गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

डौल

डौलदार बांधा तुझा
हरिणीची धुंद चाल ..
काळजाच्या ठोक्याला
पैंजणाचा मंद ताल ..

Sangita Bhalsing

लाजरी नजर

लाजऱ्या नजरेमधे
तलम पडदा राहू दे ..
सुंदर मुखचंद्रमा
पदरा आडून पाहू दे ..

Sangita Bhalsing

रुसवा

तुलाच आहे का
रुसण्याचा हक्क ..
मलाही रुसता येते
हे लक्षात ठेव पक्क ..

Sangita Bhalsing
spsfun.com

भार

भूतकाळाचे ओझे
वर्तमानावर भार झाले .
भग्न दगडी मूर्तीला
सुकलेले हार झाले ..

Sangita Bhalsing

वाद

बोलिल्या सारिखे
उत्तरे येतात ...
मी-मी, तू-तू,वाद-विवाद
सत्तर होतात ...

Sangita Bhalsing

दव

थेंब दवाचे चमचम करती
हिरव्या पानावरती ...
कुणी घातले सुंदर मोती
कमळाच्या कानावरती  ...

Sangita Bhalsing

पैंजण

माझ्या घराकड़े
तुझी पावले वळू दे ...
तुझा होकार नकार
पैंजणाने कळू दे ...

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...