शुक्रवार, २६ मे, २०१७

वेदना

जीव सारा पोळलेला
वेदनांनी भाजलेला ...
भोगलेल्या यातनांनी
देव आता लाजलेला ...

Sangita Bhalsing

कोरीव मुख

कोरीव मुखावर
आनंदाचा झरा ...
अर्थसार भासतो
जीवनाचा खरा ...

Sangita Bhalsing

मोहिनी

टपोऱ्या खोल डोळ्याची
मनावर मोहिनी पडते ...
लांब काळ्या पापण्या
काळजाचा कातळ फोडते ...

Sangita Bhalsing

गुरुवार, २५ मे, २०१७

काजळ

काळ्याभोर डोळ्यात
काजळ जपून घाल ...
ठोका चुकेल काळजाचा
सखे जरा जपून चाल ...

Sangita Bhalsing

मृदगंध

भिजली माती
मृदगंध श्वासात
स्पर्श भासात ...

Sangita Bhalsing

करार

कागदी करारा पेक्षा
मनाचा होकार पाहिजे...
काना,मात्रा,वेलांटीपेक्षा
काळजावर रफार पाहिजे ..

Sangita Bhalsing

बुधवार, २४ मे, २०१७

आसू

गालावर ओघळले
गोल थेंब पावसाचे ...
प्रतिबिंब भासले
गारव्यात साजनाचे ...

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...