शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

इमला

जीवन एक संघर्ष , पण

जगणं एक कला आहे ...

आचार विचार पायावर ,

उभा समाधान इमला आहे ...

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
दि.२२/०९/१६

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

खळी

मनाला पड़ते भूल
तुझं हसणं पाहून ..
गालावरच्या खळीत
घ्यावे वाटे पोहून ..

Sangita Bhalsing
spsfun.com

अंतरंग

अंतरंग तुझे
सहज कळते ..
अंतरंग माझे
उगीच जळते ..

Sangita Bhalsing
spsfun.com

कुरळे केस

कुरळे केस उडतात
भूरभूर वाऱ्यावर ..
कोवळे काळीज सखे
राहीना थाऱ्यावर ...

Sangita Bhalsing
spsfun.com

हट्ट

लाडिक तुझा हट्ट
किती वेळा मिटवू ...
खूप खूप प्रेम आहे
हे कितीवेळा पटवू ...

Sangita Bhalsing
spsfun.com

अंबर

आनंदाने ओलांड सखे
माझ्या घराचा उंबरा ...
काळजाच्या पायघडया
जाऊ सुखाच्या अंबरा ..

Sangita Bhalsing
spsfun.com

हट्ट

लाडिक तुझा हट्ट
किती वेळा मिटवू ...
खूप खूप प्रेम आहे
हे कितीवेळा घटवू ...

Sangita Bhalsing
spsfun.com

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...