रविवार, १० एप्रिल, २०१६

रात राणी

रातराणी

मनमोहक
सुगंधी रातराणी
मनाची राणी ...

सौ.संगिता भालसिंग
१९ एप्रिल २०१६
spsfun.com

पायवाट

निळी पिवळी
फुलांची पायवाट
सुगंधी थाट ...

सौ.संगिता भालसिंग

नववधू

नववधू
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
रूपगर्विता नववधू बावरी ,
साज शृंगार करुनी सजली ...
सुख स्वप्नांच्या आनंद सागरी ,
सजनाच्या कटाक्षाने लाजली ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
१० एप्रिल२०१६
spsfun.com
Copyright
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Good morning friends
🌹🌹🌹🌹💐🌹🌹🌹🌹

नववधू

नववधू
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
रूपगर्विता नववधू बावरी ,
साज शृंगार करुनी सजली ...
सुख स्वप्नांच्या आनंद सागरी ,
सजानाच्या कटाक्षाने लाजली ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
१० एप्रिल२०१६
spsfun.com
Copyright
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Good morning friends
🌹🌹🌹🌹💐🌹🌹🌹🌹

शुक्रवार, ८ एप्रिल, २०१६

गुढी पाडवा

🌹 गुढी पाडवा  🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

आंनद कलशाला कौतुकाची गाठी ,

समतेचे वस्त्र,बंधुतेच्या काठीला ...

मराठी मनाच्या,प्रेमळ मातीत ,

मानव्याची गुढी,उंच उभारु चला ...

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
दि.०८ एप्रिल २०१६
spsfun.com
नववर्ष गुढी पाडव्याच्या सर्वाना
हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐

गुरुवार, ७ एप्रिल, २०१६

सार

सार

जाती धर्माला वादाची
कडवट किनार आहे ...
उच्च मानवता मूल्य
सर्व धर्माचे सार आहे ...

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
०७ एप्रिल २०१५
spsfun.com
************
सुप्रभात

रविवार, ३ एप्रिल, २०१६

बोलकी बाहुली

🌻 बोलकी बाहुली 🌻

बोलकी बाहुली
नाव तिचे राणी
गाते सदा गाणी
गुणगुण ...

नाचरी बाहुली
तालसूर छान
हलविते मान
डुगडुग ...

हसरी बाहुली
खळी गालावर
हसु ओठावर
खुदुखुदु ...

उंचसे सैंडल
नाजुकशी चाल
टोपी गोल गोल
लालेलाल ...

कुरळे कुरळे
केस काळे काळे
घारे घारे डोळे
काळे काळे

सुंदरसा फ्रॉक
रंगीत झालर
उबदार स्वेटर
मऊमऊ ...

*******************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
०३ एप्रिल २०१६
spsfun.com
Copyright

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...