सोमवार, ७ मार्च, २०१६

गुलमोहर

प्रथम क्रमांक प्राप्त रचना
********************

सही बोल यार ...चारोळी स्पर्धा
*************************
कातरवेळ ही भावनात चिंब न्हाली ,

लाजुन नयनबाण कटाक्ष टाकला ...!!

प्रेमस्वप्न कल्पना वास्तवात येऊन ,

ग्रीष्मातही मनी गुलमोहर फुलला...!!

**************************
सौ.संगिता भालसिंग
4/4/15

मन

लक्षवेधी रचना पुरस्कार प्राप्त
***********************

🌻सही बोल यार🌻
************************
1
जाण रे मना तू
कणभर सुख
मणभर दुःख
जीवनात ...
2
मनाचा मनाशी
असावा संवाद
नको वादावाद
घरामधे ...
3
देवा तुझ्या पायी
अडकले मन
धरिते चरण
दे आशिष ....
*********************
सौ.संगिता भालसिंग
7/4/15

आरसा

लक्षवेधी रचना गौरव प्राप्त रचना
*************************

सौंदर्य अंतरीचे दिसेना कुणाला
बाह्य रुपाची कारे किर्ती दिशा दाही ?
श्रृंगाराविन समोरंच उभी तरी
आरशाला मी खरी कळलेच नाही ...
***************************
सौ.संगिता भालसिंग
११•४•१५

प्रेम

प्रथम क्रमांक प्राप्त रचना

बालक अनाथ
सापडले मला
सांभाळले त्याला
जीवापाड ...
****************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
12/3/15

मोकळा श्वास

प्रथम क्रमांक प्राप्त रचना
********************

स्त्री मुक्तिचे चर्वित चर्वण ,

पुरे आता,दया वाव कृतिला ...!!

टिकली बांगड़ीचं जीवन ,

थोडा मोकळा श्वास हवा तिला ...!!

**************************
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
14/4/15
डॉ.बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

व्यथा

उत्तेजनार्थ गौरव प्राप्त रचना
**********************
        व्यथा
        ****

कशी सांगू मनाची व्यथा ..?

देई किती दुःख यातना .....

सोडव देवा वेदनेतुनी ,

करिते सदैव याचना ....!!

***********************
सौ.संगिता भालसिंग
12/5/15

वाचन

प्रथम क्रमांक प्राप्त रचना
*********************

वाचाल तर वाचाल,नका विसरू

ग्रंथ गुरू यशस्वी जीवन तारू

हसत खेळत लोळत वाचन करू

सदा सर्वदा ज्ञानाची कास धरू

*************************
सौ.संगिता भालसिंग
(देविका)
अहमदनगर

9 जानेवारी2016

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...