गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

माझी गझल ३८

माझी गझल ३८

वॄत्त मंजुघोषा

पैठणी

रेशमाच्या पैठणीचा साज भारी
पैंजणाचा वेगळा अंदाज भारी

यौवनाचा भार भारी गौर देही
गोड गाली त्या खळीची लाज भारी

सांजवेळी त्या गुलाबी भावनेने
साजनाला भेटण्याचे राज भारी

ते शहारे लपवितांना काळजाचे
त्या सखीला सांगते ती काज भारी

भावनांना खोलतांना सार झाले
या सुगंधी जीवनाचे आज भारी

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
24/11/16
Copyright
spsfun.com

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

माझी गझल ३६

माझी गझल ३६

अनलज्वाला : २४ मात्रा [८+८+८]

🌹सत्य 🌹

सोसाटयाचा वारा आला दडले नाही
तग धरून मी उभी राहिले पडले नाही

खोटे आसू मोकळा हात नको फुकाचा
स्वाभिमान हा मनाचा कधी रडले नाही

मोह क्षणांनी घातली साद कितीही वेळ
नैतिक अक्षय विचार कधी सडले नाही

घेतले वैर दुर्जनांचे तरी काहीच
रोज जीवनी माझे कधीच अडले नाही

मानव मरतो विचार नाही लक्षात ठेवा
सत्यात असत्य असे कधी घडले नाही

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
19/11/16

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

माझी गझल ३५-प्रथम क्रमांक प्राप्त

प्रथम क्रमांक प्राप्त रचना

वॄत्त -  मंजुघोषा
लगावली
गालगागा गालगागा गालगागा

माझी गझल

🌹 कूळ माझे 🌹

अर्थवाही शब्द माझे कूळ आहे
काव्य माझे मांडण्या व्याकूळ आहे ...

काळजाशी कोरलेल्या अक्षरांना
प्रेरणेची लागलेली धूळ आहे ...

भोगलेल्या वेदनेला गुंफण्याचे
वर्तमाना लागलेले खूळ आहे ...

वारकर्त्या लेखणीचे भोवताली
बांधलेले केवढे वारूळ आहे ...

प्रेमरंगी भावनेने साहित्याशी
आत्मरंगा शोषणारे मूळ आहे ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
दि.१६/११/१६

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

माझी गझल ३३

माझी गझल ३३

रुसवा

मोहमय रूप सख्याचे मनी वसले आहे
असे आंधळे प्रेम करूनी फसले आहे

नकोस टाकू गळ्यात वेढा या हातांचा
गेला भूतकाळ आज निवांत बसले आहे

तोडले बंध एकदा आता नकोस जोडू
नाते जहरी तनमनालाच डसले आहे

लाडी गोडी आता पुन्हा नकोस लावू
हृदयावरचे कोवळे घाव पचले आहे

खोटी फुंकर घालून असा आव आणतो
गोड मुखावर बेगडी भाव कसले आहे

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com

माझी गझल ३२

माझी गझल ३२

नाते

तुझे नि माझे नाते आता जडले आहे
मनात काही तारे आता दडले आहे

आहेस कुठे आहेस कसा माहित नाही
कळूनही मी अशी प्रेमात पडले आहे

अलवार भेट घेण्यासाठी हळवे तनमन
ओल्या उशीत लपून राती रडले आहे

एकांतवेळी जपून आता मोजते क्षणा
श्वास घेणेच बाकी आता अडले आहे

चंद्रतारे असेतो जीव अर्पण करते
तुझ्याचसाठी जीवन माझे घडले आहे

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com

माझी गझल ३४

माझी गझल ३४

पोरगी

आईच म्हणे पोरगी फार लहान आहे
पण शिक्षणाची तिला लागली तहान आहे

बिकट वाट ही वहिवाट चाल तू धीराने
पायात तुझ्या संस्काराची वहान आहे

नको बाळगू भिती कशाची ध्यानात ठेव
उंच भरारी घेण्या सारे जहान आहे

घराघरातच बंधन झुल्यात झुलते नारी
ईश्वररुपी हा तिचा जन्म महान आहे

मान सन्मान हिरावलेली नारी शक्ती
संसारी हा ईवला जीव गहान आहे

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com

💐💐💐💐💐💐💐

प्रकाशित लेख-सौंदर्य

आज मंगळवार दि.१५/११/१६
एकमत वर्तमान पत्रातील साक्षी
पुरवणी मधे माझा लेख प्रकाशित

🌹 सौंदर्य 🌹

सौ.संगिता भालसिंग

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...