सोमवार, २२ जुलै, २०१९

ओटी

ओटी

कधी दुष्ट दूषणांनी
भरून घ्यावी ओटी ...

समजून घ्यावी त्यांची
विचारसरणी थोटी...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

रविवार, २१ जुलै, २०१९

क्षण

क्षण

आठवांचे मधुर क्षण
काठोकाठ भरलेले...
कुणाला सांगायचे नाही
हे मात्र आपले ठरलेले...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

नव्हाळी

नव्हाळी

मुखावरून दूर कर
केसांची काळी जाळी...
उमलत्या सौंदर्याची
जरा पाहू दे नव्हाळी...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

प्रेमवाट



पायंडा मोडून आली
शृंखला तोडून आली...

संकेत खोडून आली
प्रेमवाट जोडून आली...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

प्रेमामृत

प्रेमामृत

सामावले तुझ्यात
अस्तित्व न उरले...
हृदयात प्रेमामृत
काठोकाठ भरले...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

झालर



प्रेमाच्या नात्याला एक
रंगीबेरंगी झालर असते....
कधी ती ठळकपणे दिसते
तर, कधी लपूनही बसते...

प्रेमाच्या नात्यात एक
हवाहवासा गुंताही असतो
बोलता न येणारा एक
अपरिचित प्रांतही असतो ...

प्रा. सौ.संगिता भालसिंग
Sangita Bhalsing
अहमदनगर

बहर

जेवढी पसरत जाते ओल
तेवढी हिरवी होते मन वेल...
जेवढा सुगंधी फुलांचा बहर
तेवढा श्वासात कोवळा कहर...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...