बुधवार, २१ जानेवारी, २०२६

बोरन्हाण

 बोरन्हाण

संक्रांती नंतर रथ सप्तमीपर्यंत लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते.

संक्रांतीनंतर रथ सप्तमीपर्यंत केले जाणारे लहान मुलांचे बोर न्हाण – पारंपरिक वेशात मुलं, फुले, बोर व तांदळाने सजलेला मराठी संस्कार


महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीत संक्रांतीनंतर रथ सप्तमीपर्यंत लहान मुलांचे बोर न्हाण करण्याची एक सुंदर, हळवी, भावपूर्ण आणि अर्थपूर्ण परंपरा आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात देखील आजही ही प्रथा श्रद्धेने पाळली जाते. किंबहुना , एक सण उत्सव म्हणून साजरा केला जातो.बदलत्या काळात स्वरूप थोडे बदलले असले, तरी या विधीमागील भावनिक, आरोग्यदायी आणि सांस्कृतिक मूल्य आजही तितकेच महत्त्वाचे आहे.

🌾 बोर न्हाण म्हणजे काय?

संक्रांतीनंतर नवीन पिकाचे धान्य, तिळगूळ, बोर, ऊस , विविध प्रकारच्या भाज्या वगैरे उपलब्ध होतात.या नव्या अन्नधान्याच्या साक्षीने लहान मुलांना तेल लावून, उबदार पाण्याने अंघोळ घालण्याचा जो विधी केला जातो. तसेच संध्याकाळी बाळाला  औक्षण केले जाते. तिळगुळ, बोर, मुरमुरे, बिस्किटे, चॉकलेट वगैरे खाऊ आठव्यात भरून बाळाच्या डोक्यावर सर्व सुवासिनी मिळून टाकतात.त्याला बोर न्हाण असे म्हणतात.

ही अंघोळ केवळ शारीरिक स्वच्छतेपुरती मर्यादित नसून, ती संस्कार, संरक्षण आणि आरोग्य यांचे प्रतीक आहे.


☀️ कधी करावे?


मकर संक्रांतीनंतर रथ सप्तमीपर्यंत कधीही.

(सूर्योपासनेचा महत्त्वाचा दिवस)


या काळात सूर्य उत्तरायणात असतो. सूर्याची ऊब वाढू लागते, थंडी हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे लहान मुलांसाठी हा काळ आरोग्यदृष्ट्या योग्य मानला जातो.


🛁 कसे करावे बोर न्हाण?


पारंपरिक पद्धत:

सकाळी लवकर उठून लहान मुलाला तीळ किंवा खोबरेल तेलाने हलका मालीश,उबदार पाण्याने अंघोळ,अंघोळीनंतर साफ, उबदार कपडे,ओवाळून शुभेच्छा देणे

काही ठिकाणी:

बोर, ऊस, तिळगूळ हातात देणे, डोक्यावर टाकणं.

"लहान बाळ मोठं होवो" अशा शुभेच्छा.

श्रीकृष्णाची गाणी ही गातात.


🧴 यामागील आरोग्यदायी महत्व


तेलामुळे त्वचा मऊ व सुदृढ राहते

थंडीमुळे होणारे सर्दी, खोकला, कोरडी त्वचा यांपासून संरक्षण

मालिशमुळे रक्ताभिसरण सुधारते

अंघोळीनंतर मुलं शांत, प्रसन्न राहतात


🙏 धार्मिक व सांस्कृतिक महत्व.


सूर्यदेवाची उपासना हा या काळाचा मुख्य आधार आहे.

रथ सप्तमीला सूर्याच्या रथाची पूजा केली जाते

नव्या पिकाचा पहिला स्वीकार लहान बाळाकडून करवून घेणे म्हणजे समृद्धीचे स्वागत.

ही परंपरा निसर्गाशी नाते जोडणारी आहे.


