शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

नटखट रसना

साहित्य दर्पण समूह ... कविता स्पर्धा ....
*******************************
द्वितीय क्रमांक प्राप्त रचना
*******************************

🌻 नटखट रसना 🌻

नटखट रसना
सर्व आजाराचे
महाद्वार आहे ...
नसेल लगाम
तर जीवनाची
महा हार आहे ...

बत्तीस रक्षकात
राणी मुख राजाची
किती गचाळ आहे ...
बाहेर पडली तर
वाणी वाचाळ आहे ...

लक्षात ठेव मानवा
तलवारी पेक्षाही
तीला धार आहे ....
एक एक शब्द
कोमल काळजावर
मोठा वार आहे ...

एक घाव दोन तुकडे
करणारी नार आहे ...
पण षडरस तिच्यात
विविधता फार आहे ...

माणूस तोडण्याची
अणि जोडण्याची
मजबूत तार आहे ...
तिच्या शांतीत
मानव्याचे सार आहे ...

संयम मनाचा
उपाय मानवा
फार जरूर आहे ...
दृढ़ निश्चय केला
तर, तिच्यातून
अमृत झरा वाहे....

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
दि.१०/०९/१६
spsfun.com

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

पाऊस

पाऊस

पाऊस आलाय
तन ओलावलं
मन धुंदावलं ...

सौ.संगिता भालसिंग
Sixword stories
spsfun.com
Good night....!!

बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

संवाद

तुझं माझं पटेना
तुझ्या वाचून कठेना ....!!
वाद संवादाविना
प्रश्न काही सुटेना ...!!

गैरसमजाचा दानव
वाढवितो दुरी ....!!
मिटे वाद तो
संवाद हितकारी ...!!

Sangita Bhalsing
Ahamadanagar
spsfun.com

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

श्री गणराज

मन अथांग सागर या समुहात
सुधाकरी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त रचना
एकूण 50 रचना ....!!
---------------------------------------------------------------------------
मन अथांग सागर
सुधाकरी स्पर्धा
दि.०६/०९/१६
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
०१
पहिले नमन
गणराया तुला
आशीष दे मला
सुबुद्धिचा...

०२
बाप्पा मोरया रे
वक्रतुंड देवा
करिते मी सेवा
मनोभावे ...

०३
गणराया तुझी
महाकाय मूर्ती
त्रिखंडात किर्ती
दुमदुमे ...

०४
गणराया तुझे
सुपासम कान
गळा अणि मान
दिसेचना ...

०५
गणराया तुला
महादेव पिता
पार्वती ती माता
भाग्यवान ...

०६
मळाचा गणेश
पार्वतीने केला
शंकर लढला
दारामधी ...

०७
गणराया तुझे
चमकती डोळे
भाविक ते भोळे
अचंबित ...

०८
ओवीत गायले
गणेशाचे रूप
मनाला हुरुप
सदोदित ...

०९
गणराया तुझ्या
पायामधे वाळा
नर्तनाचा चाळा
मोहवितो ..

१०
मोदक नि लाडू
नैवेद्याला केले
गोड तोंड झाले
गणेशाचे ...

११
खोबऱ्याचा किस
साखरेची पिठी
मोदकाची वाटी
गणेशाला ...

१२
स्नेह खोबऱ्याचा
गोडी साखरेची
आवड गणूची
मोदकाची ...

१३
हाती पंचारती
कापुराची ज्योती
भक्त ओवाळीती
गणेशाला ..

१४
ओवाळू गणेशा
नयनांच्या ज्योती
गाऊया आरती
हर्षभरे ...

१५
दोन्ही नेत्री हिरे
चमकती फार
शोभतो सुंदर
गणराज ...

१६
तुंदिल तनुचा
श्री गणनायक
वाहन मूषक
ईवलासा ...

१७
गणराया तुझे
सजले मखर
सुमनांचे हार
सुगंधित ...

१८
गौरी नि गणेश
बहिण भावंड
ममतेची जोड़
अविरत ...

१९
एकविस दूर्वा
गणुला वाहिन
उपास करीन
निर्जलीचा ...

२०
मृदंग वाजतो
गणेश नाचतो
भक्तही डोलतो
तालावर ...

