कोरड्या रंगांची
गालावर लाली ...
धावतसे राधा
धुळवड आली..
पापणीशी खेळे
लाल रंग कण...
बावरले डोळे
उधळी प्रेम धन...
ओठ ही रंगले
रंगले गाल ही..
ओलेते वस्त्र ही
मंदली चाल ही...
सोडविते हात
बांगडी काचली..
कान्हाच्या प्रेमात
राधा ही नाचली..
लाजतसे राधा
सावळ्याची खोडी...
भक्ती प्रेम रंगी
गोरी राधा वेडी...
Sangita Bhalsing
21 मार्च 2019