🌱 जुन्या–नव्याचा संगम


आजच्या काळात मोठे धार्मिक विधी शक्य नसले तरी

घरच्या घरी, साध्या पद्धतीने स्वच्छता, प्रेम आणि जपणूक केंद्रस्थानी ठेवून बोर न्हाण करता येते.

परंपरेचा गाभा जपून, आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत अशी ही प्रथा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हेच खरे संस्कार आहेत.


✨ निष्कर्ष


बोर न्हाण ही केवळ अंघोळ नसून, ती आई‑वडिलांचे प्रेम, आजी‑आजोबांचे आशीर्वाद आणि संस्कृतीची शिदोरी आहे. लहान बाळाच्या आयुष्यातील ही पहिली सणासुदीची ओळख, त्याला आपल्या मुळांशी जोडणारी ठरते.


परंपरा जपूया, अर्थ समजून जपूया, आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवूया. 🌼


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra

अगं अगं सूनबाई , काय म्हणता सासूबाई – कौटुंबिक मराठी चित्रपटावर एक नजर...

 अगं अगं सूनबाई , काय म्हणता सासूबाई – मराठी कौटुंबिक चित्रपटावर एक नजर...


मराठी सिनेमा नेहमीच आपल्या घरातील नाती, भावना आणि वास्तव साध्या पण प्रभावी पद्धतीने मांडत आला आहे. हा चित्रपट त्याच परंपरेतला..... एक हसत-खेळत पण विचार करायला लावणारा कौटुंबिक सिनेमा आहे.

अगं अगं सूनबाई , काय म्हणता सासूबाई – मराठी कौटुंबिक चित्रपटावर एक नजर...


कथाविषय - " हसू आणि आसू "

या चित्रपटाची कथा सासू–सून या अतिशय जिव्हाळ्याच्या आणि संवेदनशील नात्याभोवती फिरते. रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टी, गैरसमज, अपेक्षा, टोमणे आणि त्यामागचं दडलेलं प्रेम या कथेतून उलगडत जातं. त्यामुळे कथा कृत्रिम न वाटता अगदी घरातीलच वाटते.

पूर्वार्ध सुखाचा आणि उत्तरार्ध दुःखाचा ! अशी चित्रपटाची मांडणी आहे.मात्र संकटात, दुःखात आपलीच माणसे आपली असतात. दुःखाच्या प्रसंगी आपल्या माणसाची ओळख होते. कौटुंबिक प्रेमाची बांधणी करणारा अतिशय संवेदनशील, उत्तम चित्रपट आहे.


सासू–सून नात्याचं वास्तव चित्रण.

चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सासू–सून नातं केवळ संघर्षाच्या चौकटीत न अडकवता त्यामधील भावनिक गुंतागुंत दाखवणं.

सासूबाई कधी कडक, कधी हुकमी तर कधी मनाने हळव्या दिसतात.

सूनसुद्धा केवळ सहन करणारी नसून, स्वतःचं मत ठामपणे मांडणारी, बदल स्वीकारणारी आधुनिक स्त्री म्हणून समोर येते.


अभिनय आणि संवाद

कलाकारांनी आपापल्या भूमिका अत्यंत नैसर्गिकपणे साकारल्या आहेत. संवाद घरगुती, ओळखीचे आणि अनेकदा हसू आणणारे आहेत. काही प्रसंगांत हेच संवाद मनाला भिडतात आणि डोळे पाणावतात.


दिग्दर्शन आणि मांडणी

दिग्दर्शकाने विनोद आणि भावना यांचा उत्तम समतोल साधला आहे. कथा कुठेही अतिनाट्यमय किंवा उपदेशात्मक होत नाही. हलक्याफुलक्या प्रसंगांतून गंभीर सामाजिक मुद्दे मांडण्याचं कौशल्य या चित्रपटात दिसून येतं.


सामाजिक संदेश

आजच्या बदलत्या काळात नात्यांमध्ये संवाद, समजून घेणं आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करणं किती गरजेचं आहे, हा संदेश चित्रपट सहजपणे देतो. त्यामुळे हा सिनेमा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विचार करायला लावतो.


