शुक्रवार, २६ मे, २०१७

वेदना

जीव सारा पोळलेला
वेदनांनी भाजलेला ...
भोगलेल्या यातनांनी
देव आता लाजलेला ...

Sangita Bhalsing

कोरीव मुख

कोरीव मुखावर
आनंदाचा झरा ...
अर्थसार भासतो
जीवनाचा खरा ...

Sangita Bhalsing

मोहिनी

टपोऱ्या खोल डोळ्याची
मनावर मोहिनी पडते ...
लांब काळ्या पापण्या
काळजाचा कातळ फोडते ...

Sangita Bhalsing

गुरुवार, २५ मे, २०१७

काजळ

काळ्याभोर डोळ्यात
काजळ जपून घाल ...
ठोका चुकेल काळजाचा
सखे जरा जपून चाल ...

Sangita Bhalsing

मृदगंध

भिजली माती
मृदगंध श्वासात
स्पर्श भासात ...

Sangita Bhalsing

करार

कागदी करारा पेक्षा
मनाचा होकार पाहिजे...
काना,मात्रा,वेलांटीपेक्षा
काळजावर रफार पाहिजे ..

Sangita Bhalsing

बुधवार, २४ मे, २०१७

आसू

गालावर ओघळले
गोल थेंब पावसाचे ...
प्रतिबिंब भासले
गारव्यात साजनाचे ...

Sangita Bhalsing

भास

काळ्याभोर डोळ्यात
स्वप्नांची सजली रास ...
अलवार अतूट प्रेमाचा
पापणीआडून भास ...

Sangita Bhalsing

भेट

अलवार भेटीचा सोहळा
गहिऱ्या डोळ्यात सजला ..
तो एकच नाजुक क्षण
पापण्याआड भिजला ...

Sangita Bhalsing

झालर

गहिऱ्या खोल डोळ्याची
मनावर मोहिनी पडते ...
लांब काळ्या पापण्याची
काळजावर झालर चढते ...

Sangita Bhalsing

पापण्या

काळ्याभोर पापण्या
सखे घे जरा झाकून ...
तिरक्या मानेने हळूच
नको पाहूस रोख़ून ...

Sangita Bhalsing

याद

तेरी यादोकी बारिश
थमती ही नही है ...
यकीन ना हो तो
मेरे तकिये से पुछ ...!!

Sangita Bhalsing

सागर

भाळले किती सागराच्या
निळ्या निळ्या रंगावर ...
वाटे निलमयी सर्द चादर
हळूच ओढावी अंगावर ...

Sangita Bhalsing

मंगळवार, २३ मे, २०१७

साद

किती घातलास तू
विनाकारण वाद ..
नाही येणार परत
जरी घातलीस साद ...

Sangita Bhalsing

प्रकाशित कविता-यमकायन

आज मंगळवार दि. 23 मे 2017 रोजी
"एकमत"वर्तमान पत्रातील
"साक्षी"पुरवणी मधे
माझी कविता प्रकाशित .
" यमकायन '

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

गुरुवार, १८ मे, २०१७

आई

हृदयी अमृत नयनी पाणी
कुशीत खुशीत गाते अंगाई ....
जोजविते हातपाळण्यातुनी
बाळा मोठेपणी, हो उतराई ...
***********************
सौ.संगिता भालसिंग

मंगळवार, १६ मे, २०१७

प्रकाशित लेख-सुख दुःख

आज मंगळवार दि. 16 मे 2017 रोजी
"एकमत"वर्तमान पत्रातील
"साक्षी"पुरवणी मधे
माझा लेख प्रकाशित .
" सुख दुःख '

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

शनिवार, १३ मे, २०१७

गंधार

ओल्या मिठीत भासे गंधार पानवारा
खोडील पावसा तू देऊ नको पहारा ...

Sangita Bhalsing

गुरुवार, ११ मे, २०१७

झूला

तो रिकामा झूला
बघतोय तुझी वाट ...
खेळू म्हटले थोड़ावेळ
तर लावून गेलीस नाट ...

