शुक्रवार, १५ एप्रिल, २०१६

प्रणाम महामानव

what's app वरील साहित्य मंथन
ग्रुप वर चारोळी स्पर्धेत विभागून
प्रथम क्रमांक प्राप्त रचना ....!!
*************************
       प्रणाम महामानव
*************************
प्रणाम महामानवा, देशसुपुत्र ,
सोनेरी पहाट,संपविली काळरात्र ..
उखडीले जातिभेद कुळगोत्र ,
पाठीशी शांतिदूत बुद्धाचे छत्र ...
*************************
प्रा. सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
दि.१४ एप्रिल २०१६
spsfun.com
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

सांजवेळ

सांजवेळ

किलबिल पक्षी
सांजवेळ झाली
आसऱ्याला आली
तरुचिया ...

निसर्ग निवांत
धावाधाव शांत
नविन प्रभात
नवी आस ...

प्रा.सौ.भालसिंग संगिता
१४ एप्रिल २०१६
spsfun.com

फुले

फुले

पहाट लाली
हसून उमलले
गंधित फुले ...

सौ.भालसिंग संगिता
१४ एप्रिल २०१६
spsfun.com

खेळ

    खेळ

का खेळ खेळशी ..?
शब्दा,तू माझ्याशी
जुळवुन तुझ्याशी
सदा घेते ...!!
*******************
प्रा. सौ.भालसिंग संगिता
14/4/15

द्वेष

द्वेष

जरी असेल भिन्न
वेष अणि देश ...
करू नये कुणाचा
मत्सर अणि द्वेष ...

प्रा. सौ.भालसिंग संगिता
१३ एप्रिल २०१६
spsfun.com

बुधवार, १३ एप्रिल, २०१६

रात

रात

कुजबुजत
गंध भरली रात
प्रेमी युगुल

सौ.भालसिंग संगिता
१३ एप्रिल २०१६
spsfun.com

धागे

धागे

जुळले धागे
सुगंध भरलेले
फुलही जागे

सौ.भालसिंग संगिता
१३ एप्रिल २०१६
spsfun.com

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...