बुधवार, २३ मार्च, २०१६

होली

होली

कान्हाच्या प्रेमाचा रंग
राधेच्या गोऱ्या गालावर ...
सारे गोकुळ झाले दंग
बासरीच्या मधुर बोलावर ...

सौ.संगिता भालसिंग
23 मार्च 2016

मंगळवार, २२ मार्च, २०१६

भान

भान
*****************

सख्याच्या आठवात
सखी किती रममान ...
अंगावरील वस्त्राचेही
उरले नाही भान ...!!

*****************
सौ.संगिता भालसिंग
२२ मार्च २०१६

संस्कार चौकट


सुवर्णपदक प्राप्त .
**************************************
संस्कार चौकटीला मांगल्य तोरण बांधून ,
आधुनिक युगात रूढी परंपराना जागत ...!
आशा अपेक्षांची यशोगुढी उभारून ,
मराठी नव वर्षाचे करू या स्वागत ...!!
***************************************
सौ.संगिता भालसिंग
20/3/15

नविन वर्ष अणि गुढीपाडव्याच्या
शुभेच्छा
***************************

सुई

*******सुई *******

सुई बाई सुई
किती तुला घाई ..?
पुढे शिवत जाताना
मागे जोडत जाई ....

गुण तुझा घ्यायला
कळेल का माणसाला ?
भांडून तोड़तो मन
शिकव जोडायला ....

जन्म मरणाची
असे वाट एकच
स्त्री अन् पुरुष
जगी जाती दोनच ....

जगा अन् जगु दया
मंत्र हा पाळा
फोड़ा अन्  झोडा
तंत्र आता टाळा ....

आदर्श सुईचा
ठेवा रे समोर
प्रेमानंदी मनोमनी
नाचू दया रे मोर ....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
21/3/15

सोमवार, २१ मार्च, २०१६

समाधान

समाधान

रांधा वाढा, उष्टी काढा
यातही ओतते प्राण ..
पडला दुःखाचा वेढा
मुखावर समाधान ..

******************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
२१ मार्च ३०१६
शुभ रात्र

पायवाट

"यशवंत " त्रैमासिक वर्धापनदिन विशेषांक 2015
यात माझी रचना प्रसिद्ध झाली . ही रचना मी
माझी प्रिय मैत्रीण पुजा हिच्या साठी शुभेच्छा
म्हणून केली होती .
****************************************
प्रा.सौ.संगिता भालसिंग

रविवार, २० मार्च, २०१६

होळी

🌹 चारोळी स्पर्धा 🌹

द्वितीय क्रमांक प्राप्त

साहित्य मंथन समूह दि.१८/०३/१६
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
  विषय - होळी

०१

जात, धर्म,पंथ,वेश,भाषा विसरून ,

विविधतेत एकता जगाला दावू ...!!

सारे दुर्गुण होळीत दहन करून ,

चला,नवरंगात सारे रंगून जावू ...!!

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

०२

बालकांची निघाली रे टोळी

बोंब मारीत "होळी रे होळी " ...

नैवेद्य दाखवुन पुरण पोळी

अन् सासूरूपी कचरा जाळी ...

****************************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...