गुरुवार, २१ मार्च, २०१९

होळी

कोरड्या रंगांची
गालावर लाली ...
धावतसे राधा
धुळवड आली..

पापणीशी खेळे
लाल रंग कण...
बावरले डोळे
उधळी प्रेम धन...

ओठ ही रंगले
रंगले गाल ही..
ओलेते वस्त्र ही
मंदली चाल ही...

सोडविते हात
बांगडी काचली..
कान्हाच्या प्रेमात
राधा ही नाचली..

लाजतसे राधा
सावळ्याची खोडी...
भक्ती प्रेम रंगी
गोरी राधा वेडी...

Sangita Bhalsing
21 मार्च 2019

बुधवार, २० मार्च, २०१९

किनारे

दोन दिशेला दोन किनारे
काळीज चिरून गेले वारे...
गढूळ पाण्यात हरवलेले
अमृताचे गोड क्षण सारे ...

Sangita Bhalsing

मंगळवार, १९ मार्च, २०१९

सूर

कंठात दाटला सूर
काळजात काहूर...
नयनी लोटला पूर
जाता निघून तू दूर ...

Sangita Bhalsing

सोमवार, १८ मार्च, २०१९

बळी

बळी जगाला पोसतो
जरी राही अर्धपोटी ..
माय मातीची सेवा
गाणं फुलतं ओठी ...

Sangita Bhalsing

शनिवार, १६ मार्च, २०१९

बळी

बळी जगाला पोसतो
जरी राही अर्धपोटी ..
माय मातीची सेवा
गाणं फुलतं ओठी ...

Sangita Bhalsing

सोमवार, ११ मार्च, २०१९

घबाड

मानवी कृतीतून कळते
जग किती लबाड आहे...
हितसंबंधी नाते जुळते
जवळ किती घबाड आहे...

Sangita Bhalsing

रविवार, १० मार्च, २०१९

जीवन

कळपातल्या मेंढ्या सारखं
आंधळं जीवन नसावं...
प्रत्येक अवघड वळणावर
आपले नाव कोरलेले असावं...

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...