२१
अंकुश परशु
हातातली शस्त्र
गणेशाचे अस्त्र
दुष्टांवर ...

२२
ऋद्धि अणि सिद्धि
लाडक्या या भार्या
गाऊ चला आर्या
गणेशाला ...

२३
दोनदा जन्मला
पार्वतीचा बाळ
कर्दनांचा काळ
द्वैमातुर...

२४
दोन वेळा जन्म
माघाची चतुर्थी
भादाची चतुर्थी
द्वैमातुर....

२५
गजराज मुख
मानवी शरीर
वाहन उंदीर
गणेशाचे ...

२६
परशु रामाने
दात उपटला
एकच राहिला
गणेशाला ...

२७
विसरु नका रे
गणेशाचा बंधू
चला सारे वंदु
कार्तिकेय ...

२८
शिव पार्वतीला
केली प्रदक्षिणा
जागले वचना
गणराज ...

२९
ऐरावत मुख
इंद्राचे वाहन
लावले कापून
गणेशाला ...

३०
महाभारतात
व्यास कूट श्लोक
गणेश लेखक
बुद्धिवान ...

३१
हे गणनायका
सकलांचा त्राता
विनविते आता
दर्शन दे ....

३२
तारणहार तू
सकलांचा दाता
पावसी वंचिता
गजानना ...

३३
लाल रक्त वर्ण
जास्वंदी सुमन
पार्वती नंदन
भुललासे ...

३४
शितल दुर्वांची
गणेशा आवड
काढिते सवड
तोडायला ...

३५
कपाळी घातला
केशराचा गंध
गणा झाला धुंद
सुगंधाने ...

३६
भाळावर शोभे
चंदनाचा टिळा
पायामधे वाळा
गणेशाच्या ...

३७
मंगलमूर्ती तू
संकटाला धाव
नवसाला पाव
भक्तांचिया ...

३८
चंदनाचा पाट
बसायला तुला
पितांबर तुला
नेसायला ...

३९
मऊमऊ वस्त्र
रेशमाचे धागे
हसायला लागे
गणराज ...

४०
रेशमी वस्त्राला
लाल लाल काठ
मोद काठोकाठ
गणेशाला ...

४१
सदा असू दे रे
तुझी छत्र छाया
आम्हावर माया
गणराया ...

४२
ओंकार स्वरूप
रूप मनोहर
नाचतो सुंदर
गणराया ...

४३
सकाम निष्काम
भक्ती मी करिते
उपास धरिते
गणराया ...

४४
संकटी पावशी
सुखकर्ता तूच
दुखहर्ता तूच
गणराया ....

४५
साष्टांग प्रणाम
प्रथम वंदन
गौरीचा नंदन
गणराया ...

४६
गणराया तुझे
थुलथुले पोट
गबदुले बोट
छान किती ....

४७
विशाल कपाळ
तल्लख बुद्धिचे
वेद वाणी वचे
गणराया ....

४८

श्रवण मनन
करितो चिंतन
भले मोठे कान
गणेशाचे ...

४९
अवखळ फार
पार्वतीचा पुत्र
ज्ञानीयाचे नेत्र
गणेशाचे ...

५०
चार भुजा धारी
अस्त्र शस्त्र करी
दुर्जन संहारी
गणराया ...

प्रा. सौ.संगिता भालसिंग
दि.०८/०९/१६
spsfun.com
Good evening friends......!!

श्री गणराया

आज मंगळवार दि.१३/०९/१६
रोजी एकमत वर्तमानपत्रात
माझी कविता प्रकाशित ....!!
  *श्री गणराया*
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com

शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

कर भरणी

*करभरणी*
******************

आम्ही कुल कारभारणी
करतो सर्वांची मनधरणी ...
लाभनफ्याचा विचार नाही
आयुष्यभर करतो कर भरणी ...!!

