रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

दिलखुलास

मोहविते मनाला
दिलखुलास हसू ,
जरी चुकले माझे
तरी नको रुसू ...

Sangita Bhalsing
spsfun.com

हिंमत

तुझ्याविना जगण्याची
नाहीच थोड़ीही हिंमत...
जरी तू देत नाहीस
प्रेम भावनेला किंमत ...

Sangita Bhalsing
spsfun.com

रुबाबदार

दाराआडून पहाते
रुबाबदार चालणं ...
काळजात ठेवलंय
तुझं प्रेमळ बोलणं ..

Sangita Bhalsing
spsfun.com

केतकीचे पान

सौंदर्याची खाण
जसं केतकीचं पान
सारेगमपधनिसा
सप्त सुरातली तान ..

Sangita Bhalsing
spsfun.com

अस्तित्व

समजून घे सखे
प्रेम म्हणजे काय ?
तुझे माझे अस्तित्व
वेगवेगळे नाय ...

Sangita Bhalsing
spsfun.com

शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

वरात

मागणं मागते
देवाच्या दारात ...
घोड्यावर येऊ दे
सजनाची वरात ..

Sangita Bhalsing
spsfun.com

आधार

उशी नको मजला
बाहुंचा आधार रे ,
चांदण्यात संगतीला
काजवे उधार घे ..

Sangita Bhalsing
spsfun.com

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...