मंगळवार, ३ मे, २०१६

क्षण

क्षण

तुझा कोमल हात
माझ्या हातात होता
किती विश्वासाने तू
घट्ट धरला होता ...

बंद पापण्यातले स्वप्न
माझ्या सवे पाहत होती
हात कधी सोडणार नाही
याची तुला खात्री होती ...

मनीचे गुज सांगताना
आनंदाने हसत होती
आयुष्य सुंदर आहे
समजल्याने फुलत होती ...

आज मात्र रुसुन बसली
कुठेतरी दडून बसली आहे
सहवास क्षण आठवून
रोमरोमात बसली आहे ...

सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
०३ में २०१६
Copyright
Good night
spsfun.com

सोमवार, २ मे, २०१६

चिमणी अणि माकड

🌻 चिमणी अणि माकड 🌻
••••••••••••••••••••••••••••••
एका झाडावर एक
चिमणी राहात होती ...
रात्रंदिवस सोबत तिला
माकड़ाची होती ...

चिमणीचे घरटे खुप
सुंदर होते ..
माकडाला मात्र
घरच नव्हते ...

उन्हाळ्यात खुप
उन लागत असे
पावसाळ्यात खुप
पाऊस लागत असे

हिवाळयात खुप
कुडकुडत असे
चिमणी त्याचे हाल
पहात असे ...

घर बांधण्याचा उपदेश
सतत चिमणीने केला ..
माकड़ खुप वैतागले
पण निवारा नाही केला

चिमणीचा उपदेश
माकडाला खटकले
रागावून चिमणीचे
घरटेच उखडले ••••
•••••••
तात्पर्य _
फुकटचा उपदेश
कोणाला देऊ नये अणि
स्वतः चे नुकसान करुन
घेऊ नये •••
•••••••••••••••••••••••
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
शुभ प्रभात
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

रविवार, १ मे, २०१६

महाराष्ट्र

🌹 महाराष्ट्र 🌹

संपन्न परंपरा
महान संतांची
उत्तम पंतांची
महाराष्ट्र ...

मंगल पवित्र
नद्यांचा संगम
असे सुजलाम्
महाराष्ट्र ...

क्षत्रिय काटक
दऱ्या खोऱ्यात
शोभतो तुऱ्यात
महाराष्ट्र ...

भारत मातेचे
बाळ आवडते
कुशीत खेळते
महाराष्ट्र ...

इतिहास मोठा
प्रिय स्वराज्याचा
राजा शिवबाचा
महाराष्ट्र ...

कस्तुरी सुगंध
मराठी मातीचा
टिळा कपाळीचा
महाराष्ट ...

प्रा. सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
०१ में २०१६

शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६

ओठ

ओठ

गुलाबी ओठांशी ,

ओठांनीच बोलावे ...

काळजाचे गुपित ,

हळुवार खोलावे ...

सौ.भालसिंग संगिता
२८ एप्रिल २०१६
spsfun.com

गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

कटाक्ष

कटाक्ष

तिरपा कटाक्ष नजरेचा ,
काळीज चिरून गेला ...
भावना लपविण्याचा ,
प्रयत्न विरुन गेला ...

प्रा. सौ.संगिता भालसिंग
( देविका )
अहमदनगर
२८ एप्रिल २०१६
spsfun.com

असावी लागते

असावी लागते

जगायला प्रीती
मरायला माती
असावी लागते

जीवनाला गती
प्रेरणेला स्तुती
असावी लागते

विचाराला मिती
दिव्याला वाती
असावी लागते

वागायला नीती
जोडायला नाती
असावी लागते

यशाला कृती
अपयशाला भीती
असावी लागते

आनंदाला स्थिती
वेदनेला क्षती
असावी लागते

प्रा.सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
२८ एप्रिल २०१६

सुप्रभात

बुधवार, २७ एप्रिल, २०१६

सागर किनारा

   सागर किनारा

अंकुरल्या मातीला चुंबण्या ,
धावत येई सागरी किनारा ...
आकाशीचा चंद्र नि चांदण्या ,
खोडीलसा देई गुपित पहारा ...

प्रा.सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
spsfun.com

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...