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
दि.१०/०९/१६
spsfun.com

चित्रशलाका स्पर्धा भाग ०६

चित्रशलाका फेसबुक समूह
**********************
चित्रशलाका ( चारोळी ) स्पर्धा
दि.०१/०९/१६ ते १०/०९/१६
************************

निकाल

प्रथम क्रमांक
विभागून
श्रीकृष्ण चंद्रकांत किर
शैलेश येवले

द्वितीय क्रमांक
विभागून
अजित करंबेळकर
मेघराज मोकाशी

तृतीय क्रमांक
विभागून
नवनाथ सोनवलकर
सुधीर बेंद्रे

आकर्षक क्रमांक
विभागून
अर्चना माने
वैशाली रा.रसाळ

उत्तेजनार्थ
अंजली अंजली
कवी अनिकेत जयंतराव देशमुख

***********************
सर्व विजेत्या रचना अणि सहभागी
रचना पुढील प्रमाणे....!!

सर्वांचे हार्दिक अभिनंदन

1.*चित्रशलाका स्पर्धेसाठी*

सन आला आज पोळ्याचा
श्रावण मासातील अखेरचा
शेतकर्याच्या कुलदैवताचा
करू सन्मान चला बैलपोळ्याचा

घनश्याम बोह्राडे
बुलडाना

2. सावकारी पाशानं घेतला जीव
बाप गेला  हकनाक फासावर
लहानगं लेकरु बैल घेऊन
चाललं सावकाराच्या वाड्यावर
प्राची देशपांडे.

3.  विश्वासानं दोरी हातात दीली धाकलं धनी
घ्यायची नाही बरं का ती गळ्यात
गाडली होती स्वप्नं थोरल्या धन्यानं रानी
चला उगवूया घाम शिंपून मळ्यात
------सुनिलनाना पानसरे -----------

4. *चित्रशलाका स्पर्धेसाठी*

धस्ट पुस्ट बैल
वाटतोय बिचारा,
लहानग्याच्या हातात
त्याची वेसण आणि कासरा!

अक्षय काळे
श्रीरामपूर

5. शेताचा मी धाकला धनी
पर बापा तूच मव्हा धनी
तुझ्याबिना नकसणार जमीनी
दिवस तुझा आज कर जोडु दोनी
           शशी खंडाळकर पुणे
            01।09।2016

6. ........
इवल्या हाती धरून कासरा....
भावी बळीराजा दाखवी तोरा....
मागे वृषभाचा डौल पाहूनी......
वाटेची दुचाकी करी किनारा....
.................... कवी ‘सुजन’

7.
का वाटू लागली रे बळीराजांनो

कष्टाची,घामाची लज्जा अघोरी.....?

कासरा घेऊन बैल सोबतीला मी

मातीतला घडेल रांगडा शेतकरी ....

रोहिदास होले ,,,...
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे...
०१/०९/२०१६

8.
====स्पर्धेसाठी======
-------------------------------
नंदीस हा घेऊन निघाला ,
-------------------------------
महादेव पहा ऐटीत छोटा .
-------------------------------
म्हणे पोळा नि सण गोळा ,
--------------------------------
नाही आता आनंदाला तोटा .
----------------------------------
===©ॐनिल पाटील©===

9.

माझा तू नंदी महान तरी,
   धरली मी तुझी वेसण......
   धनी मी तुझा लहान जरी,
   दोघेही शेती करू कसून....
      
       सौ.किरण पिंपळशेंडे.
              नागपूर

10.
........ .... भविष्य .........
सण वर्षाचा हा आज पोळा माझा
धनी धाकले सजवायाला नेती!
परंपरा सेवेची चालेल नक्की
जाणते बालक कष्टाची महती !
      ..... प्रल्हाद दुधाळ.

11.
....स्पर्धे साठी...

धनी माझा तालेवार,
जरी बाल सुकुमार,
देईन तुला साथ अशी,
चल फुलवू शिवार...

सौ.उज्वला उमेश शिंदे. पुणे.

12.
श्रावणाची अमावस्या
बैलपोळा मात्रृदिन
कष्टती घर जगण्या
दोर धन्याच्या स्वाधीन

स्मिता साळवी

13.
भावी पिढीचा हा बळीराजा

घेऊन शेताकड नंदी सरजा

घामान फिटल सावकारी कर्जा

जगाचा पोशिंदा लई मोठा दर्जा ...

