11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
शनिवार, १० सप्टेंबर, २०१६
शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६
गणाधीश
४१
सदा असू दे रे
तुझी छत्र छाया
आम्हावर माया
गणराया ...
४२
ओंकार स्वरूप
रूप मनोहर
नाचतो सुंदर
गणराया ...
४३
सकाम निष्काम
भक्ती मी करिते
उपास धरिते
गणराया ...
४४
संकटी पावशी
सुखकर्ता तूच
दुखहर्ता तूच
गणराया ....
४५
साष्टांग प्रणाम
प्रथम वंदन
गौरीचा नंदन
गणराया ...
४६
गणराया तुझे
थुलथुले पोट
गबदुले बोट
छान किती ....
४७
विशाल कपाळ
तल्लख बुद्धिचे
वेद वाणी वचे
गणराया ....
४८
श्रवण मनन
करितो चिंतन
भले मोठे कान
गणेशाचे ...
४९
अवखळ फार
पार्वतीचा पुत्र
ज्ञानीयाचे नेत्र
गणेशाचे ...
५०
चार भुजा धारी
अस्त्र शस्त्र करी
दुर्जन संहारी
गणराया ...
प्रा. सौ.संगिता भालसिंग
दि.०८/०९/१६
गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६
गजानन
३१
हे गणनायका
सकलांचा त्राता
विनविते आता
दर्शन दे ....
३२
तारणहार तू
सकलांचा दाता
पावसी वंचिता
गजानना ...
३३
लाल रक्त वर्ण
जास्वंदी सुमन
पार्वती नंदन
भुललासे ...
३४
शितल दुर्वांची
गणेशा आवड
काढिते सवड
तोडायला ...
३५
कपाळी घातला
केशराचा गंध
गणा झाला धुंद
सुगंधाने ...
३६
भाळावर शोभे
चंदनाचा टिळा
पायामधे वाळा
गणेशाच्या ...
३७
मंगलमूर्ती तू
संकटाला धाव
नवसाला पाव
भक्तांचिया ...
३८
चंदनाचा पाट
बसायला तुला
पितांबर तुला
नेसायला ...
३९
मऊमऊ वस्त्र
रेशमाचे धागे
हसायला लागे
गणराज ...
४०
रेशमी वस्त्राला
लाल लाल काठ
मोद काठोकाठ
गणेशाला ...
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
दि.०८/०९/१६
शोध सुखाचा
शोध सुखाचा
शोध सुखाचा,किती आटापिटा ?
भोग दुःखाचे,टळलेच नाही ...
नश्वर जन्म,जरी पडे थिटा
प्रयत्नाविन ढळलेच नाही ...
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
दि.०१/०९/१६
मोहरे
मोहरे
काळे पांढरे
लढती मोहरे...
चिंतेत सारे
उत्सुक चेहरे ...
नजर पटावर
विचार नितिवर
चाल शत्रुवर
लक्ष्य यशावर ....
हत्ती सरळ
ऊंट वाकडा
अडीच उडी
मारतो घोडा ...
वजीर सेनापती
चपळाई फार
इंच इंच सरकती
प्यादे छोटे स्वार ...
सुरक्षा रिंगणात
एक घर चाले
राजाचे फिरणे
बंदिस्त केले ...
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
New Post
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...
-
मराठी १२ वी - बोर्ड परीक्षा - निबंधलेखन - विषय यादी इयत्ता १२ वी मराठी साठी परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता असलेले निबंधाचे जास्तीतजास्...
-
अर्थशास्त्र - इयत्ता १२ वी - महत्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न शाखा - कला आणि वाणिज्य अर्थशास्त्र (49) प्रश्न क्रमांक 6 तीनपैकी दोन सोडवा.( ...
-
सावरु दे... मुक्तपणे हवे तसे वावरू दे मला... डोईवर भार असे सावरू दे मला... भरारते पंख असे पाखरू दे मला... उबदार जिद्द अशी पांघर...