साद घालतेय तुला
हिंदोळ्याची लाट ...
बसून तर बघ एकदा
डोंगरा वरील पहाट ...

Sangita Bhalsing

बुधवार, १० मे, २०१७

लेखणी

धारदार सौंदर्याची ,
लेखणी असते गुणाची ...
राणी असते शब्दाची ,
गुलाम नसते कुणाची ...

Sangita Bhalsing

मंगळवार, ९ मे, २०१७

सोन्याच्या पाटल्या

सोन्याच्या पाटल्या
शोभतात गोऱ्या हाती ...
हिरव्या काच बांगडयात
गुंतलेली प्रेमाची नाती ...

Sangita Bhalsing

प्रकाशित लेख

आज मंगळवार दि. 09 मे 2017 रोजी
"एकमत"वर्तमान पत्रातील
"साक्षी"पुरवणी मधे
माझा लेख प्रकाशित .
"चला सर्वांसाठी जगु या'

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

निस्वार्थ प्रेम

निस्वार्थ प्रेम

तुला मी हवी असेल तर
मलाही तू हवा आहेस ...
तुला मी नको असेल तर
मलाही तू नको आहेस ...

संगिता भालसिंग

रविवार, ७ मे, २०१७

ठेव

कोणी नसे कुणाचे ,
आधार देव आहे ...
भक्तीत संचिताची ,
साभार ठेव आहे ...

Sangita Bhalsing

आसरा

आलास आसऱ्याला आधार पावसाचा
माती घरात आली गंधीत पावलाची...

Sangita Bhalsing

ताल

हुंदक्यांच्या समेवर
भावनांचा ताल ...
थांब सखे सीमेवर
कोवळं काळीज बेहाल ...

Sangita Bhalsing

पानवारा

पानवारा

आलाय पानवारा वाऱ्यासवे इशारा ,
धुंदीत गीत ओठी अंगावरी शहारा ...

ओल्या मिठीत भासे गंधार काळजाचा ,
खोडील पावसा तू देऊ नको पहारा ...

Sangita Bhalsing
संगिता भालसिंग

शुक्रवार, ५ मे, २०१७

विठ्ठल

सावळा विठ्ठल
फुलांनी सजला ..
भोळ्या भाविकांच्या
मनात रुजला ...

Sangita Bhalsing

तळ

किती खोल काळीज तुझे
अजिबात तळ सापडत नाही ...
येशील प्रेमाच्या जाळ्यात
असा गळ सापडत नाही ...

Sangita Bhalsing

गुरुवार, ४ मे, २०१७

लेणे

स्वतः जळते
प्रकाश देते
कुणा न कळते
चटकलेणे लेते ...

Sangita Bhalsing

माझी गझल-भुईभार

माझी गझल

भुई भार

किती पाप सारे,भुई भार झाले
नसे चाड कोणास,लाचार झाले

मनाच्या तळाशी कलीचे युग हे
नितीचे उखाणे तडीपार झाले

भुकेल्या जिवाला बहाणे तुपाचे
असे भाव खोटेच व्यापार झाले

इथे कोण नाही कुणाचे कधीही
लगातार पाठीवरी वार झाले

मरे रोज त्याला कुणी का रडावे
नक्राश्रू असे कोरडे क्षार झाले

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
Copyright

शुभ रात्र

माझी गझल-वरदान

माझी गझल
वृत्त-मनोरमा
गालगागा गालगागा

🌷 वरदान 🌷

तू दिलेले दान आहे
हे किती रे छान आहे

रेशमी ओटीत माझ्या
खेळणारे प्राण आहे

बोबडेसे बोल बोले
ही गुणाची खाण आहे

लाजवी चंद्रास भारी
रंग गोरा पान आहे

लेकराच्या कौतुकाचा
या जिवाला मान आहे

ही सुखाची वेल वाढे
दोन दारी शान आहे

लपविते पदरात आता
लाभले वरदान आहे

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
28/01/17

माझी गझल-मंथन

मंथन

प्रकाशित गझल-पालखी

आज मंगळवार दि.१४ मार्च २०१७
एकमत वर्तमान पत्रातील पुरवणी
      🌻 साक्षी 🌻
मधे माझी कविता प्रकाशित.

