शनिवार, ३० मार्च, २०१९

तत्व

आवडतात खूप खूप
तुझी तत्वे जगण्याची...
प्रसंगी मन मोडून ही
प्रिय तत्वाला जागण्याची...

Sangita Bhalsing


पाणी

मोठाल्या डोळ्यात
पाणी दाटू लागतं...
उगीच रागावल्याचं
वाईट वाटू लागतं..

Sangita Bhalsing

मोठेपणा

समजतो मला
तुझा खोटेपणा...
उगाच मिरवलेला
जगात मोठेपणा...

Sangita Bhalsing

कोटा

विचार नाही करीत
फायदा की तोटा...
स्वाभिमानी जगणं
एवढाच कोटा...

Sangita Bhalsing

आहेर

विचार जाब आसवांना
का आलात बाहेर..?
आग्रहाचे आमंत्रण देऊन
कोणी केला होता का आहेर ..?

Sangita Bhalsing

नातं

नातं तोडून
गमवायचं नाही...
नातं ओढून
कमवायचं नाही...

Sangita Bhalsing

भातुकली

बदलला काळ
बदलली वेळ..
हरवला मुलांचा
भातुकली खेळ ...

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...