बालाजी प्रकाश लिंबापुरे
लातुरकर
पुणे ,स्वारगेट
२/९/२०१६

14.
~ स्पर्धेसाठी ~

खांदा तुझा डौलदार
उचली जगाचा तू भार,
तुझ्याच मदतीने बळी
फुलवी आपुला शिवारं....

~~दिगंबर~~
2 सप्टेंबर 2016

15.
हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात
चालतोय ऐटीत पुढे चिमुकला
रूबाबदार नंदीची दोर हातात
वाटे बैलासोबत बळीही सजला...

सौ.वनिता शिंदे- किर्दकुडे

16.
नंदीबैलाची दोरी ,
बालगोपाळाच्या हाती.
आत्मविश्वास मनात ,
त्यास कसली भिती.

         - नवनाथ सोनवलकर

17.
कासरा घेऊन , निर्भिड हाती
चल रं सर्जा , जाऊया रानी ......
वाट चालतो , मनी विश्वास
पिकवू शिवार ,  राहू आनंदानी .....
             अश्लेषा मोदी .

18.
निष्ठेत मालकाच्या..... बालका पाठी चालणे....रोखावयास नंदी.......कासरा मायेचा वळणे.........  नितीन वानखडे खामगाव

19.
नयनी वसे आठवांचा गाव
हिरवा निसर्ग सूंदर छान
घेवूनी हाती कासरा-वेसण
बाजूला ठेवूया दुचाकी वाहन
…………………………वैशाली रा.रसाळ

20.
*चित्रशलाका स्पर्धेसाठी*

तुझ्या माझ्या कष्टातून
जगा जगवते माती
चल गड्या पुढे पुढे
नाक दिले तुझ्या हाती...

*रावसाहेब जाधव(चांदवड)

21.
फास घेवून बाप तो गेला
दोर लेकरा देवूनी गेला
घोर जीवास लावूनी गेला
काय भोगणे मम जिवाला।

सौ.मनिषा वाणी.
सुरत.

22.
बापाने घेतला फास
बांधली त्याचीच कास
तूच उद्याची अास
दोघे लढू संकटास
- राखी येवले
पुणे

23.
शेतीत पिकलं सोनं
बघा छोटे सरकार ।
फेडु आता कर्ज
शिक्षणालाही हातभार ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर ( धुळे )

24.
काळाच्या ओघात विरला तो नंदी
चल भोलेनाथा वाचवूया संस्कृती
नावालाही नाही आता तु स्वछंदि
दुनियाही तिच्याच विश्वात रमती

    - प्रमोद येवले.
पुणे.

25.
दोर माझ्या मुठीत
शक्ती माझ्या अंकित
मी कुणब्याचा पोर
रस्ता सांगे भाकित
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे ४११०४४

26.
हिरवे सौंदर्य खेड्यातील, रस्ता मुंबईचा भासतो
नव्या-जुन्या चा मिलाप, किती सुरेख हा दिसतो
आडदांड बैल, बघा कसा ऐटीत लहानगा नेतो
वहान घेऊन बाजूला, मान आम्ही वृषभाला देतो.

अजित करंबेळकर
डोंबिवली.

27.
मुके प्राणी सर्व हिंस्त्र नसती,
माणसा तुझा रे, अडाणी समाज हा..!
मायेने तेही वागतात आपल्याशी,
एकदा ती माया त्यांना देऊन तर पहा..!!
Santosh Shelke

28.
इथे नांदे कैलासाचा पती
त्यांचे वाहन नंदी होती,
सर्व सोपवली सृष्टी
बाल गणेशाच्या हाती.!!

,.......... अर्चना माने /पुणे

29.
तुझ्या माझ्या कष्ठाला रे
जगी राहिले न मोल
पीक पोसले रक्तावर
भाव त्याचा कवडी मोल
 
   ---गणेश शिंदे (राधेय)

30.
चल माझ्या राजारं सरज्या
तुला देतो आज मानाचा दर्जा
वर्षभर राबतो तू भुतलावर
म्हणुन पोट भरते रेे प्रजा.

