सोमवार, १८ एप्रिल, २०१६

ये रे घना

ये रे घना

माती ओरडे करुण वेदनेने
उन्हाच्या वणव्यात जळून ..
व्याकुळ तृषार्थ धरा थकली
भरल्या घनाची वाट पाहून ...

प्रा.सौ.भालसिंग संगिता
१८ एप्रिल २०१६
शुभ संध्या

घाव

घाव

अदृश्य घाव उरात
झेलून येत आहे
नकार डंख परत
पेलून येत आहे ...

प्रा.सौ.भालसिंग संगिता
१८ एप्रिल २०१६
spsfun.com

रविवार, १७ एप्रिल, २०१६

प्राजक्त

प्राजक्त

सुगंधी प्राजक्त मनात
अजूनही दरवळत आहे...
पुन्हा पुन्हा आठवणीत
अजूनही जीव जळत आहे ..

प्रा.सौ.भालसिंग संगिता
१७ एप्रिल २०१६

आई

आई

आई तुझी खूप
आठवण येते ...
थकलेला जीव
कुशीत घेते ...

वाढले जरी वय
तरी मी बाल आहे ...
तुझेच कष्टाळू रक्त
माझ्या नसात वाहे ...

झिजलेली तुझी काया
मन गच्च भरून येते
तुझ्याच गुणांचे वस्त्र
ऊब पांघरुण घेते ...

नको करू काळजी
सुखाच्या राशीत आहे ...
तुझी बुथी अजूनही
आवडीने खात आहे ...

प्रा.सौ.भालसिंग संगिता
१६ एप्रिल २०१६

राम माझा पाठीराखा

मंगळवार दि.१२ एप्रिल २०१६
रोजी एकमत वर्तमान पत्रात
प्रकाशित रचना ...!!

शनिवार, १६ एप्रिल, २०१६

हे मृत्यो

मृत्यो

*
हे मृत्यो,कधीही ये,कसाही ये
देह नि आत्मा घेऊन जाऊ शकतोस
कागदावर उतरलेले काळीजशब्द तू
कधीही,कसाही घेऊन जाऊ शकत नाहीस ..!!
*

प्रा.सौ.भालसिंग संगिता
१६ एप्रिल २०१६
spsfun.com

वेडी राधा

वेडी राधा

नकाच विचारू
राधा वेडी कशी ?
अद्वैत भक्तीचे
प्रेम बावनकशी ...!!

प्रा.सौ.भालसिंग संगिता
१५ एप्रिल २०१६

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...