सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

जीव

जीव

अडकला जीव ,
पिलात सारा ...!!
पाखरे भरविती ,
मुखात चारा ...!!

प्रा. सौ.संगिता भालसिंग

सुप्रभात

भावना

दुसऱ्याच्या भावना
कधी दुखवु नयेत ...
अन,स्वतः च्या भावना
सुखवु नयेत ....

अधिकार नाही
कुणाला छळण्याचा ...
त्यांच्या मनाविरुद्ग
वळविण्याचा ...
.............................................................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
2/2/15

रांगोळी

दारी रेखिलि रंगोळी
मनमोहक नक्षी काढून ....
सख्या साजन टाकी
दृष्टी दारा आडून ....

सौ.संगिता भालसिंग

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

नयन भाव

तुझ्या नयनातील मधुर भाव ,
कळतो फ़क्त वेड्या राधेला ...!!
घेऊन तुझ्या काळजाचा ठाव ,
देते साथ मधुर बासरीला ...!!

प्रा. सौ.संगिता भालसिंग

प्रेम

सर्वोत्कृष्ट चारोळीचा बहुमान प्राप्त ...

***************************************
चंद्र अन धरतीचे प्रेम पाहून
हिरवीगार सृष्टी बहरुन आली ...
परि,परप्रकाशी  म्हणून सूर्याची
किरणे, चंद्राचे भेद खोलून गेली ...
****************************************
प्रा.सौ.संगिता भालसिंग

न्याय

लहरी निसर्ग अन् सरकारात
शेतकऱ्याला मिळेल काय न्याय ?
आई खाऊ घालीना,बाप भिक मागु देईना
कुठवर सोसावा हा घोरअन्याय ?....

प्रा.सौ.संगिता भालसिंग
28/2/15

मन मोर

मन मोगरा

फुलांचा ताटवा
मनात साठवा
दृश्य ते आठवा
मनोहर ...
भावफुले करू
अर्पण प्रभुला
आनंद मनाला
फुलवितो ...
मोगरा फुलतो
सुगंध भरतो
निर्माल्य करतो
ईश्वर तो ...
मन हे मोगरा
सुगंध गहिरा
फुलवी पिसारा
मनमोर ...

प्रा. सौ.संगिता भालसिंग

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...