सौ.संगिता भालसिंग
Sangita Bhalsing
अहमदनगर

माझी गझल-भारतीय

कामिनी
गालगाल गालगाल गा
💐 भारतीय 💐

रंग वंश हा दबाव रे
तो नकोच भेदभाव रेे

प्रेमगीत गात राहते
ते सुखी खुशाल गाव रे

भिंत पाडली अमानवी
गाजले जगात नाव रे

साथ दे समानतेस रे
द्वैत भावना मज्जाव रे

जात पात तोडफोड़ रे
भारतीय ठेव नाव रे

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
15/03/17

माझी गझल-दुष्काळ

माझी गजल

💐💐💐💐💐

🌹दुष्काळ🌹
💐💐💐💐💐💐

पाण्यासाठी वणवण आहे
भांडीकुंडी ठणठण आहे ...

पैसा नाही अडका नाही
खाण्याचीही चणचण आहे ...

सर्दी झाली कफही झाला
अंगी थोडी कणकण आहे ...

जगण्याचाही लोच्या झाला
डोक्यालाही गणगण आहे ...

दुष्काळाने नाते जाळी
आगीची ही ढणढण आहे ...

सैरावैरा धावे आता
पायाचीही दणदण आहे ...

काढू कर्जे फेडू हप्ते
फाशी आता क्षणक्षण आहे ...

Sangita Bhalsing

Ahamadanagar

Copyright

प्रकाशित गझल-प्रतिभा

आज मंगळवार दि.२५एप्रिल२०१७
एकमत वर्तमान पत्रातील
"साक्षी"पुरवणी मधे
माझी गझल प्रकाशित
" प्रतिभा "
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

माझी गझल-भरवसा

   भरवसा

भरवसा का टाकते मी
आसवे का गाळते मी

शुष्क झाल्या,गंध गेल्या
त्या फुलांना माळते मी

हा अबोला सोड आता
का हक्काने सांगते मी

त्या नभाच्या तोरणाला
वेदनांना टांगते मी

हा विषाचा स्पर्श प्याला
आज ओठी लावते मी

प्रा.सौ.संगिता भालसिंग

माझी गझल-सैराट

सैराट

का अशी सैराट झाली
का नव्याने लाट आली ...

जिंदगी ही झिंगलेली
केवढी झिंगाट झाली ...

त्या फुलांचा बहर सारा
ही सुगंधी वाट झाली ...

जा सुखाने बीनधास्त
मान आता ताठ झाली ...

जा पडू दे पाय पंगू
पाठ आता राठ झाली ...

Sangita Bhalsing

माझी गझल-चूक

🌹 चूक 🌹

काय झाली चूक माझी सांग आता ,
दोष माझे आसमंती टांग आता ...

बाण येऊ दे जरासे खोचलेले ,
दाखवाया काळजाचा थांग आता ...

साहलेले वेद होते आणि ऋचा ,
राहिले ते कोणते वेदांग आता ...

हरभऱ्याचे झाड आता मोडलेले ,
दुर्गुणांची लावली का रांग आता ...

काळजाशी खेळ केला वेदनेने ,
जिंकण्याने फेडले का पांग आता ...

प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright

माझी गझल-सान गजल

माझी गजल

💐💐💐💐💐💐💐

काळजाचे पान करते
शब्द माझे प्राण करते ...

मांडण्याला गजल आता
लेखणीला छान करते ...

भावनेचा दर्द भरण्या
या जिवाचे रान करते ...

वाचतांना ईतरांचे
ऐकण्याला कान करते

समज आहे थोडकीशी
शेर थोडे सान करते ...

Sangita Bhalsing
Copyright

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...