ...
आयुष्याच्या संध्याकाळी ,
हिशेब काही जुळत नाही ...
Sangita B Bhalsing
कोरे ठेवले मी सखी
डायरीचे एक पान ...
तुझ्या साठी लिहिन
प्रेम कविता छान ...
Sangita Bhalsing
विस्कटलेले केस तुझे
गुढ कहानी सांगत आहेत ...
भोगले जे दुःख सारे
वेशीवर टांगत आहेत ...
Sangita Bhalsing
वेडावला जीव सखे
पाहून सुंदर रूप ...
होकार नकाराचे
काळजात कुरूप ..
Sangita B Bhalsing
झरा खळखळ वाहताना
काहीतरी बोलत असतो ..
आसवं गाळत गाळत,जणु
गुढ काळीज खोलत असतो ...
Sangita B Bhalsing
सखी,तुझे प्रेम जणु
दुर्मिळ सुगंधी अत्तर ...
किती करु विनवणी
काळीज तुझे फत्तर ..
Sangita B Bhalsing
चुकत नाही कधीच
नियतीचा घट्ट फेरा ..
मानव जन्म एकदाच
करा सद्गुणांचा पेरा ...
Sangita B Bhalsing
कातरवेळ संकेत मिलनाचा
डाव्या डोळ्याची पापणी लवते आहे ....
आठवांचे मोहळ धावतंय
काळजाचे दार घट्ट लावते आहे ...
Sangita Bhalsing
एकदाच मानव जन्म
करु नये रे मातीमोल ...
सत्कार्याचा उभार झेंडा
जीवन होईल रे अनमोल ..
Sangita B Bhalsing
हाती काही येणार नाही
नको वाद विवाद फुकाचा ...
जाती धर्मात अडकू नको
खा एक तरी घास सुखाचा ...
Sangita B Bhalsing
गोरी नाजूक बोटे,सखी
छेडतात अलवार सूर ...
काळजाची हाक ऐकू येते
जरी राहिली तू खूप दूर ..
Sangita B Bhalsing
लगबगीने कामं करताना
मोहक तुझ्या हालचाली ...
हळूच वाकून पाहतांना
गुलाबी गालावरची लाली ..
Sangita B Bhalsing
काळेकुट्ट असतात
नयनातले मेघ ...
जीवनावर रुसतात
पाडून सुखाला भेग ....
Sangita B Bhalsing
किती किती झाकावे
अलवार मनाचे कोपरे ..
ठासून ठासून भरले
आठवांचे क्षण बोचरे ...
Sangita B Bhalsing
विद्रोह भावनांचा
मजला पसंत नाही ,
पुसण्यास आसवांना
मजला उसंत नाही ...
Sangita B Bhalsing
प्रत्येक वळणावर
पाहते मागे वळून ...
चुकीच्या हिशेबावर
गेले सारे काही जळून ...
Sangita B Bhalsing
जरतारी शालूत शोभतो
रुबाब तुझा खानदानी ...
कोमल तुझी वाणी,सखी
आहेस कोणाची राणी ...
Sangita Bhalsing
होणार नाही कधी
तुझ्या वाटेतील काटा ...
दे तुझ्या दुःखातील
मला माझा वाटा ...
Sangita Bhalsing
पाण्यापेक्षा पैसा
जास्तच झिरपतो..
ज्याच्या हाती येतो
तो जास्तच वरपतो ....
Sangita Bhalsing
कारकुनाच्या हाती
कर्मचाऱ्याची नाडी ...
नमस्कार घाला, नाहीतर
करील कागदावर खोडी ...
Sangita Bhalsing
आभाळ भरलं की
मनही भरु लागतं ...
पावसाच्या सरीसम
सरसर झरू लागतं ...
संगिता भालसिंग
कच्या धाग्याने सख्या
तू नातं बांधलं होतं ...
टाकलं सहज तोडून
जरी मी सांधलं होतं ...
Sangita Bhalsing
हिरव्या पानाचा
अलवार स्पर्श ....
सांगू कसा किती
मनाला होई हर्ष ...
Sangita B Bhalsing
कोरड्या झाल्या पापण्या
डोळ्यात नाही टिपूस...
पाठ फिरवून जाणे तुझे
काहीच नाही विचारपूस ...
Sangita Bhalsing
सुकुमार भासे
सावळ्याचे मुख...
चारी धाम सुख
पंढरीत ...
सौ.भालसिंग संगिता
सहज मिटविता येते
देहातील अंतर
नाही मिटविता येत
मनातील अंतर ...
Sangita B Bhalsing
मऊ केसावर फिरे
सावळ्याचा हात ...
कोवळ्या मनाच्या
करी वेदनेवर मात ...
Sangita B Bhalsing
उगाच घेऊ नकोस
ओढून स्वतःवर ..
लिहिली नाहीत मी
शब्दफुले तुझ्यावर ...
Sangita B Bhalsing
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...