निष्कर्ष

हा चित्रपट कुटुंबासोबत बसून पाहण्यासारखा आहे. हसू, भावना आणि वास्तव यांचा सुंदर संगम असलेला हा सिनेमा मराठी प्रेक्षकांना नक्कीच आपलासा वाटतो.

" हसू आणि आसू " दोन्ही डोळ्यात घेऊन थिएटर बाहेर येणारे प्रेक्षक.


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 

क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा सुलभ आणि विस्तृत review —

 ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा सुलभ आणि विस्तृत review — 

क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा सुलभ आणि विस्तृत review —


🎬 सारांश — काय आहे हा चित्रपट?


‘क्रंतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेला मराठी सामाजिक चित्रपट आहे. 

मुख्य विषय — मराठी-माध्यम शाळा आणि आजच्या काळात त्यांचं अस्तित्व टिकवणं. 

दिग्दर्शक: हेमंत ढोमे, निर्मिती: क्षिती जोग; स्टारकास्टमध्ये सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी आणि इतर मोठे कलाकार आहेत. 

चांगला सामाजिक विषय, पात्र-भूमिका बांधणी मजबूत. 

 काहींना भावनिक आणि प्रेरणादायी, तर काहींना संदेश जास्त ठळक वाटू शकतो.

🎯 काय चांगलं आहे?

✔️ सामाजिक संदेश: मराठी-माध्यम शाळांच्या स्थितीवर विचार करण्यास मजबूर करणारा विषय. 

✔️ कलाकारांची कामगिरी: अनुभवी कलाकारांची अभिनय-शैली जिवंत वाटते. 

✔️ भावनिक जोड: मराठी शाळा, भाषा आणि संस्कृतीबद्दलची nostalgia प्रेक्षकांना भावते. 

✔️  कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी तसेच वैचारिक चित्रपट.

मला हा चित्रपट भावनिक आणि प्रेरणादायी वाटतो. तसेच कलाकारांचा अभिनय, संवाद आणि सेटिंग आवडली.

जे लोक मराठी-माध्यम शाळांमध्ये शिकले,त्या लोकांना हा चित्रपट जास्त भावेल. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटातील सुंदर गीत.


 हा एक सामाजिक संदेश देणारा, भावनिक दृष्टिकोनातून पाहण्यास योग्य चित्रपट आहे — विशेषतः मराठी भाषा आणि माध्यमाची जपणूक जाणून घेणाऱ्यांसाठी.

जर तुम्हाला सामाजिक विषय, शाळांच्या स्थितीवर विचार करणारी कथा आणि चांगले अभिनय पहायचे असतील, तर तो पाहायला हवा आहे.

📖 कथासार (Spoiler-Free)

हा चित्रपट एका अडचणीत आलेल्या मराठी-माध्यम शाळेभोवती फिरतो.

इंग्रजी शाळांची वाढ, पालकांची मानसिकता, शिक्षणातील स्पर्धा आणि मराठी भाषेचं दुय्यम होत जाणं — या सगळ्यांच्या संघर्षात शाळा टिकवण्यासाठी काही शिक्षक, विद्यार्थी आणि पालक एकत्र येतात.

हा प्रवास म्हणजे शाळा वाचवण्याचा नाही, तर आत्मसन्मान, भाषा आणि मूल्ये जपण्याचा संघर्ष आहे.


क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम हा चित्रपट मराठी शाळांच्या वास्तवावर प्रकाश टाकतो.

अभिनय संयमी आणि प्रभावी आहे.

कथा साधी असली तरी भावनिक आहे.

चित्रपट भाषेबद्दल प्रेम जागवतो आणि विचार करायला भाग पाडतो.

थोडा संदेशात्मक वाटला तरी आशय प्रामाणिक आहे.

मराठी-माध्यमात शिकलेल्यांना हा चित्रपट विशेष भावेल.

“मनोरंजनापेक्षा विचार देणारा, मराठी शाळांसाठी आवाज उठवणारा चित्रपट.”


