बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

सावरु दे - कविता

सावरु दे...


मुक्तपणे हवे तसे
वावरू दे मला...

डोईवर भार असे
सावरू दे मला...

भरारते पंख असे
पाखरू दे मला...

उबदार जिद्द अशी
पांघरू दे मला...

हिरकणी चालते अशी
ना हरू दे मला...

संगिता भालसिंग

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

गझल - गुलाबी

गझल 


वृत्त आनंदकंद
लगावली..गागाल गालगागा गागाल गालगागा
*****
Marathi मराठी साहित्य प्रकार मराठी गजल गुलाबी


गुलाबी 

केसात घातलेली होती फुले गुलाबी
कानात घातलेली होती डुले गुलाबी

पदरास लावलेले रेशीम पैठणीला
गोंडयास लावलेले मोती झुले गुलाबी

वाळूत उमटलेल्या होत्या खुणा शराबी
वेगात चाललेली ती पाउले गुलाबी

जाळ्यात अडकलेला भुंगा नसे विषारी
आरास पाकळ्याची गाली खुले गुलाबी

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

अंतरंग - चारोळी

अंतरंग 


जसजसे मी पण सरते
तसतसे हृदयी प्रेम भरते ..
जरी उन सावली खेळ करते
तरी अंतरंग निष्काम उरते...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

ओंजळ - चारोळी

ओंजळ - चारोळी 

ओंजळ - चारोळी


मोजली नाही कधी
प्रेमाची गती नि मिती...

जरी उधळून केलय प्रेम
तरी माझी ओंजळ रिती...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

पान - चारोळी

पान - चारोळी 


कोवळ्या उन्हाचा स्पर्श
वाटे किती छान छान...
मंद वाऱ्यात झोके घेत
नाचे कोवळे हिरवे पान...


सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

सत्य - चारोळी

सत्य - चारोळी 


सत्याची चाड वाटे...

असत्याची चीड वाटे..

अहंकार किड वाटे

अभिमान भीड वाटे...
चारोळी मराठी साहित्य




सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर


गडबड - गझल

गडबड - गझल 


पादाकुलक मात्रा वृत्त
8,8

गागागागा गागागागा

 सत्य बोलता गडबड झाली
रीत जगाची अवघड झाली...

उंच मनोरे बांधू कोठे
पायाचीही पडझड झाली...

भेटी गाठी  वादा वादी
काळजातली धडधड झाली...

नको विसंबू वचनावरती
विश्वासाची रडरड झाली...

वाट वाकडी वळणावरची
पंखाचीही फडफड झाली...

दोष लपाया,होश टिकाया
किती निरर्थक बडबड झाली...

संगिता भालसिंग
अहमदनगर
शनिवार 21 सप्टेंबर 2019

वंदन - कविता

वंदन - कविता 


मन भरले भरले
दुःख सरले सरले
आसू विरले विरले
सुख उरले उरले...

हाती हात सजनाचा
वाट प्रेमाची गुलाबी
क्षण क्षण अमृताचे
जीव झालाय शराबी...

गुंफिले काळजात
विश्वासाचे चंदन...
मिळो जन्मभर साथ
करू देवाला वंदन....

संगिता भालसिंग
अहमदनगर
शनिवार 21.09.2019


💖 कवितेचा भावार्थ
ही कविता प्रेम, विश्वास आणि आयुष्याच्या समाधानाची सुंदर अभिव्यक्ती आहे.
दुःख, अश्रू आणि वेदना मागे पडून मन सुखाने भरून येते.
प्रिय व्यक्तीचा हात हातात घेतला की जीवनाची वाट गुलाबी होते.
प्रत्येक क्षण अमृतासारखा वाटतो आणि जीवन नशेत बुडाल्यासारखे भासते.
विश्वासाचे चंदन काळजात गुंफून
जन्मभर साथ मिळावी,
अशी देवाकडे केलेली ही प्रार्थना म्हणजेच
प्रेमाचे आणि नात्यांचे पवित्र वंदन.

