गुरुवार, २८ मार्च, २०१९

ओंजळ

काळजाचे कप्पे
आहेत तरी किती ..
सापडेना स्थान
ओंजळ ही रिती....

Sangita Bhalsing

काळीज

काळजात विभाग
आहेत तरी किती...
एकाची दुसऱ्याला
काही नाही माहिती...

Sangita Bhalsing

यश

यश दडलेय कामात
कपाळावरच्या घामात ...
आळस नको मनात
ठेवा कष्ट ध्यानात ...

Sangita Bhalsing

लेखणी

विचारांच्या जाळ्यात
दाताखाली लेखणी...
शब्दफुले डोळ्यात
काया किती देखणी....

Sangita Bhalsing

चंद्र

एकटा चंद्र पाहिला की
मनाला जरा बरं वाटतं...

एकटेपणातही प्रकाशावे
संमयी तत्व खरं वाटतं...

Sangita Bhalsing

बुधवार, २७ मार्च, २०१९

सखी

सखी

भरजरी पदर तुझा
खांद्यावर ओढून घे...
लांब काळी वेणी
पाठीवर सोडून दे...

मोत्याची नथ
नाकात घालून घे ...
सोन्याची पाटली
हातात घालून घे...

लाल कुंकवाचे बोट
कपाळी लावून घे...
त्याखाली हळदीचे
एक बोट लावून घे...

लाल लाल सिंदूर
भांगात भरून घे...
मोत्याची लांब बिंदी
कपाळी बांधून घे...

लक्ष्मीहार गळ्यात
अलगद घालून घे..
सोन्याचे मंगळसूत्र
जोडीने तोलून घे...

मोगऱ्याचा गजरा
वेणीवर सोडून दे...
अत्तराचे तृषार
अंगावर सांडून घे...

साजशृंगार झाल्यावर
सख्याला बोलवून घे..
हातात हात घालून
सख्याशी बोलून घे...

ओठावर गुलाबी
लाली लावून घे...
डोळ्यात काजळाची
हलकी रेषा ओढून घे...

सांजवेळी सख्याशी
दोन शब्द बोलून घे
संसाराचा कष्ट रथ
आनंदाने ओढून ने...

Sangita Bhalsing
27 मार्च 2019

गुरुवार, २१ मार्च, २०१९

होळी

कोरड्या रंगांची
गालावर लाली ...
धावतसे राधा
धुळवड आली..

पापणीशी खेळे
लाल रंग कण...
बावरले डोळे
उधळी प्रेम धन...

ओठ ही रंगले
रंगले गाल ही..
ओलेते वस्त्र ही
मंदली चाल ही...

सोडविते हात
बांगडी काचली..
कान्हाच्या प्रेमात
राधा ही नाचली..

लाजतसे राधा
सावळ्याची खोडी...
भक्ती प्रेम रंगी
गोरी राधा वेडी...

Sangita Bhalsing
21 मार्च 2019

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...