गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

वाद

बोलिल्या सारिखे
उत्तरे येतात ...
मी-मी, तू-तू,वाद-विवाद
सत्तर होतात ...

Sangita Bhalsing

दव

थेंब दवाचे चमचम करती
हिरव्या पानावरती ...
कुणी घातले सुंदर मोती
कमळाच्या कानावरती  ...

Sangita Bhalsing

पैंजण

माझ्या घराकड़े
तुझी पावले वळू दे ...
तुझा होकार नकार
पैंजणाने कळू दे ...

Sangita Bhalsing

मूर्ती

एक सुंदर मूर्ती
मनात कैद केली..
प्रेमाचा शिक्का मारून
मालकी वैध केली ...

Sangita Bhalsing

चांदवा

आकाशीचा चांदवा
कसा एकटा झुरतो ..
कलेकलेने कमी होऊन
शेवटी अर्धाच उरतो ...

Sangita Bhalsing

बुधवार, २६ जुलै, २०१७

प्रकाशित कविता"घोट सुखाचे"

💐सुप्रभात💐

मंगळवार दि.25जुलै2017 रोजी एकमत वर्तमान पत्रात प्रकाशित झालेली माझी कविता"घोट सुखाचे"

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

मंगळवार, १८ जुलै, २०१७

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...