✨ कवितेचा संदेश
प्रेम हे दुःखावर मात करते
विश्वास नात्यांना बळ देतो
साथ लाभली तर जीवन सुंदर होते
कृतज्ञतेने देवाला वंदन करावे

फुले - चारोळी

फुले - चारोळी 

चारोळी मराठी साहित्य प्रकार - फुले



वेदनांच्या कळ्या
आसवांची फुले...
दुःखाच्या पुलावर
हिंमतीने झुले ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

नौका - चारोळी

नौका - चारोळी 


वेदनांच्या कळ्या
फुले आसवांची ...
सुगंधी पुलावर
 नौका भावनांची...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

आशा - गझल

आशा - गझल 


जलौघवेगा वृत्त
लगालगागा लगालगागा
आशा - गझल , साहित्य प्रकार, कविता



मनात आशा जिवंत नाही
तरी जिवाला खंत नाही

कशास मागे वळून पाहू
तुलाच आता उसंत नाही

उगाच वचनास जागताना
गुलाम होणे पसंत नाही

तुझीच मीरा तुझीच राधा
अशा भक्तीलाच अंत नाही

जहर पिताना खुशीत होती
उगाच किर्ती दिगंत नाही

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
रविवार 22.09.2019

प्रेम - चारोळी

प्रेम - चारोळी

प्रेम चारोळी, मराठी साहित्य



जहाँ जितना क्रोध होगा ,
वही उतना ही प्रेम होगा ...

जहाँ जितना प्रेम होगा ,
वही उतनाही शक होगा.....

Sangita B Bhalsing

गझल - बाजार

गझल - बाजार 


भावनेचा मांडला बाजार आहे
सांग आता तू खरा का यार आहे ...

दाविशी स्वार्थात लोकांना उणीवा
या मनाला त्रास याचा फार आहे...

वेदनांचे केवढे आघात सारे
कोवळ्याशा काळजावर वार आहे ...

रोज होतो हा तमाशा लावणीचा
नाचताना अंतरात्मा ठार आहे ...

उमगली सारी टवाळी या जगाची
साथ खोटी प्रेम ही व्यापार आहे ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर


शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

बाप्पा

निरोप तुला देताना
जड झाले तन मन...
बाप्पा,पुन्हा ये घेऊन
आनंदाचे आवर्तन...

सौ.संगिता भालसिंग
मराठी साहित्य प्रकार चारोळी

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

व्यापार - गझल

व्यापार - गझल 


भावनेचा मांडला बाजार आहे
सांग आता तू खरा का यार आहे ...

दाविशी स्वार्थात लोकांना उणीवा
या मनाला त्रास याचा फार आहे...

वेदनांचे केवढे आघात सारे
कोवळ्याशा काळजावर वार आहे ...

रोज होतो हा तमाशा लावणीचा
नाचताना अंतरात्मा ठार आहे ...

उमगली सारी टवाळी या जगाची
साथ खोटी प्रेम ही व्यापार आहे ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर


मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

मर्म

मानू नये जाती-धर्म
करा फक्त सत्कर्म ...
जगा, जगु दया नि जगवा
हेच जीवनाचे खरे मर्म...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९

लेखणी - मराठी कविता

🖊 लेखणी 🖊
🌹🌹🌹🌹🌹🌹
लेखणीची धार तू
लेखणीचा आधार तू
लेखणीचा स्वार तू
लेखणीचा हार तू

लेखनाचा मार्ग तू
लेखनाचा स्वर्ग तू
लेखनाचा पार्थ तू
लेखनाचा अर्थ तू

लेखनाचे सार तू
लेखनाचे आसार तू
लेखनाचे द्वार तू
लेखणीचा उद्धार तू

लेखणीचे मर्म तू
लेखणीचे कर्म तू
लेखणीचा धर्म तू
लेखणीचे चर्म तू

लेखणीचा राम तू
लेखणीचा शाम तू
लेखणीचा भरत तू
बद्ध माझ्या उरात तू

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर


शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

दुष्ट काव्य चोरांनो

आज शुक्रवार दिनांक 16.08.19 रोजी परळी समाचार मधे माझी कविता प्रकाशित...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

संसार



जरी पडला
उघडा संसार..
लढ जिद्दीने
नको मानू हार...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

पाऊस

पावसा तुझं गणित
आम्हाला कळत नाही...
तुझ्या विना सृष्टी
अजिबात फळत नाही...

