गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

पैसा

आभाळ

हल्ली खुप खुप
एकट वाटतं ..
अलवार मनात
काहुर पेटतं ...

डोळ्यात आभाळ
येऊन साठतं ..
उंच टोकदार
खिंडीत गाठतं ...

Sangita Bhalsing

मन

आभाळ भरून
आले की ,
मन नाचू लागते ...
डोळे भरून
आले की ,
मन वाचू लागते ...

Sangita Bhalsing

सावली

सावलीशी बोलत होते
मनाचे गुपित खोलत होते ..
भावना भरलेले आभाळ
काळजात तोलत होते ..

Sangita Bhalsing

स्वप्न

गोड स्वप्न उद्याचे
डोळ्यात सजले ..
पंख पापणीचे
हळूवार लाजले ..

Sangita Bhalsing

मिठी

तुझ्या आठवांची
हलकीशी चाहूल ...
घाल मिठी हातांची
नको मागे पाऊल ...

Sangita Bhalsing

माया

क्षितिजाला टेकू दे
आभाळाची छाया ..
भरतीला येऊ दे
प्रेमभरून माया ..

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...