एकमत वर्तमानपत्र-साक्षी पुरवणी मधे
आज दि.१२ जुलाई २०१६ रोजी
माझी कविता प्रकाशित.....!!
11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
मंगळवार, १२ जुलै, २०१६
सोमवार, ११ जुलै, २०१६
मोगरा
शुक्रवार, ८ जुलै, २०१६
चित्रशलाका स्पर्धा भाग ०४
चित्रचारोळी स्पर्धा क्रमांक---४ ( समिक्षण )----मेसेज क्र.---७
एवढ्या विश्लेषनानंतर मी आता निकालाकडे वळतो. निकाल सांगण्या आधी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की मी सर्व चारोळ्या ४/५ वेळेस लक्ष देऊन वाचून माझ्या अल्पमतिप्रमाणे मी समिक्षण केले आहे. अंतिम निकष हाच की कोणती चारोळी माझ्या मनाला जास्त भिडली. निकाल खालीलप्रमाणे आहे:--
पहिला--- १) भाऊसाहेब बोराडे
२) पियू जाधव
दुसरा--- १) शशिकला बनकर
२) निलू मानकर
तिसरा--- १) प्राची देशपांडे
२) अजीत करंबेळकर
लक्षवेधी--१) सोनाली देशमुख धनमने
२) संगीता देशमुख
उत्तेजनार्थ-१) प्रल्हाद दुधाळ
२) नवनाथ सोनवळकर
विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा.
निशिकांत देशपांडे
*************************
पोटाची खळगी भरण्या
प्रयत्न सारा ।
जीवनाच्या दोरीवर चालते
घेऊन स्वप्नांचा सहारा ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर ( धुळे )
=======स्पर्धेसाठी=======
-------------------------------------------
दारिद्रयदोरीवर घेवून लोटा डोई ,
-------------------------------------------
चाले पोरं डोंबाऱ्याची चिमुकली .
-------------------------------------------
भटकंतीने शिक्षण नशिबी नाही ,
-------------------------------------------
पोटासाठी आयुष्याची पायमल्ली .
-------------------------------------------
====© ॐनिल पाटील ©====
दुख अंतरी किचकट जहरले
अज्ञानाचे पोट हे दोरी वरले...
दीन जगणे, असह्य वेदनेने
श्वास, पंचप्राण रोखूनी धरले....
रोहिदास होले .....
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे..... ०१/०७/२०१६
आयुष्याची लढाई जिंकण्या
दोरीवरुनी मला चालायचे
कितीही संकटे येवो जीवनी
हे हास्य न कमी व्हायचे ...
-भाऊसाहेब बोराडे ,नाशिक
चित्रशलाका स्पर्धेसाठी :::
डोंबारीचा खेळ हा पोटासाठी
सांवर तोल आपला संसारी
ईमानींचे ना नाही कष्टासाठी
आज इथे, उद्या तिथे गुजारी
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे ४११०४४
कसब माझा जीव माझा
काय चालले हो कारभारी
तोल सांभाळून भार ठेवते
थाप दया ती ललकारी
शिरीष देशमुख
पोटासाठी पडण्याची भीती नाही
पोटासाठी लढण्याची प्रचीती आहे
ज्या वयात आनंदासाठी खेळ असतो
तोच दुःख टाळण्याची निती आहे
@ सनिल पांगे
पोटासाठी वणवण करिती
डोबारी जीवावर उदार होती
लहानग्यांनाही वेठीस धरती
तारेवरची कसरत करती
प्राची देशपांडे
पोटासाठी फिरतो वनवन
दोरीवरती कसरत करुन
स्वप्नांना आमुच्या देऊनी तिलांजली
बालपणातच करतो उदर भरण
सौ.शुभांगी धारमळकर ,पुणे
स्मित हास्ये खेळ दावते दोरी वरचा,
तोल सावरे घटासह, आधार तिचा समजल का?
साद घाली हास्य ते; पै-पैका मिळाया,
तमा तिच्या अंतरीची, सांगा कोणा उमजल का?
-सुधीर बेंद्रे.
डोंबाऱ्याचं पोर
घाबरायच न्हाय
पोटाची खळगी
भरावयास ,लाजायच न्हाय ..!!
================ निलु .
आयुष्याच्या दोरीवरती
ही कसरत जगण्याची
देऊ आणि देत राहु जगा
महती ही ताठ कण्याची
.
.......पियु जाधव......
डोंबारीन तू गं चिमुकली
कष्ट सोहळे हसून झेलती ...!!
राजदंड तो नशिबाचा रोज
आनंदे लिलया पार करती ...!! ...
अंजली अंजली ......
चारोळी चित्रस्पधे साठी
नियतीचा हा खेळ
कुणास कधी चुकला
या दोरखंडावरच
आयुष्याचा हा खेळ मांडला
शरद
पोर गं तू डोंबा-याची
दिवस तूझे हिंदोळयावर झूलायचे,
खळगी भरण्या पोटाची
सांभाळते अलवार तोल नशीबाचे.
सौ.किरण पिंपळशेंडे.
नागपूर
स्पर्धेसाठी
होय अभिमान, आम्ही दाखवितो धंदा डोंबारी खेळ ..!
स्वीकारले ते आम्ही आनंदे बसविण्या भाकरीचा मेळ ..!
उगाच हीणवून कष्टाला आमुच्या नको घालू खिळ ..!
उसने प्रेम, बोलाची कडीने ना उध्दारे आमचे कुळ ..!
बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
दोरीवरी मटकी घेत तोल सावरते
अज्ञानी आहे मी डोंबार्याची लेक.....
आई बाबांच्या संसाराचा गाडा हाकते
हवा आम्हां आसरा, शिक्षणाची भिक....
अश्लेषा मोदी
ढोलकाच्या तालावर
होऊन उदार जीवावर
नशीबाचा चाले खेळ
उदरनिर्वाह या कलेवर
........@सुदर्शन टोपरे- अंजनगावसुर्जी @....
डोईवर घेऊन घट
दोरीवर सांभाळी तोल
टीचभर या पोटासाठी
उमलण्यापूर्वी कोमजते फुल
................................. वैशाली रा. रसाळ
पोटात भूकेची आग आहे पण
हास्य चेहर्यावर तुमच्यासाठी
शाळेत जायचे वय माझे पण
कसरत करते मी जगण्यासाठी
अजित करंबेळकर
डोंबिवली.
चित्रशलाका स्पर्धा भाग -4
काठीच्या टोकावर बांधलाय दोर
डोईवर लोटी अन् हातात काठी
करामत दाखवे इवलीशी पोर
दोरीवर चाले दोन घासासाठी
गुरुदत्त वाकदेकर, मुंबई
स्पर्धेसाठी चारोळी
नजरेत नाही भीती,तोल सावरी काठी
जगण्यावरती करी प्रिती, हिम्मत मोठी
टीचभर पोटासाठी सारा आटापिटा करी
जीवनाशी झुंजताना हसू फुलले ओठी
© सौ.शशिकला बनकर, भोसरी, पुणे
स्पर्धेसाठी
चित्रशलाका
"पोटासाठी करताना कसरत
मनाचा सांभाळावा लागतो तोल,
दुख लपवून हसल्याशिवाय
या जगण्याला नाही मोल!"
-संगीता देशमुख वसमत
खळगी भरण्या पोटाची
दोरीचा घेतला आसरा
भूकेने झाली व्याकूळ
तरीही चेहरा हासरा?
Sonali Deshamukh
स्पर्धेसाठी
---------
डोईवर तांब्या, हातात काठी घेऊन
दोरीवरून प्रपांचाचा तोल सावरीत..
डोंबारीचा खेळ करून चिमुकली पोर
शिक्षण सोडून जीवन जगते संघर्षात..
विलास साळवे
विक्रोळी, मुंबई .
९८२०५९६४७२.
....... खेळ .......
डोंबाऱ्याची इवली पोर
कौशल्य खेळाचे दावते....!
दोन वेळेच्या घासापायी
आयुष्य पणाला लावते....!
.... प्रल्हाद दुधाळ
चित्रशलाका स्पर्धेसाठी चारोळी भाग 0४
~डोंबा-याचा खेळ~
हातामध्ये घेऊनी काठी ती सावरतेया तोल
भाकरीचा चंद्र शोधण्या ही आली भावंडावर वेळ !
हसरा चेहरा भास मनीचा त्यांच्या हृदयी दुःखडोह
विंचवाचे बि-हाड पाठी नशिबी डोंबा-याचा खेळ !
©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
रा- गोपालखेड ता. जि. अकोला Mo-9689634332
copyright aniket deshmukh
दिनांक 03 जुलै २०१६
"चित्रशलाका"fb
चित्रचारोळी स्पर्धेसाठी...
दोरीवर चालते,
तोल सावरतं।।
मिळते भाकर,
करीता कसरतं।।
✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050
तीच माझी जीवनसाथी
भुक ,दोरी अन लाठी
अवाक नजरा तुमच्या
चाले खेळ पोटासाठी
कैलास दिनकर
सुलभा कुलकणीॅ
हाती काठी ,गडू माथा पायाखाली दोरखंड
अभिमान,आत्मविश्वास मनी बलदंड
कुटुंबाचे उदरभरण हे एकच वेड
वाजे ताशा,गाठूनी मध्य दोरीचा झुलविण्या नाही खंड!
£********************£
सुलभा कुलकर्णी
,कसरत ती दोरीवरची,
तोल सावरून जीवनाचा,
चेह-यावर हसू, पोटात भूक,
खेळ जीवाचा, चार पैशाचा,
- नवनाथ रामचंद्र सोनवलकर,
खाना, खेल, पढाई, प्यार
द्या मला माझा अधिकार....
पोटाची या भुक शमवण्या
खेळ खेळते मी डोंबार....
* सुरेखा *
-------------------------------------
सावरला तो तोल माझा.....
दोरीसंग त्या निर्जीव काठीन......
होते ती मनमौज तुमची......
घाबरतो जीव गर्दीच्या दाटीवाटीनं.....
@ राज देव.
------------------------------------
करणी
बुधवार, ६ जुलै, २०१६
सोमवार, ४ जुलै, २०१६
माऊली
New Post
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...
-
मराठी १२ वी - बोर्ड परीक्षा - निबंधलेखन - विषय यादी इयत्ता १२ वी मराठी साठी परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता असलेले निबंधाचे जास्तीतजास्...
-
अर्थशास्त्र - इयत्ता १२ वी - महत्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न शाखा - कला आणि वाणिज्य अर्थशास्त्र (49) प्रश्न क्रमांक 6 तीनपैकी दोन सोडवा.( ...
-
सावरु दे... मुक्तपणे हवे तसे वावरू दे मला... डोईवर भार असे सावरू दे मला... भरारते पंख असे पाखरू दे मला... उबदार जिद्द अशी पांघर...