मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

वादळ

प्रथम क्रमांक प्राप्त रचना ..
1
आलास जीवनी
वादळ होऊन
उध्वस्त करुन
हृदय ते ...
2
गुढ सांजवेळी
वादळ उठले
मिठीत शमले
सजनाच्या ...
**************
सौ.संगिता भालसिंग
16/4/15
spsfun.com
Good night friends

सोमवार, १८ एप्रिल, २०१६

फुले,आंबेडकर

काव्यकीर्तिकर उत्कृष्ट चारोळी
गौरव प्राप्त रचना ...!!

काव्यकिर्ती समूह

चारोळी स्पर्धा  भाग ०३
*****************************
हा महाराष्ट्र फुले आंबेडकरांचा ,

स्वातंत्र्य,समता,बंधुता,शिक्षणाचा ...

सुरुंग नका लावू, जातीधर्माचा ,

घेऊया वसा,मानवता मूल्याचा ....

*****************************
प्रा. सौ.भालसिंग संगिता
१३ एप्रिल २०१६
spsfun.com

ये रे घना

ये रे घना

माती ओरडे करुण वेदनेने
उन्हाच्या वणव्यात जळून ..
व्याकुळ तृषार्थ धरा थकली
भरल्या घनाची वाट पाहून ...

प्रा.सौ.भालसिंग संगिता
१८ एप्रिल २०१६
शुभ संध्या

घाव

घाव

अदृश्य घाव उरात
झेलून येत आहे
नकार डंख परत
पेलून येत आहे ...

प्रा.सौ.भालसिंग संगिता
१८ एप्रिल २०१६
spsfun.com

रविवार, १७ एप्रिल, २०१६

प्राजक्त

प्राजक्त

सुगंधी प्राजक्त मनात
अजूनही दरवळत आहे...
पुन्हा पुन्हा आठवणीत
अजूनही जीव जळत आहे ..

प्रा.सौ.भालसिंग संगिता
१७ एप्रिल २०१६

आई

आई

आई तुझी खूप
आठवण येते ...
थकलेला जीव
कुशीत घेते ...

वाढले जरी वय
तरी मी बाल आहे ...
तुझेच कष्टाळू रक्त
माझ्या नसात वाहे ...

झिजलेली तुझी काया
मन गच्च भरून येते
तुझ्याच गुणांचे वस्त्र
ऊब पांघरुण घेते ...

नको करू काळजी
सुखाच्या राशीत आहे ...
तुझी बुथी अजूनही
आवडीने खात आहे ...

प्रा.सौ.भालसिंग संगिता
१६ एप्रिल २०१६

राम माझा पाठीराखा

मंगळवार दि.१२ एप्रिल २०१६
रोजी एकमत वर्तमान पत्रात
प्रकाशित रचना ...!!

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...