विद्यार्थ्यांसाठी Review

क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम हा चित्रपट विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेची, शिक्षकांची आणि मातृभाषेची खरी किंमत समजावतो.

स्पर्धेच्या युगात आत्मविश्वास, मेहनत आणि मूल्ये किती महत्त्वाची आहेत हे तो दाखवतो.

मराठी माध्यम म्हणजे कमी दर्जा नसून योग्य मार्गदर्शन असेल तर यश नक्की मिळते, हा विश्वास चित्रपट देतो.

प्रत्येक विद्यार्थ्याने एकदा तरी पाहावा असा प्रेरणादायी चित्रपट आहे.

👉 संदेश: आपली भाषा, आपली शाळा — आपली ओळख.


👨‍👩‍👧 पालकांसाठी Review

हा चित्रपट पालकांना थांबून विचार करायला भाग पाडतो.

फक्त इंग्रजी माध्यम म्हणजेच यश असा गैरसमज तो हलकेच प्रश्नांकित करतो.

मुलांच्या सर्वांगीण विकासात शाळेचा, शिक्षकांचा आणि संस्कारांचा वाटा किती महत्त्वाचा आहे हे प्रभावीपणे मांडतो.

मराठी माध्यम शाळांबद्दलचा दृष्टिकोन बदलू शकणारा, संवेदनशील आणि वास्तववादी चित्रपट आहे.

👉 संदेश: माध्यमापेक्षा महत्त्वाचा असतो मुलाचा आत्मविश्वास.


Sangita Bhalsing

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

मराठी 12 वी बोर्ड परीक्षेसाठी महत्वाच्या सूचना.

 12 वी मराठी Marathi 12th

Board Exam 

बोर्ड परीक्षेसाठी महत्वाच्या सूचना.

मराठी  12 वी  बोर्ड परीक्षेसाठी महत्वाच्या सूचना.

बोर्ड परीक्षे साठी जाताना कोणती पूर्वतयारी करावी?

कोणती काळजी किंवा दक्षता घ्यावी?

अभ्यास कसा करावा?

उत्तरपत्रिका कशी सोडवावी?

मन शांत, स्थिर कसे ठेवावे?

अशा तुमच्या मनातील अनेक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळेल. त्यासाठी 

खाली दिलेली लिंक ओपन करा. Chrome browser मध्ये Link open करा.

https://youtu.be/FNCgM7ONLYk?si=Psui0v4YqZQX29ZK

व्हिडिओ आवडल्यास like, comment,share करा.


👉 व्हिडिओ आवडला तर नक्की Subscribe करा प्लीज 

👉 1 लाख Subscribers पूर्ण करण्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे 🙏


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 


अर्थशास्त्र - इयत्ता १२ वी - महत्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न

 अर्थशास्त्र - इयत्ता १२ वी - महत्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न 

शाखा - कला आणि वाणिज्य 

अर्थशास्त्र - इयत्ता १२ वी - महत्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न


अर्थशास्त्र (49)

प्रश्न क्रमांक 6  

तीनपैकी दोन सोडवा.( गुण 16 )


महत्त्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न 


1) सूक्ष्म अर्थशास्त्रचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा..

गुणदान ..

अर्थ..2 गुण

 वैशिष्ट्ये 6 गुण

अपेक्षित उत्तर...

प्रस्तावना 

सूक्ष्म अर्थशास्त्रचा अर्थ

उदाहरणासह स्पस्टीकरण 

सर्व वैशिष्ट्ये स्पस्टीकरणासह स्पष्ट करणे

समारोप.

एक मुद्दा - एक गुण 


2) घटत्या सिमांत उपयोगितेचा सिध्दांत स्पष्ट करुन गृहिते सांगा..

गुणदान ...

सिध्दांत...5 गुण

गृहिते ...3 गुण


अपेक्षित उत्तर...

