शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

सुख

सुकुमार भासे
सावळ्याचे मुख...

चारी धाम सुख
पंढरीत ...

सौ.भालसिंग संगिता

अंतर

सहज मिटविता येते
देहातील अंतर
नाही मिटविता येत
मनातील अंतर ...

Sangita B Bhalsing

मात

मऊ केसावर फिरे
सावळ्याचा हात ...
कोवळ्या मनाच्या
करी वेदनेवर मात ...

Sangita B Bhalsing

शब्दफुले

उगाच घेऊ नकोस
ओढून स्वतःवर ..
लिहिली नाहीत मी
शब्दफुले तुझ्यावर ...

Sangita B Bhalsing

गुरुवार, ८ मार्च, २०१८

महिला दिन

https://youtu.be/gjnh-Qsgs8c


आज 8 मार्च 2018...
जागतिक महिला दिन ....
निमित्त आमच्या कॉलेज मधे
मी माझे मनोगत व्यक्त करताना ...

U ट्यूब वर विडियो like करा, कॉमेंट करा आणि सब्सक्राइब करा..

Sangita B Bhalsing

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

मोगरा

कविता

🌹मोगरा🌹

कधी पानाच्या आड लपतो
अंगणी फुललेला मोगरा ...

कधी दवात न्हातो लाजरा
लपवितो सुगंधी चेहरा ...

अवखळ वाऱ्याने डोलतो
खेळताना दिसतो नाचरा ..

धुंद परिमल पसरतो
चांदणीला दिसतो हसरा ...

उन्हात चमकतो गोजिरा
येतो अंगावरती शहारा ...

घट्ट प्रेमात आतुरलेल्या
रातराणीचा सदा पहारा ...

सौ.संगिता भालसिंग

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

डंका

मी तुझा,तू माझी सखी
यात काही शंका नको ..
दुश्मन असते जग प्रेमाचे
विनाकारण डंका नको ...

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...