मंगळवार, १ मार्च, २०१६

चोरी

गाय चोरता येईल
दुधाची प्रक्रिया नाही
मध् चोरता येईल
मधाची प्रक्रिया नाही ...

सौ.संगिता भालसिंग

काव्यचोर

🌻 दुष्ट काव्यचोरांनो 🌻

***********************

किंचितही प्रतिभा नसे स्वतःची
मात्र कविता चोरता लोकांची

ठेवा थोड़ी लाज शिलकीची
जनांची नाही तर मनाची

चाड ठेवा जराशी नितिमत्तेची
दुष्ट मती तुमची हलक्या प्रतीची

अशी हास्यास्पद कृती तुमची
ताजमहालावर नाव कोरण्याची

हौस किती ती मिरवण्याची
लोकांचे कपडे घालण्याची

भूक किती आधाशीपणाची
लोकांचे ऊष्टे खरकटे खाण्याची

काव्य चोरांनो याद ठेवा शापाची
झोप येणार नाही कधी शांततेची

कल्पना नाही तुम्हा काव्य सागराची
पर्वा नसे आम्हाला दोन थेंबाची

प्रा. सौ.संगिता भालसिंग

Spsfun. com

रेणुका आर्ट्स साहित्य संमेलन

01

🌹मैत्री 🌹

विश्वासाच्या घडीव मनावर

स्नेहाचे सुंदर कोरीव लेणे

क्षणभंगुर जीवन प्रवासात

मैत्रीविना व्यर्थ मानव जीणे

*********************

02

पहाटवेळी हातांचा हार झाला

काळजाचा निखारा गार झाला ...

कातरवेळी आठवांचा फेर झाला

पापण्यांना आसवांचा भार झाला ...

03

🌹 प्रेम 🌹

द्वैत अद्वैत मिटणे

अमर प्रेमाचे मर्म

कधी कळेल जगाला ...?

प्रेमाला जात ना धर्म ...

*********************
प्रा. सौ.संगिता भालसिंग

Spsfun. com

डॉक्टर

डॉ.सौ.रजनी पाटील
उस्मानाबाद...माझी मैत्रीण....
यांच्या साठी केलेली ही कविता
आज मंगलवार दि.01/03/16
एकमत वर्तमानपत्रातील साक्षी
पुरवणी मधे ...
प्रकाशित काव्य रचना ...!!

~~~~~~~~~~
💐सलाम डॉक्टर 💐

डॉक्टर म्हणजे
देवच तो भासे
चरणाशी दिसे
समाधान ...

रुग्णसेवा करी
दिनरात कष्ट
नका होऊ रुष्ट
कदापीही ...

लढाई देवाशी
यमाशीही करी
भिस्त ठेवा सारी
प्रयत्नाशी ...

डोळ्यात असतो
प्रेमाचाच भाव
आनंदाचा गांव
रुग्ण सेवा ...
------------------------
सौ.संगिता भालसिंग

रवि

रविदादा रविदादा
नमस्कार मी करते
सकाळ झाली म्हणून
तुला कस रे स्मरते ...?

प्रा. सौ.संगिता भालसिंग

अवकाळी

   अवकाळी

जरी आलास तू
अवकाळी होऊन ....
तरी माझं मन
गेलंय मोहरुन .....
*************
सौ.संगिता भालसिंग
1/3/15

तू अणि मी

     तू अणि मी

अथांग सागरी नौका मी
वल्हविणारा नाविक तू ...

सुगंधित कमलपुष्प मी
गुणगुणणारा भ्रमर तू ...

चमचमणारी चांदणी मी
सुंदर शीतल चंद्रमा तू ...

आधारी बहरणारी वेल मी
भक्कम विशाल वृक्ष तू ...

अबोल ईवली चिमणी मी
मंजुळ गायक कोकिल तू ...

वर्षा आतुर धरा मी
भरून येणारा जलद तू ...

बहरणारी सृष्टी मी
तळपणारा सूर्य तू ...

तुझ्या हृदयाची स्वामिनी मी
माझ्या हृदयाचा स्वामी तू ...

प्रा. सौ.संगिता भालसिंग

27/02/16
Spsfun. com

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...