माझी गझल २८
🌻 तुझ्यासाठी 🌻
संकटे झेलतो तुझ्या साठी
वादळे पेलतो तुझ्या साठी
येउन बैस अंगणी माझ्या
बंगला बांधतो तुझ्या साठी
वेळ आली नव्या सुधारणेची
भोजना रांधतो तुझ्या साठी
काळ गेला जुन्या प्रथांचा तो
या शिवा लांघतो तुझ्या साठी
'बैल'म्हणून नाव ठेवीता
हे खडे टोलतो तुझ्या साठी
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com