प्रस्तावना 

सिद्धांताचे विधान / व्याख्या 

उदाहरण ..स्पस्टीकरण 

कोष्टक ...स्पस्टीकरण 

आकृती ...स्पस्टीकरण 

गृहिते ...किमान 5 गृहिते थोडक्यात स्पस्टीकरणासह लिहीणे..

समारोप ..


3) मागणीचा नियम स्पष्ट करुन अपवाद सांगा...

गुणदान ...नियम..5 गुण

              अपवाद 3 गुण

अपेक्षित उत्तर ...

प्रस्तावना 

नियमाचे विधान / व्याख्या 

उदाहरण ..स्पस्टीकरण 

कोष्टक ...स्पस्टीकरण 

आकृती ...स्पस्टीकरण .

अपवाद ..किमान 5 थोडक्यात स्पस्टीकरणासह..

समारोप ..


4) मागणीचा अर्थ सांगून मागणीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा..

गुणदान ..मागणी अर्थ 2 गुण

          घटक 6 गुण

अपेक्षित उत्तर..

प्रस्तावना 

मागणी व्याख्या / अर्थ

उदाहरण 

मागणीवर परिणाम करणारे घटक सर्व...स्पस्टीकरणासह स्पष्ट करणे.

समारोप ..


5) मागणीच्या किंमत लवचीकतेचा अर्थ सांगून किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा..

गुणदान ...अर्थ 3 गुण

           प्रकार..5 गुण

अपेक्षित उत्तर...

प्रस्तावना 

किंमत लवचिकता अर्थ/व्याख्या 

सुत्र 

स्पस्टीकरण 

प्रकार सर्व आकृती सह स्पष्ट करणे

समारोप


6) पुरवठा नियण स्पष्ट करुन गृहिते सांगा..

गुणदान ...नियम 5 गुण

            ...गृहिते  3 गुण

अपेक्षित उत्तर

प्रस्तावना 

नियमाचे विधान / व्याख्या 

उदाहरण 

कोष्टक ..स्पस्टीकरण 

आकृती ...स्पस्टीकरण 

गृहिते ...किमान 5 थोडक्यात स्पस्टीकरणासह ..

समारोप..


7) मक्तेदारीयुक्त बाजारपेठेचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

गुणदान ...अर्थ..2 गुण

         .....वैशिष्ट्ये  6 गुण

अपेक्षित उत्तर 

प्रस्तावना 

अर्थ / व्याख्या स्पष्ट करणे

वैशिष्ट्ये ..सर्व वैशिष्ट्ये स्पस्टीकरणासह स्पष्ट करणे.

समारोप.,


8) राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगुन राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तात्त्विक व व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा..

गुणदान ..अर्थ 2 गुण

    तात्त्विक अडचणी 3 गुण

 व्यावहारिक अडचणी 3 गुण

अपेक्षित उत्तर..

प्रस्तावना 

अर्थ / व्याख्या 

तात्त्विक अडचणी किमान 4 मुद्दे स्पस्टीकरणासह 

व्यावहारिक अडचणी किमान 4 मुद्दे स्पस्टीकरणासह 

समारोप 


9) सार्वजनिक खर्चाचे प्रकार सांगून सार्वजनिक खर्च वाढीची कारणे स्पष्ट करा.

गुणदान ..प्रकार 3 गुण

          ..कारणे..5 गुण

अपेक्षित उत्तर..

प्रस्तावना 

खर्चाचे 4 प्रकार थोडक्यात स्पष्ट करणे..

खर्च वाढीची कारणे 4 मुद्दे स्पष्टीकरणासह स्पष्ट करणे.जी

समारोप ..


10 ) मध्यवर्ती बँकेची व्याख्या स्पष्ट करुन कार्ये विशद करा.

गुणदान ..व्याख्या 2 गुण

           ....कार्ये  6 गुण

अपेक्षित उत्तर..

प्रस्तावना 

व्याख्या एक किंवा दोन

सर्व कार्ये स्पस्टीकरणासह स्पष्ट करणे..

समारोप.