जिथे नको तिथे तू पडतो
जिथे हवा तिथे तू अडतो
सांग असे का करतो ?
दुःखाची काठी का धरतो?

 अडचन आणि खोळंबा
अशी सारी कथा आहे
तुझ्याविन जीवन सुने
हीच खरी व्यथा आहे

कितीही त्रास दिला तरी
तू आम्हाला हवा आहेस..
दरवर्षी वाट पाहून येतोस तू
तेंव्हा वाटते नवा आहेस तू...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९

पापणी



भिजलेली पापणी
बोलू नाही शकत...
आसवांची करणी
तोलू नाही शकत...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

मैत्री - गझल

गजल - मैत्री 




ओढ आहे वेगळी ही छान मैत्री
अमर नाते जीवनी ही शान मैत्री

त्या भितीचा स्पर्श नाही थोडकाही
संकटाला थोपवाया दान मैत्री

सूर्य आहे सोबतीला मार्ग दावी
वाकडी ना वाट डावी भान मैत्री

ओल आहे साठलेली या मनाशी
काळजाचे हे सुगीचे  रान मैत्री

बंध आहे रेशमाचे मलमली हे
भावनांनी मांडलेले ठाण मैत्री

प्रेम भरलेल्या सुरांनो साथ द्या रे
संगिताने गायलेले गान मैत्री

सौ.संगिता भालसिंग



गात्र

तू नको ठरवू आता,सखे
प्रेमास पात्र की अपात्र...

मिठीत येशील तेंव्हा कळेल
कशी पुलकित होतात गात्र...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

मैत्री

****     मैत्री   *****
🌹🌹🌹🌹🌹🌹

खूप जपावे लागते
मैत्रीच्या फुलाला ...
प्रेमाचे खतपाणी
घालावे त्याला ...

मैत्री म्हणजे असते 
जणू ऊंबराचे फुल ...
जणू विठ्ठलाच्या
चरणाची पावन धुल ...

न लागावा कधी
मत्सराचा वारा ...
अभिमाना पेक्षा
स्वाभिमान बरा ...

खरी मैत्री होणे
 अवघड असते
मैत्री देवाचे एक
सुंदर दान असते ...

रक्ताच्या नात्यात
स्वार्थ असतो
प्रेमाच्या नात्यात
स्वार्थ नसतो ...

मन दुखविने
सोपे असते
मन सांभाळणे
कठीण असते ...

विश्र्वास मैत्रीवर
खूप खूप असावा
अणि तो आपल्या
वर्तनात दिसावा ...

*************
सौ.संगिता भालसिंग

💐Happy friendship 💐


मैत्री

प्रश्न पड़े मनी
मैत्री चेहरयाशी
की विचाराशी ?
सांगेल का कुणी ?

विश्वास असावा खास
मान सन्मान असे त्यास...
सत्य असत्याचा नसे भास
ज्याने होईल मैत्री चा नास...

प्रा सौ संगिता भालसिंग
अहमदनगर

मैत्री (चारोळी)

मैत्री


मैत्री आणि व्यवहार
करू नये कधी एकत्र..

राहतील कायम सोबत
सोन्यासारखे मित्र...

Sangita Bhalsing

Ahilyanagar 

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

शब्द फुले

उगाच घेऊ नकोस
ओढून स्वतःवर ..
लिहिली नाहीत मी
शब्दफुले तुझ्यावर ...

Sangita B Bhalsing

बुधवार, ३१ जुलै, २०१९

उब



सूर्य म्हणाला ,धरतीला
फिरते माझ्याभोवती
अन चंद्राची पाहते वाट...
पण विसरू नको सखे
माझ्या उबेचा थाट...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

मंगळवार, ३० जुलै, २०१९

दवबिंदू

मराठी कविता - चंदेरी दवबिंदू 
दवबिंदू मराठी कविता, मराठी साहित्य


चंदेरी दवबिंदू
गालात हसला...
मऊ पाकळीवर
अलगद बसला...

गुलाबी फुलावर
जीव जडला...
प्रसंग मात्र बाका
अचानक घडला...

वाऱ्याच्या झोताने
मातीवर पडला...
क्षणभर जीवन
मनातच रडला...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

सोमवार, २९ जुलै, २०१९

श्रीमंती

श्रीमंती...

