🌷 गाठोडे 🌷
एकदा काही दुःखी लोक
जाऊन भेटले देवाला
'न्याय करा' विनविले
देऊन भक्तीचा हवाला ...!!
देवा,अशी विषमता
तू का म्हणून केली ?
माझ्यापेक्षा दुसऱ्याला
दुःखं कमी का दिली ?....!!
देव उत्तरला, या समोर ठेवून
सुख दुःखाची गाठोडी बांधून
अणि धावत पळत जावून
दुसऱ्याचे गाठोडे घ्या उचलून ...!!
उत्सुकतेने प्रत्येकाने दुसऱ्याचे
गाठोडे पाहिले उघडून,अणि
बसले डोक्याला हात लावून
खूप मोठी मोठी दुःखं पाहून ...!!
सर्वानी विचार केला मनी
देवाला सांगितला पटकनी
माझेच गाठोडे बरे होते
निदान,त्यात दुःख तरी कमी होते ...!!
**************************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
०७ मार्च २०१६
Spsfun. com
Copyright
🌹🌹🌹🌹
Good morning
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.