  व्हि एम पाटील

31.
वशिंड कसे ऐटदार,
नाव असे सर्ज्या।।
चालला कसा डौलत,
बघा बाल बळीराजा।।

अनिल लांडगे उंडणगांव
968 967 5050

32.
स्पर्धेसाठी

कास उद्याची ओढत
कासरा घेतला हातात
आत्मविश्वास मनात
पिकवू फुलवू शिवार जोमात

शरद कवठेकर

33.
स्वाभिमाने मिरवी कष्टणाऱ्या सुदृढ वृषभाला,
बहरल्या धरती वर मोद वाटे या सानुल्याला।
होईल जरी तो धनी उद्या अद्यावत वाहनांचा,
विसरेल ना कधी, या चतुष्पाद मुक जीवाला।।
                                             - सुधीर बेंद्रे.

34.
स्पर्धेसाठी.

राबतो ढवळ्या माझा रानी
चल रं आज तुला थोडं फिरवीतो,
तुझ्या कष्टानं पिके बहरली
तुझा रुवाब गावभर दाखवितो.!!

............ मेघ.

०४.०९.१६.

35.
धाकलं धनी औंदा आपण.;
काबाडकष्ट करु. पण ;
मोठ्या  धन्याला ;
ईख खाण्यापासून आवरू.

श्री.धनाजी बुटेरे
पोई कल्याण ठाणे

36.
बाप राबतो शेतात
आई राबते गोठ्यात
त्यांच्या कष्टाला आपली साथ
शिवार फुलेल आपले जोरात

सौ. शुभांगी धारमळकर पुणे,

37.
हाती घेउन दोर, चाले कुणब्याच पोर
पाहे शिवाराची वाट,होता नवी पहाट
बाप त्याचा कष्ट्तो,  काळ्या मातीत
कर्जापायी राजा, गळा दावतो चऱ्हाट

     --्---्-- अतुल --्---्--

38.
चिमुकला बाळगोपाळ चाले ऐटीत ..
इवल्या हातात त्याच्या कासरा-वेसन....
बोले सर्जाला राबू शिवारातं...
तूच माझे अनमोलं वाहनं...

                     राजश्री पाटील...

39.
चित्रशलाका स्पर्धा भाग - ०६
१ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०१६

सर्जा सवे मी चालतो अनवाणी
नको ती दुचाकी अन् नको तो आसरा
पर्यावरण रक्षणाचा मंत्र देऊ जगताला
माझ्याच हातात प्रगतीचा कासरा

रचनाकार : गुरूदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०५/०९/२०१६

40.
आयुष्यभर शेतमाऊलीची,
राब राबुन नंदी करतो सेवा,
असा हा माह्या बापाचा आधार,
त्यासी सदा सुखी ठेव देवा........

श्रीकांत धोटे

41.
चित्रशलाका स्पर्धा भाग -०६

बापाला मदत म्हणून
कासरा घेतला मी हाती
राहुदे आशीष बळीराजा
आम्हा बाप लेका वरती

किशोर झोटे,
औरंगाबाद.

42.
चित्रशलाका स्पर्धा क्र. 6 साठी:-
आज सुट्टी आहे शाळेला, पोळ्याच्या सणाला,
चाल रे सरजा जोमानं, गड्या! गाडी पेक्षा वेगानं,
आंघोळ करून नदीवर, बिगीबिगी जाऊ घराला
घालून नवैद पूरण पोळीचा खाऊ घालीन प्रेमानं.
मिलिंद......

43.
चित्रशलाका स्पर्धा भाग - 06 .....

बाळमूठी कसा कासरा शोभे
सोबतीला राजबिंडा सर्जा असे ...!!
इवल्या इवल्या पावलात पहा
उद्याचा धनिक शेतकरी वसे ...!! .... अंजली अंजली .....

44.
चिञशलाका स्पर्धेसाठी चारोळी

पोळ्याच्या सनाला असते
बळीराजाची लगबग न्यारी ।
छोट्या भूमीपुञासोबत निघाली 
डौलात 'वृषभराजाची' स्वारी ।।

✍🏻✍©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख. (अनु)
            रा- गोपालखेड , ता. जि. अकोला.
                    mo-9689634332

45.
*चित्रशलाका*
"चालतो कसा थाटात सर्जा
धाकल्या धन्याच्या पाठी,
धावती पावले पुढे
बळीराजाच्या भविष्यासाठी"
-संगीता देशमुख,वसमत

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...