गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

चित्रशलाका स्पर्धा भाग ०५

चित्रशलाका स्पर्धा भाग ०५
दि.०१/०८/१६ ते १०/०८/१६

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन💐

प्रथम क्रमांक विभागून

स्पर्धेसाठी
*********

टोपलीत चविष्ट झुणका भाकर
घेऊनी माझ्या संगे आहे वासरू.!
अधीर मी चालले भेटाया रायास
सुखद खळी गाली लागले पसरू.!!

विलास साळवे
विक्रोळी, मुंबई .
९८२०५९६४७२.

नार नखरेल मी कंच बांधा,
ठुमकत चालते ही वाट शेताची..
नको अडवू मसजी रे वासरा,
चल,संगतीनं नेऊ भाकर कष्टाची...

   - सौ. कस्तुरी...

द्वितीय क्रमांक विभागून

डोईवर शिदोरी पाठीवर वेणी
ठेवूनी स्मितहास्य चिंता असे मनी,
घुटमळे वासरु वाट अडवूनी
बैलांसोबत राबतो उन्हात धनी..

वनिता शिंदे-किर्दकुडे

......
पाटी शिदोरीची घेवून डोईवर...
शिवाराकडे चाले नार झरझर...
म्हणे घरधनी भुकेला शेतावर...
गोंडस पाडस आडवे वाटेवर...

श्रीकृष्ण चंद्रकांत कीर

तृतीय क्रमांक विभागून

माझीया मुखी हसू येतसे आपसूक
धन्यास शिदोरी घेऊन जात असता
ओढ वासरासही माझ्या रायाची
करिसी हट्ट मी तया भेटीस निघता .

.......पियु जाधव

घरधनी राबतो शेतामंदी
वासरु घुटमळतय पायामंदी.....
भाकरी घेतली टोपलीमंदी
धन्याची काळजी हृदया मंदी......
       ** अश्लेषा मोदी **

लक्षवेधी रचना

**** चित्रशलाका ५ ****
नको रे वासरा पायात तू घुटमळू
जाऊ दे ना आता न्याहरी घेवूनी झणी..!
सकाळपासुन रानात राब राबतो
असेल व्याकूळला भुकेने माझा धनी..!
             ...... प्रल्हाद दुधाळ.

नको अडवू आज वाट वासरा
जायचेय शिदोरी पोचवायला ....
शेत नांगरुण थकलेत धनी
भेटाया जीव माझा आतुरला ....

                   * सुरेखा एम् पाटील

उत्तेजनार्थ रचना

चित्रशलाका स्पर्धा भाग-५ साठी                         शेतात राबतो सजना माझा                                न्याहरी  घेवून चालले मी                                    सजनाच्या त्या भेटीसाठी                                  मनी अशी बावरले मी                                       किशोर भीमराव झोटे, औरंगाबाद

*चित्रसलाका _ स्पर्धेसाठी*

मनाची झाली द्वीदावस्था,
कळेना मज कशी सावरु..?
शेता राबुनी भुकेला बाबा,
वाटेत हंबरते वासरु..!
             _ श्री. संतोष शेळके / कर्जत

💐💐💐💐💐💐💐💐💐

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

सखी

आज मंगळवार दि.०९/०८/२०१६
एकमत वर्तमानपत्रात साक्षी पुरवणी
मधे माझी कविता प्रकाशित .
कवितेचे नाव- सखी(कविता)

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

नारी अबला,सबला

What's app वरील साहित्य दर्पण समूहात
झालेल्या चारोळी स्पर्धेत माझी रचना
प्रथम क्रमांक प्राप्त .....!! 
नारी सबला असो की अबला
नशिबावर बलात्कार टळत नाही ...
उपभोगाची वस्तू म्हणूनच नेहमी
जग तिच्या तनामनाशी खेळत राही...
सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
21जुलाई2016

शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

मी एक

मंगळवार दि.०२ ऑगस्ट २०१६
आज एकमत वर्तमान पत्रात
साक्षी पुरवणी मधे माझी कविता
प्रकाशित...

सौ.संगिता भालसिंग

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...