आठवांनी भरलेला
श्रीमंती थाट भारी....

सुख दुःखानी कोरलेला
भावनांचा घाट भारी...

प्रा. सौ. संगिता भालसिंग@
अहमदनगर

यात्री (चारोळी)

यात्री

साहित्य चारोळी मराठी



अनंताचा हा प्रवास
मी दिगंत यात्री...

दगड बनावा श्वास
ही यशाची खात्री...

प्रा. सौ. संगिता भालसिंग@
अहमदनगर

मात

मऊ केसावर फिरे
सावळ्याचा हात ...
कोवळ्या मनाच्या
करी वेदनेवर मात ...

Sangita B Bhalsing

रविवार, २८ जुलै, २०१९

संकोच


काहीतरी बोलायचं आहे
पण संकोच आड येतो...

मनातल्या गोड तरंगांचा
गाभूळलेला पाड होतो...

प्रा. सौ. संगिता भालसिंग@
अहमदनगर

बहर



जेवढी पसरत जाते ओल
तेवढी हिरवी होते मन वेल...

जेवढा सुगंधी फुलांचा बहर
तेवढा श्वासात कोवळा कहर...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर
सुप्रभात

बुधवार, २४ जुलै, २०१९

पान मळा

थेंब थेंब पाणी
मुळ करी गोळा...
खोडाच्या कष्टावर
हिरवा पान मळा...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

रुसवा



नको रूसावा उगीच
बोलून घे जरासे तरी...
घाव करते नेहमीच
तीक्ष्ण अहंकार अरी...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

गजल

गजल

हे धाकटी कविता,तू रुसू नको
तुझ्यामुळे,गजल आहे मोठी...

तिच्या कौतुकाचा राग धरू नको
सामावून तिच्यात,घे गळा मिठी...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

जगणं

जगणं

हा जन्म  एकदाच
मस्त मजेत जगून घे...
फुलांवरुन चालताना
 काटे मात्र बघून घे ...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

जादू



स्पर्शाची जादू
तेंव्हा कळली...
संयमी पापणी
जेंव्हा ढळली...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

मंगळवार, २३ जुलै, २०१९

गजल

गजल

हे धाकटी कविता,तू रुसू नको
तुझ्यामुळे,गजल आहे मोठी...

तिच्या कौतुकाचा राग धरू नको
सामावून तिच्यात,घे गळा मिठी...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

निनाद

निनाद

अबोल ओठांचा
शब्दाविन संवाद..
कोमल काळजाचा
 जाणवतो निनाद...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

सोमवार, २२ जुलै, २०१९

मलिका

भले येऊ दे किती
संकटांची मालिका...

रणसंग्राम करणारी
मीच शूर मलिका...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

ओटी

ओटी

कधी दुष्ट दूषणांनी
भरून घ्यावी ओटी ...

समजून घ्यावी त्यांची
विचारसरणी थोटी...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

रविवार, २१ जुलै, २०१९

क्षण

क्षण

आठवांचे मधुर क्षण
काठोकाठ भरलेले...
कुणाला सांगायचे नाही
हे मात्र आपले ठरलेले...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

नव्हाळी

नव्हाळी

मुखावरून दूर कर
केसांची काळी जाळी...
उमलत्या सौंदर्याची
जरा पाहू दे नव्हाळी...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

प्रेमवाट



पायंडा मोडून आली
शृंखला तोडून आली...

संकेत खोडून आली
प्रेमवाट जोडून आली...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

प्रेमामृत

प्रेमामृत

सामावले तुझ्यात
अस्तित्व न उरले...
हृदयात प्रेमामृत
काठोकाठ भरले...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

झालर



प्रेमाच्या नात्याला एक
रंगीबेरंगी झालर असते....
कधी ती ठळकपणे दिसते
तर, कधी लपूनही बसते...

प्रेमाच्या नात्यात एक
हवाहवासा गुंताही असतो
बोलता न येणारा एक
अपरिचित प्रांतही असतो ...

