रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

बंद दार

एवढा अहंकार बरा नव्हे
सखी,वळून बघ जराशी..

आठवांचे क्षण रेंगाळत आहेत
तूच बंद केलेल्या तुझ्याच दाराशी...

Sangita Bhalsing

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

जय शिवराय

राजे

आजकाल लोक,फ़क्त म्हणतात
राजे,तुमच्या साठी काय पण ...!!
एक ओठात अणि एक पोटात
विचार कृतीत आणतात का पण ...?

तुम्ही परस्त्रीचा मान सन्मान केला
आज समाज हेच विसरून गेला
तुम्ही दुसऱ्या धर्माचा आदर केला
आज समाज इथेच घसरुन गेला

तुम्ही सुख सोडून दुःखात जगले
आज लोक ताळ तंत्र सोडून वागले
तुम्ही स्वराज्यासाठी प्राण पणाला लावले
आज लोक एकमेकांचे प्राण घ्यायला लागले

राजे,तुमची शिकवण लोक विसरले
नीतिमूल्य ,चारित्र्य सोडून घसरले
तुम्ही होते,स्वराज्य प्रेमाने भारलेले
आज लोक देशभक्तीही विसरले

राजे,पुन्हा या जन्माला
सन्मार्ग दाखवायला ...
तयार आहोत आम्ही
पुन्हा मावळे बनायला ...!!

Sangita Bhalsing

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

वार

किती टोकदार ,सखी
तुझ्या काजळाची धार ...

जेंव्हा पाहतो रोखून
होतो काळजावर वार...

Sangita bhalsing

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

देशभक्ती

रंग रूप वेष भाषा
चाहे अनेक हो...
देशभक्ती का जजबा
दिल मे एक हो ...

Sangita Bhalsing

हिंदुस्थान

जिंकून घ्यावा पाकिस्तान
मिटवून नामोनिशाण...
पाळेमुळे उखडून काढून
पुन्हा बनावावा हिंदुस्थान..

Sangita Bhalsing

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

वड

कातरवेळ झाली की
आठवांचा कढ येतो...
पाळेमुळे खोलवर
रुतलेला वड होतो...

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...