बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

माझी गजल ०५

माझी गजल ०५

दुःख

काळजाशी खेळतांना
वेदनेने पोळतांना ...
ही अशी खंबीर झाले
भावनेला जाळतांना ...

या जगाशी भांडतांना
आळ खोटे टाळतांना
मी अशी गंभीर आहे
वाद मोठे गाळतांना

त्या सुखाला शोधतांना
गंध पुष्पे माळतांना
मी अशी तैयार झाले
सोनपंखी भाळतांना

अंत आला मांडतांना
या जिवाला घोळतांना
द्वाड बोली कांडतांना
लाल झाली साळतांना

याद आली चालतांना
गूढ पाने चाळतांना
धाप लागे धावतांना
दुःख सारे  पाळतांना

प्रा. सौ.भालसिंग संगिता

माझी गजल ०४

माझी गजल ०४

धूर

आज प्रेमातूर तू
दूर मीही दूर तू

आसवांचा वाहतो
तुंबलेला पूर तू

आळवूनी थांबतो
कंठभेदी सूर तू

अंगअंगी जाळतो
चांदण्यांचा नूर तू

बोलणे ही टाळतो
कोंडलेला धूर तू

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

माझी गजल ०३

माझी गजल ०३

हाव

प्रेमवेडे गाव तू
लावण्याचा भाव तू

काळजाशी बांधलेल्या
चांदण्यांचा गाव तू

कातळाला फोडलेला
बेलगामी घाव तू

वेदनेने सांधलेल्या
राजगृही साव तू

अंतरंगी कोरलेल्या
जीवनाचे नाव तू

रातराणी वेढलेल्या
बंगल्याचा ठाव तू

कुंपणाशी गुंतलेल्या
कागदाचा ताव तू

या नभाच्या सांडलेल्या
पावसाची हाव तू

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

माझी गजल ०२

माझी गजल ०२

खास

मी नि तूही पास होतो
सांजवेळी भास होतो

गूढभेटी गीतओठी
आठवूनी त्रास होतो

धुंदलेल्या त्या मिठीने
प्रेम घ्याया दास होतो

मी अत्तराच्या कुपीने
प्रेम दयाया रास होतो

आज नाही काल होतो
मीच माझा खास होतो

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

माझी गजल ०१

माझी गजल ०१

ठार

केवढा प्रहार झाला
वेदनांचा भार झाला

आळवूनी थांबले मी
कंठ आता गार झाला

गोड होत्या भावना त्या
प्रेम तंतू हार झाला

भाव नाही ठाव नाही
आवडीने यार झाला

पालखीचा भारवाही
आगडोंबी ठार झाला

सौ .संगिता भालसिंग
अहमदनगर

शिक्षका, तू वेडा कुंभार

आज दि.११/१०/१६ रोजी
एकमत वर्तमानपत्रात साक्षी
पुरवणी मधे माझी कविता
प्रकाशित....
"शिक्षका ,तू वेडा कुंभार "

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

जय माता दी

प्रथम क्रमांक प्राप्त रचना

🙏� जय माता दी🙏�

💐💐💐💐💐💐💐
०१
आई महालक्ष्मी
साडेतीन पीठं
मंदिर है मोठं
कोल्हापुरा ...
०२
गरुड मंडपी
दगडाची मूर्ती
तिन्ही लोक किर्ती
दुमदुमे ...
०३
चार मंदिराचा
मांडला पसारा
पूर्वेचा गाभारा
सजलेला ...
०४
सभामंडप तो
लाकडी खांबाचा
मराठा शैलीचा
डौलदार ...
०५
दर्शनाला रांगा
शेकडो भाविक
पुजारी अनेक
गाभाऱ्यात ...
०६
फुलांनी सजते
पालखी देवीची
पूजा प्रतिमेची
शुक्रवारी ...
०७
घाटी दरवाजा
उत्तर बाजूला
कानी निनादला
घंटा नाद ...
०८
तांब्या पितळेची
फुंकली घागर
अंगात संचार
लक्ष्मी रूप ...
०९
आनंदे मागता
जोगवा देवीचा
क्षण आनंदाचा
भक्तांचा तो ...
१०
सांजवेळ होता
नवल घडते
चरणी पडते
सूर्यतेज ....
११
देवी दुर्गादेवी
अवतार किती
मात्र एक पती
शिवशंभु ...
१२
घटाची स्थापना
पूजा देवी नऊ
आरतीला गाऊ
नवदुर्गा ...
१३
पाहिला दिवस
शैलपुत्री पुजा
बाप असे राजा
हिमालय ...
१४
दूसरा दिवस
ब्रह्म चारिणीचा
कठीण तपाचा
अपर्णेचा...
१५
तिसरा दिवस
नाम चंद्रघंटा
आकार ललाटा
चंद्रकोर ...
१६
चवथा दिवस
कुष्मांडा देवीचा
ब्रम्हांड हास्याचा
अष्टभुजा ...
१७
पाचवा दिवस
स्कंदमाता देवी
मोक्ष मार्ग दावी
ज्ञान दात्री ...
१८
सहावा दिवस
नाम कात्यायनी
सफल दायिनी
भगवती ...
१९
सातवा दिवस
कालरात्रिकेचा
सहस्त्र चक्राचा
साक्षात्कार ....
२०
आठवा दिवस
नाम महागौरी
गौर वर्ण धारी
अष्ट वर्ष ...
२१
नववा दिवस
नाम सिद्धिदात्री
अष्टसिद्धि धात्री
अर्ध नारी ....
२२
पूजन घटाचे
आनंदे करावे
चरणी भजावे
नवदुर्गा ...

***************

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...