प्रा. सौ.संगिता भालसिंग
Sangita Bhalsing
अहमदनगर

बहर

जेवढी पसरत जाते ओल
तेवढी हिरवी होते मन वेल...
जेवढा सुगंधी फुलांचा बहर
तेवढा श्वासात कोवळा कहर...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

शनिवार, २० जुलै, २०१९

संस्कृती



आज पैसा झाला देव देव
नैतिक मूल्य झाली सैल...
राहिले ना कसले भेव
निकामी संस्कृतीचा बैल...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

छंद



शब्दांचा लळा
कवितेचा गंध...
शब्दांची माला
गुंफण्याचा छंद..

प्रा. सौ. संगिता भालसिंग

सुख

सुकुमार भासे
सावळ्याचे मुख...

चारी धाम सुख
पंढरीत ...

सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर

शुक्रवार, १९ जुलै, २०१९

लक्षण - मराठी कविता


पाझर

पाझर

प्रहर


कुरूप

०१ ) कुरूप

एकवेळ काढता येईल
काट्याचे कुरूप ...
पण  नाही काढता येत
प्रेमाचे कुरूप ...

०२ ) कुरूप

पायात सलते कुरूप
चालता येईना ...
मनात नाही हरुप
बोलता येईना ...

सौ.संगिता भालसिंग

जन्म

जन्म आपला लढण्यासाठी ,
नाही मरण्यासाठी रे...
जीवन आहे हसण्यासाठी ,
नाही रडण्यासाठी रे . ...

Sangita Bhalsing

बुधवार, १७ जुलै, २०१९

जगणं

....जगणं...

जगणं म्हणजे काय? हे
जगल्याशिवाय कळत नाही..
 मरणापर्यंत जगण्याचे हे
अजिबात टळत नाही...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

अनमोल

काव्यात तुझं स्थान
किती अनमोल आहे ...
भावनेत ओथंबलेली
प्रेमाची ओल आहे ... Sangita Bhalsing

मंगळवार, १६ जुलै, २०१९

रुखरुख

लोभसवाणा चंद्र
खुणवितो कुणाला ?
किती रुखरुख लागे
चांदणीच्या मनाला...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

सोमवार, १५ जुलै, २०१९

लेक

लेक

दुडूदुडू धावे
लुटूलुटू चाले,
लाडाची लेक ही
गोड गोड बोले....

काळे काळे बाल
गोरे गोरे गाल,
गुणगुण गाते
नर्तनात ताल ...

डुगडुग मान
हलविते छान,
इवलेसे कान
हरपते भान...

@.प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

सखी

कशी आहेस सखी तू
विचारू तरी कुणाला...?
असेल तिथे सुखी असेल
बजावतो माझ्या मनाला..

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

मागणे - प्रकाशित गझल

माझी प्रकाशित गझल
आज सोमवार दिनांक 15 जुलै 2019 रोजी "परळी समाचार"मध्ये माझी कविता प्रकाशित....
सौ.संगिता भालसिंग

रविवार, १४ जुलै, २०१९

पणती

पणती...

इवली पणती
इवला प्रकाश...
गूढ अंधारात
मोकळे आकाश...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

कारण

नेहमी मनासारखं
घडत नाही,मित्रा...
कारणही कधी
उलगडत नाही मित्रा...

@.प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

तोरण

इंद्रधनू

हिरवळीचा साज ल्याली
सुंदर आपली धरती....
निलरंगी आभाळातले
इंद्रधनूचे तोरण वरती...

@.प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

होकार

....होकार....

लाजरा तिरका कटाक्ष
मानेचा खोटा खोटा नकार...
काळजाने हळूच टिपला,
डोळ्यांचा खरा खरा होकार...

@.प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

बट



मंद हेलकावे घेते
इवली बट गालावर...
जणू लचकत नाचते
आठवांच्या तालावर...

@.प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

बंगला

बंगला


जिंदगीचा बंगला
उभार तू छान
कमी न पडेल
आनंदाचे धन ...

भिंत समतेची
मजबूत बांध
नको कुठे थोड़ी
जाती भेद सांध ...

छत आनंदाचे
सुखाचा पाऊस
आशा ठेव मनी
छान येई दिवस ...

संघर्षाची वाट
असली पाहिजे
मनगटी कर्तुत्व
वसले पाहिजे ...
**********

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
14/7/15

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...