रविवार, २९ मे, २०१६

बाळकृष्ण

तृतीय क्रमांक प्राप्त रचना

🌻 बाळ कृष्ण 🌻
*****************
नंद दरबारी
आरसे बिलोरी
रांगताना पाही
नटखट हरी ...

नंदाच्या कान्हाला
टोचला ग खड़ा
यशोदेचा जीव
झाला थोडा थोडा ...

सावळा गोंडस
खोडील मुरारी
कवळाया धावे
दरबारी सारी ...

शिरी मोरपिस
वार्यावर डोले
हातीपायी वाळा
छुन छुन बोले ...

रांगत बसत
मागे पुढे पाही
हसत रडत
वाकुल्याही दावी ...

भरवित घास
यशोदा माऊली
नको म्हणूणीया
मुंडी हलविली ...

दमला भागला
पेंगाया लागला
कुशीत घेतला
अंगाई गायला ...

मिटल्या पापण्या
संपली अंगाई
गालात हसत
कान्हा झोपी जाई ...

***sps.fun ***********
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