गुरुवार, ११ जुलै, २०१९

मोगरा

मोगरा

अबोल झाले अधर
सांगतो लबाड मोगरा ...
सुगंध करितो नजर
सांगतो हसरा चेहरा ...

गंधित होऊन डोलतो
अमरप्रेम कुपी खोलतो...
क्षणभंगुर जीवनात
नश्वर निर्माल्यही झेलतो ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
दि.११ जूलाई २०१६

विठ्ठल

सावळया विठ्ठला
येऊ दे रे सर
डोळा येई पूर
बळीराजा . ...

Sangita Bhalsing

बुधवार, १० जुलै, २०१९

भोग

काळजी आणि चिंता
मनाचे मोठे रोग आहेत...
कितीही सावरले तरी
हे अटळ भोग आहेत...

@.प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

आई बाप

आई बाप उपाशी
मुले मात्र तुपाशी...
जगतात बिचारे
सल घेऊन उराशी...

@.प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

तेरा साथ है तो...


किनारा

किनारा
तू माझा किनारा
मी तुझी लाट...

धावते तुझ्याकडे
शोधीत वाट...

सौ.संगिता भालसिंग

मनवेल

मनवेल

काय सांगू विठू
मनाची घालमेल...
वारीच्या वाटेवर
पसरला मनवेल...

@प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...