11)  सरकारच्या सार्वजनिक उत्पन्नाचे विविध स्त्रोत स्पष्ट करा

गुणदान ...उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांना एकत्रितपणे 8 गुण

अपेक्षित उत्तर...

प्रस्तावना ..

A) कर उत्पन्न ..अर्थ

    1) प्रत्यक्ष कर..

     2) अप्रत्यक्ष कर...

B) करेत्तर उत्पन्न ...

    सर्व स्त्रोत स्पष्ट करणे...


समारोप..


12) स्थूल अर्थशास्त्रचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

गुणदान ..अर्थ 2 गुण

          वैशिष्ट्ये 6 गुण

अपेक्षित उत्तर...

प्रस्तावना 

अर्थ/ व्याख्या 

उदाहरण 

वैशिष्ट्ये ...सर्व मुद्दे स्पस्टीकरणासह स्पष्ट करणे..

समारोप..


13) सार्वजनिक खर्च वाढण्याची कारणे स्पष्ट करा.

अपेक्षित उत्तर - 

८ कारणे स्पष्ट करणे


खालील यू ट्यूब व्हिडिओ लिंक ओपन करा.

अधिक मार्गदर्शन मिळेल.


https://youtu.be/nCmvzxcWcrs 


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 

अर्थशास्त्र 12 वी - 80 गुण -प्रश्नपत्रिका आराखडा

 12 वी अर्थशास्त्र 80 गुण -प्रश्नपत्रिका आराखडा

12 वी अर्थशास्त्र 80 गुण -प्रश्नपत्रिका आराखडा, स्वरूप



प्र.१.अ) योग्य पर्याय निवडा. ( ०५ गुण )
ब) सहसंबंध पूर्ण करा.  ( ०५ गुण )
क) आर्थिक पारिभाषिक शब्द ओळखा. ( ०५ गुण )
ड) विधान व तर्क प्रश्न  ( ०५ गुण )

प्र.२. अ) खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. (५ पैकी ३) ( गुण ०६ )

ब) फरक स्पष्ट करा.(५ पैकी ३) (  गुण ०६ )

प्र.३.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.(५ पैकी ३) ( गुण १२ )

प्र.४.खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सकारण स्पष्ट करा. (५ पैकी ३) ( गुण १२ )

प्र.५.खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (३ पैकी २) ( गुण ०८ )

प्र.६. सविस्तर उत्तरे लिहा. (३ पैकी २) ( गुण १६ )

वरील माहिती सविस्तर हवी असेल तर 
खाली दिलेल्या यू ट्यूब व्हिडिओ ची लिंक ओपन करा.
काही प्रश्न, शंका,सूचना असल्यास कमेंट करा. 
Chrome browser मध्ये Link open करा.

https://youtu.be/V7VxPmTd3wo


Sangita Bhalsing 
Ahilyanagar 
Maharashtra 

“१२ वी मराठी कृतिपत्रिका – महत्वाच्या सूचना”

 🔷 इयत्ता १२ वी – मराठी कृतिपत्रिका / प्रश्नपत्रिका

🔷 महत्वाच्या मार्गदर्शक सूचना

विषय : मराठी | शाखा : कला, वाणिज्य, विज्ञान

इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेत मराठी विषयात भरपूर गुण मिळवायचे असतील, तर केवळ अभ्यास नव्हे तर कृतिपत्रिका सोडविण्याची योग्य पद्धत माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. 

“१२ वी मराठी कृतिपत्रिका – महत्वाच्या सूचना”  : Time Management | Writing Tips | Scoring Guide


खाली दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून अंमलात आणल्यास निश्चितच गुण वाढतील.

📝 कृतिपत्रिका सोडविताना घ्यावयाची काळजी

✔️ सर्व कृती/प्रश्न कृतिपत्रिकेत दिलेल्या क्रमानेच सोडवाव्यात.

✔️ प्रत्येक नवीन कृती स्वतंत्र पानावर सुरू करावी.

✔️ कोणतीही कृती आवश्यकतेपेक्षा जास्त सोडवू नये.

