गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

स्वप्न

गोड स्वप्न उद्याचे
डोळ्यात सजले ..
पंख पापणीचे
हळूवार लाजले ..

Sangita Bhalsing

मिठी

तुझ्या आठवांची
हलकीशी चाहूल ...
घाल मिठी हातांची
नको मागे पाऊल ...

Sangita Bhalsing

माया

क्षितिजाला टेकू दे
आभाळाची छाया ..
भरतीला येऊ दे
प्रेमभरून माया ..

Sangita Bhalsing

डौल

डौलदार बांधा तुझा
हरिणीची धुंद चाल ..
काळजाच्या ठोक्याला
पैंजणाचा मंद ताल ..

Sangita Bhalsing

लाजरी नजर

लाजऱ्या नजरेमधे
तलम पडदा राहू दे ..
सुंदर मुखचंद्रमा
पदरा आडून पाहू दे ..

Sangita Bhalsing

रुसवा

तुलाच आहे का
रुसण्याचा हक्क ..
मलाही रुसता येते
हे लक्षात ठेव पक्क ..

Sangita Bhalsing
spsfun.com

भार

भूतकाळाचे ओझे
वर्तमानावर भार झाले .
भग्न दगडी मूर्तीला
सुकलेले हार झाले ..

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...