गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

विज्ञान

विज्ञान

चला मुलांनो चला
विज्ञानाशी दोस्ती करू...
अंधश्रद्धेचा राक्षस
चंचूपात्रात भरू ...

नवनवीन कल्पना
प्रयोगशाळेत साकारू
उत्तुंग भरारीचे स्वप्न
परीक्षानळीत आकारू ...

चुका आणि शिका
हे तत्व अनुसरू
पायरीपायरीवरती
सी व्ही रमणला स्मरू...

'क'ची बाराखडी
सदा प्रश्न विचारू
चौकशीचे वल्हे अन
जिज्ञासेचे तरू ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
गुरुवार दि.28.02.19

घडलो-बिघडलो

आम्ही आमचे घडलो ,
दोष ना कुणा, जरी बिघडलो..

Sangita Bhalsing

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

चिमणी

चिमणी...

येईल तुझ्या दरी
इवली चिमणी
चिव चिव करत
मागेल चोचभर पाणी...

गॅलरीत करील घरटे
काडी काडी जमवून
कचरा होतो म्हणून
नको टाकूस मोडून ...

सिमेंटच्या जंगलात
जागा तिला नाही
मानवी अत्याचार
बिचारी मुकाट साही...

विसरू नको तत्व
जगा नि जगू द्या
जगण्याची धडपड
सफल तिची होऊ द्या...

Sangita Bhalsing@
Ahmednagar

बंद दार

एवढा अहंकार बरा नव्हे
सखी,वळून बघ जराशी..

आठवांचे क्षण रेंगाळत आहेत
तूच बंद केलेल्या तुझ्याच दाराशी...

Sangita Bhalsing

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

जय शिवराय

राजे

आजकाल लोक,फ़क्त म्हणतात
राजे,तुमच्या साठी काय पण ...!!
एक ओठात अणि एक पोटात
विचार कृतीत आणतात का पण ...?

तुम्ही परस्त्रीचा मान सन्मान केला
आज समाज हेच विसरून गेला
तुम्ही दुसऱ्या धर्माचा आदर केला
आज समाज इथेच घसरुन गेला

तुम्ही सुख सोडून दुःखात जगले
आज लोक ताळ तंत्र सोडून वागले
तुम्ही स्वराज्यासाठी प्राण पणाला लावले
आज लोक एकमेकांचे प्राण घ्यायला लागले

राजे,तुमची शिकवण लोक विसरले
नीतिमूल्य ,चारित्र्य सोडून घसरले
तुम्ही होते,स्वराज्य प्रेमाने भारलेले
आज लोक देशभक्तीही विसरले

राजे,पुन्हा या जन्माला
सन्मार्ग दाखवायला ...
तयार आहोत आम्ही
पुन्हा मावळे बनायला ...!!

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...