कविता
🌹मोगरा🌹
कधी पानाच्या आड लपतो
अंगणी फुललेला मोगरा ...
कधी दवात न्हातो लाजरा
लपवितो सुगंधी चेहरा ...
अवखळ वाऱ्याने डोलतो
खेळताना दिसतो नाचरा ..
धुंद परिमल पसरतो
चांदणीला दिसतो हसरा ...
उन्हात चमकतो गोजिरा
येतो अंगावरती शहारा ...
घट्ट प्रेमात आतुरलेल्या
रातराणीचा सदा पहारा ...
सौ.संगिता भालसिंग