जरा गंमत...
नंदेच कार्ट
नणंदबाई आल्या
त्रास देऊन गेल्या
आल्या त आल्या
भांडण लावून गेल्या
गेल्या त गेल्या
शेंबडं पोरगं
ठेवून गेल्या
ठेवलं त ठेवलं
आंगड़े टोपड़े
घेऊन गेल्या
काय मी करू ...?
नंदेच कार्ट
कीर कीर करत
कार्ट रात्रीच् रडतं
सकाळी लवकर
उठत नाही
दिवसा ते काही
झोपत नाही
जे केलं ते
खातच नाही
काहीपण मागतय
दुकानात पळतय
कुर कुरे खातंय
किती वेळा त्याचा
शेंबुड पुसू ...?
अरे देवा रे ...
सोडव यातून
नणंदबाई ला
दे चांगली बुद्धि...
पोरग जा घेऊन
कपडे चांगले
देते घेऊन
लवकर मोठे
होऊ दे
अणि बापाचं
मामाचं
नाव गाजवु दे
********************
सौ.संगिता भालसिंग
26/4/15
spsfun.com
( लोकगीताचा आधार )