⏰ वेळेचे योग्य नियोजन (अतिशय महत्त्वाचे)

कृती सोडवताना खालीलप्रमाणे वेळेचे नियोजन करावे :

२ गुण → ४ मिनिटे

३ गुण → ६ मिनिटे

४ गुण → ८ मिनिटे

५ गुण → १० मिनिटे

⏱️ एकूण वेळ : ३ तास (१८० मिनिटे)

✍️ लेखनासाठी : १६० मिनिटे (८० गुण)

📖 उतारे वाचन + निबंधासाठी शेवटचे : २० मिनिटे

📄 उत्तरपत्रिकेतील पानांचे नियोजन

पूर्ण उत्तरपत्रिका साधारणपणे १७ ते २० पानांत सहज पूर्ण करता येते.

उदाहरण :

🔹 कृती १ (गद्य – २० गुण) → ४ पाने

🔹 कृती २ (पद्य – १६ गुण) → ३ पाने

🔹 कृती ३ (कथा – १० गुण) → ३ पाने

🔹 कृती ४ (उपयोजित – १४ गुण) → ४ पाने

🔹 कृती ५ (व्याकरण + निबंध – २० गुण)

  • व्याकरण → १ पान

  • निबंध → ३ पाने

➡️ एकूण : १८ पाने

📌 लक्षात ठेवा –

जास्त पाने म्हणजे जास्त गुण नाहीत.

अचूक, मुद्देसूद, नीटनेटके उत्तर हेच गुण वाढवते.

✍️ लेखनाबाबत महत्वाच्या सूचना

✔️ हस्ताक्षर सुवाच्य व स्वच्छ असावे

✔️ खाडाखोड टाळावी

✔️ एकाच पेनचा वापर करावा (शाई बदलू नये)

✔️ समास योग्य प्रमाणात ठेवावा

✔️ चौकटी/चौकोन पेन्सिलने नीट काढावेत

🌟 प्रेरणादायी सत्य

👉 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील १०० पैकी ९९ गुण मिळवले आहेत.

👉 मागील वर्षी मुंबई विभागातून एका विद्यार्थ्याने १०० पैकी १०० गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला.

म्हणूनच, तुम्हीही नक्कीच करू शकता!

📌 कमी अभ्यास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी “कानमंत्र”

जर अभ्यास कमी झाला असेल तर खालील घटकांवर भर द्या :

1️⃣ सहा कविता

2️⃣ कोणतीही एक कथा

3️⃣ कोणतेही दोन उपयोजित घटक

4️⃣ व्याकरण

एवढा अभ्यास केला तरी अपेक्षित गुण नक्की मिळू शकतात.

🧾 उत्तरांच्या लांबीबाबत मार्गदर्शन

२ गुण → अर्धे पान

३ गुण → पाऊण पान

४ गुण → १ पान

५ गुण → दीड पान

📝 निबंध किमान ३ पाने लिहा.

आत्मवृत्तात्मक निबंधात प्रथमपुरुषी भाषा वापरा.

उदा. :

“मी शेतकरी बोलतोय”

→ मी स्वतः शेतकरी आहे असे समजून अनुभव मांडावा.


ता. क. Sangita Bhalsing या माझ्या यू ट्यूब चॅनल वर मागील वर्षाच्या कृतीपत्रिका उत्तरा सहित सोडलेले व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला याचा खूप फायदा होईल.

💐 शुभेच्छा

सर्व विद्यार्थ्यांना मराठी विषयात भरपूर गुण मिळावेत,

हीच आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या मित्र, मैत्रिणीला ही पोस्ट शेअर करू शकता.

अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ नक्की पहा.

Crome ब्राउझर मध्ये लिंक ओपन करा.

https://youtu.be/vc1PJjPT-wk 


ही माहिती उपयुक्त वाटल्यास १२ वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा.

अशाच शैक्षणिक मार्गदर्शनासाठी ब्लॉग Follow करा.


– Sangita Bhalsing

अहिल्यानगर, महाराष्ट्र





New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...