सर्वोत्कृष्ट रचना पुरस्कार प्राप्त
************************
नरमेध संपला शांतता पसरली ,
प्रेम संदेशाच्या पेटविल्या मशाली...!!
अमानुष काळोखी रात्र संपून ,
सोनेरी स्वप्न घेऊन पहाट झाली...!!
सौ.संगिता भालसिंग
24/5/15
11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
सर्वोत्कृष्ट रचना पुरस्कार प्राप्त
************************
नरमेध संपला शांतता पसरली ,
प्रेम संदेशाच्या पेटविल्या मशाली...!!
अमानुष काळोखी रात्र संपून ,
सोनेरी स्वप्न घेऊन पहाट झाली...!!
सौ.संगिता भालसिंग
24/5/15
वर्हाडी कट्टा
सर्वोत्कृष्ट रचना पुरस्कार प्राप्त
************************
आलास सुगंधी चंदन होऊन
शितलानंद कोमल स्वप्नाला ...
अविस्मरणीय क्षणाक्षणांची
गेलास आस लावून मनाला ...
•••••••••••••••••••••••••••
प्रा.सौ.संगिता भालसिंग
22/6/15
प्रथम क्रमांक प्राप्त रचना
********************
***********************
आईचा भाऊ,मुलांचा मामा
काळजाच्या खोल गाभ्यातला
मुराळी जातोय बहिणीला
चंद्र सखा,वेडा नभातला....
*********************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
29/6/15
प्रथम क्रमांक प्राप्त रचना
*******************
जखमा जाहल्या कधी काळी
वेदनेचे काळे व्रण मी साहते ....
निघाल्या खपल्या कातर वेळी
तुझ्या आठवणींचे ओझे वाहते ...
...........................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
24/1/15
तृतीय क्रमांक प्राप्त रचना
*******************
चांदण्या राती हात तुझ्या हाती ,पण
अतृप्त मन भरलेच नाही .....
जन्मोजन्माची अमर प्रीती ,अन
मी माझ्यात उरलेच नाही ......
........................................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
31/1/15
........................................
प्रथम क्रमांक प्राप्त रचना
********************
लज्जत चाखताना जीवनप्रवासाची
येता अवघड वळणं सुख दुःखाची ..
सोडणार ना कधी साथ सत्याची
हीच वाट माझ्या आयुष्याची ...
..................................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
८/२/१५
प्रथम क्रमांक प्राप्त रचना
*******************
अजाण कोवळी कलिका मी
खस्सकन ओढली कचकन तोडली
शरीरावरची खोल जखम भरली
पण...
मनावर खोल खूण आहे ...
**************************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
20 डिसेंबर2014
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...